Skip to main content

व्हेंन्टीलेटर

लेखक नाखु यांनी सोमवार, 07/11/2016 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळः बागेच्या दाराशी असलेली नेहमीची भेळेची गाडी.

पळीचा सोडा

लेखक अजया यांनी रविवार, 06/11/2016 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी उठुन अचानकच कुठे तरी फिरायला जाऊया विचार करायला लागलो.आमच्या रायगड जिल्ह्याचं एक बरं आहे एका दिवसात जाऊन परत येता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं आहेत. मग जवळच अलिबागला जाऊन येऊ ठरवलं. पुणा हायवे आमच्या गावाच्या अंगणात तर गोवा हायवे परसात आहे.जातानाचा आमचा रसायनी ते आपटामार्गे खारपाडा रस्ता माझा अतिशय आवडता रस्ता आहे.दुतर्फा गर्द झाडी,डोंगर,बाजूने लांबून छान जवळून पूर्ण प्रदूषित नदी! एकदा का पेणचा रस्ता सुरु झाला की सगळी हाडं खिळखिळी व्हायला सुरूवात होते ती थेट वडखळ जाईपर्यंत. वडखळला मिसळ वडा स्टाॅप घ्यावाच लागतो असा अलिखित नियम आहे!

काटा रुते कुणाला…..भाग २

लेखक Jabberwocky यांनी रविवार, 06/11/2016 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
काटा रुते कुणाला.... भाग १ हा विशाल हा माझा इयत्ता पहिली पासून ते दहावी पर्यंतचा मित्र. नंतर मात्र तो वेगळ्या कॉलेज ला आणि मी वेगळ्या. तशी गेल्या दोन अडीच वर्षात याची आणि माझी भेट फारच कमी झाली होती. आणि आता हा अचानक असा धूमकेतू सारखा माझ्यासमोर प्रकट झाला होता, माझी उत्कंटा वाढत होती. काय बोलायचं असेल याला आणि ते हि हा खूपच सिरीयस मूड मध्ये दिसतोय. नक्की काय ते पत्ता लागत नव्हता. एकदाचे आम्ही त्या लहान मुलांसाठी असलेल्या कॉलोनीच्या छोट्या उद्यानात पोचलो. आजूबाजूला लहान पोर खेळत होती.

मक्केतील उठाव ७ (शेवटचा भाग)

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 06/11/2016 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ६ ४ डिसेंबर १९७९. मक्केतील उठाव मोडून काढला गेला. सगळे बंडखोर एकतर मारले गेले किंवा पकडले गेले. मशिदीचे प्रचंड नुकसान झाले. काबाचा पाषाण शाबूत होता. पण बाकी मशिद उध्वस्त झाल्यासारखी दिसत होती. मारवा आणि सफा गेट आणि त्यांना जोडणारी मार्गिका ह्यांची खूप मोडतोड झाली होती. रणगाडे, चिलखती जीप ह्या चालवल्यामुळे फरशा उघडल्या होत्या. जिने तुटले होते. त्या दिवशी सगळ्या कैद केलेल्या बंडखोरांना टीव्हीवर दाखवले गेले.

डी फॉर डान्सबार

लेखक वरुण मोहिते यांनी शनिवार, 05/11/2016 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
सुन रहा है ना तु रो राहा हू मै... क्या बात है ..आत गेलो आम्ही डान्सबार हा प्रकार काही नवीन नव्हता पण काही घटना त्या वेळी घडून जातात आपल्या हातात नसतं. वास्तविक माझे बाहेरच्या राज्यातून मित्र आले तरी त्यांना घेऊन जाणं व्हायचं. परदेशात असताना हि जाणं व्हायचं. त्यात काहीच नवीन नाही. पण कधीतरी होतं. चालायचं मुंबई मध्ये तीन प्रकार चे डान्सबार आहेत. एक काहीही करून देणारे दुसरे मोठी गाणी आणि रेग्युलर लोकांमध्ये प्रतिमा असते तसे आणि तिसरं महत्वाचं .एलिट क्लास टाईप. पूर्ण प्रकाश . एकदम फॉर्मल वातावरण .तर सांगायची गोष्ट अशी एके दिवशी गेलो आम्ही .

रंगभूमी दिन

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 05/11/2016 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों । विघ्‍नवर्गनग भग्‍न कराया विघ्‍नेश्वर गणपति मग तो ॥ कालिदासकविराजरचित हें गानीं शाकुंतल रचितों । जाणुनियां अवसान नसोनि हें महत्कृत्यभर शिरीं घेतों ॥ ईशवराचा लेश मिळे तरि मूढयत्‍न शेवटिं जातो । या न्यायें बलवत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो ॥ या नांदी बरोबर तिसरी घंटा झाल्यावर रंगमंचावर नटाचा परकाया प्रवेश होतो. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, केशवराव भोसले, अण्णासाहेब किर्लोस्कर, बालगंधर्व, राम गणेश गडकरी यांसारख्या दिग्गजांनी रुजवलेलं हे रोपटं विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, सतीश आळेकर यांनी याला जोपासून त्याचं वटवृक्षात रूपांतर केलं.

एक स्वप्न होत माझं...!

लेखक Bhagyashri satish vasane यांनी शनिवार, 05/11/2016 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
एक स्वप्न होत माझं तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं तुझ्यासाठी कोणत्याही परिस्थितिला निडरपणे सामोरं जायचं माझ्या सुखात तुला हसवायचं अन् तुझ्या मी रडायचं तुझ्या ओठांवरच्या एका हास्यासाठी काहिहि करायचं एक स्वप्न होत माझं तुझं मन जिंकायच एक स्वप्न होत माझं तुझ्यासोबत तुझ्या घरात राहायचं त्या घराला आपलं घर बनवायचं आपल्या घराला सजवायचं घरातल्या प्रत्येक गोष्टीसोबत आपलं नात जपायचं घर फुलाप्रमाणे फुलवायचं फक्त एक स्वप्न होत माझं तुझी अर्धांगिनी बनुन जगायचं...!
काव्यरस

तू आणि मी

लेखक Bhagyashri satish vasane यांनी शनिवार, 05/11/2016 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
अशी एक फक्त कल्पना असावी. सोनेरी त्या क्षणाला एकांताची साथ असावी...! गुलमोहराचा बहर, आणि तिथेच आपली भेट असावी...! जसे एखाद्या पाखराची, गोड ड्रीम डेट असावी...! तू मात्र,,, आवडत्या आकाशी रंगाच्या, पोशाखात असावी...! आकाशालाही हेवा वाटावा, इतकी तू सुंदर दिसावी...! निरोप घेतांना डोळ्यांमध्ये, अश्रूची एक झलक असावी...! डोळ्यामधले भाव जाणूनी, नाजुकशी ती मिठी असावी...! जीव ओतला तुझिया पायी, आशा तुझीही हीच असावी...! एकमेकांची साथ अशी ही, दरवेळी रम्य असावी...!

काटा रुते कुणाला…..

लेखक Jabberwocky यांनी शनिवार, 05/11/2016 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवारची संध्याकाळ म्हणजे उत्साहाला उधाण असायचं, शनिवार रविवार कॉलेज ला सुट्टी. आम्ही सगळे जिगरी सोबत. आमची कॉलनी पुण्याच्या थोडीशी बाहेर, आणि आम्ही सगळे जिगरी म्हणजे अगदी लहानपणापासून ते आजवर नेहमी सोबत. तशी प्रत्येकाची शाळा कॉलेज वेग वेगळी, पण आमचा हा जो कॉलनी चा चमू होता त्याच्यापुढे आमचे कॉलेजचे ग्रुप आणि ते कॉलेजचे कट्टे झक मारायचे. म्हणूनच आम्ही सगळे आठवडाभर वाट पाहायचो ते या तीन दिवसांची.