Skip to main content

स्वतःला ओळखायचं असत!

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 21/01/2017 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
एकट असण्याचा संबंध दु:खाशी का लावतात? त्यातही काहींना सुख मिळत हे का न मानतात? एखादी कविता, छानशी गाणी, एखाद्या कादंबरीतली मोहक कहाणी... हे सगळ एकट्यानेही अनुभवायच असत सारख गर्दीतच का हरवायच असत? एकटेपणात स्वत:ला शोधता येत.. झालेल्या चुकांना समजुन घेता येत.. अपल्याशिच खुपस बोलता येत.. भविष्यातल्या चुकांना टाळता येत.. एकटेपणात कोणतही बंधन नसत! 'हव ते कर' कोणी बघतही नसत! मात्र... धमाल एन्जॉय करून परतायच असत! सगळ्यांच्या बरोबरीने हसायच असत!
काव्यरस

एक निर्णय (भाग 2)

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 20/01/2017 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
एक निर्णय भाग 1 भाग २ सर्व उत्तम मार्क्सनी पास झाले. मिनाक्षीने यावर्षी पहिला क्रमांक पटकावला होता. पण प्रशांतने ते मात्र सहज स्वीकारलं. पण मग मात्र तो मुद्दाम सर्व शिक्षकांना जाऊन भेटला. तो कुठे कमी पडतो आहे का, अस त्याने प्रत्येक शिक्षकाला विचारल. मग मराठीच्या काणे बाईनी त्याला समजावलं;"प्रशांत, तू हुशार आहेस आणि कुठेही कमी पडलेला नाहीस. पण एक लक्षात घे. तू फक्त अभ्यास एके अभ्यास अशा स्वभावाचा नाही आहेस. तू शाळेत होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत आणि कार्यक्रमात भाग घेतोस. त्याचा थोडा परिणाम कदाचित पुढे अभ्यासावर होईल.

कोल्लम सहली विषयी मार्गदर्शन हव आहे

लेखक झंप्या सावंत यांनी शुक्रवार, 20/01/2017 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
2 दिवसांचा कालावधी आहे. सर्व मित्र जाणार आहोत रहाण्यास स्वस्त आणि उत्तम पर्याय मिळेल का ? घरगुती निवास असेल तर फार उत्तम. किंवा डॉर्मिटरी पण चालेल. कुणाला या बाबत अधिक माहिती असेल तर सांगा प्लीज. जुना धागा असेल तर कृपया इथे नमूद करावा. धन्यवाद .

ग्लोब थिएटर

लेखक पद्मावति यांनी शुक्रवार, 20/01/2017 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
*/

Cowards die many times before their deaths… All the world's a stage, and all the men & women merely players... To be, or not to be : that is the question… What’s done is done... you too Brutus??..... जगभरातल्या अगणीत नाट्यगृहात, शंभरेक निरनिराळ्या भाषांमधून आणि अनेक दिग्गज अभिनेत्यांनी रंगमंचावर साकारलेल्या या ओळी…. जागतिक नाट्स्ृष्टीमधले एक जबरदस्त नाव - विलियम शेक्सपीयर!

क कथेचा प पटकथेचा

लेखक बोका-ए-आझम यांनी शुक्रवार, 20/01/2017 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
*/

चित्रपट तीन टेबलांवर बनतो असं म्हटलं जातं – पहिलं लेखकाचं, दुसरं संकलकाचं आणि तिसरं वितरकाचं. पहिल्या टेबलावर चित्रपट अमूर्त स्वरूपात असतो, दुसऱ्या टेबलावर त्याला निश्चित स्वरूप आणि आकार मिळतो आणि तिसऱ्या टेबलावर त्याचं व्यावसायिक भवितव्य ठरतं. या तिन्हीपैकी कुठलं महत्त्वाचं हा प्रश्न जर कोणी विचारला, तर ‘पहिलं टेबल’ हे नक्कीच त्याचं उत्तर असेल, निदान माझ्यासाठी तरी.

जखमात यौवनाच्या

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी गुरुवार, 19/01/2017 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
जखमात यौवनाच्या झाले किती दिवाणे असती कुणी विलासी कोणी उदासवाणे असतात काळजाचे गुंते जुने-पुराणे शून्यात जाई कोणी घेतो कुणी धीराने लाखो तऱ्हा तयांच्या नि शेकडो ठिकाणे बाजार काळजाचा लाखो इथे दुकाने मदिरा कुणा सुखावी कोणास आर्त गाणे भासे आयुष्य कोणा ती पेटली स्मशाने ते दुःख झाकण्याला करती किती बहाणे ओठात गोड हासु कोणा नटाप्रमाणे ती आग अंतरीची जाळी कणाकणाने ना सांगता कुणा ये हे मोकळेपणाने होती अबोल का हो?
काव्यरस

लॉलीपॉप - 3

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 19/01/2017 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
लॉलीपॉप - १ लॉलीपॉप - 2 आदूने तिच्या बाहुलीला हातात घेतलं. हळू हळू अगदी सावकाश तिनं तिचा ड्रेस काढला. त्या बाहुलीला अगदी प्रेमानं गोंजारलं आणि माझ्यासमोर धरलं. काही क्षण मला काय करावं हेच समजलं नाही. मी पटकन पुढे होऊन तिच्या हातातून बाहुली घेतली. पण मला त्या बाहुलीला तसं हातात घ्यायचं नव्हतं. मी दुसऱ्या हाताने तिचा ड्रेस मागितला. आदूने काहीशा प्रश्नार्थक चेहऱ्याने मला तो दिला.

रंगमंच - ए थिएटर विथ कॉझ..

लेखक मनमौजी यांनी गुरुवार, 19/01/2017 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
*/

आपल्या आजूबाजूला तीन प्रकारची माणसं असतात. पहिल्या प्रकारची म्हणजे आमटे कुटुंबीयांसारखी, लोकसेवेला आयुष्य अर्पण केलेली. दुसरी म्हणजे कलाकार मंडळी, शिक्षण कशातही असलं तरी शेवटी आपल्या छंदासाठी आयुष्य ओवाळून टाकणारी आणि तिसरे म्हणजे आपण स्वतः.. साधीसुधी नोकरदार माणसं.. पोटापाण्यासाठी इमानदारीत नोकरी-धंदा करणारी.. आश्चर्य वाटेल, पण माधव आणि स्मिता कर्‍हाडे तिन्ही प्रकारात फिट्ट बसतात!

पृथ्वी थिएटर: गोष्ट एका स्वप्नपूर्तीची

लेखक विशाखा राऊत यांनी गुरुवार, 19/01/2017 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
*/

स्वप्नपूर्ती : पृथ्वी थिएटर राम राम मंडळी! काय, सर्व मजेत ना :). आपल्या लाडक्या मिपाचा दशकपूर्ती सोहळा सुरू आहे. सगळे जण त्यासाठी गोष्टींचा खजिना घेऊन येत आहेत. तर मग चला, आजच्या गोष्टीला सुरुवात करू. थिएटर हा शब्द खरे तर आला ग्रीक शब्दापासून θέατρον, (théatron - 'a place for viewing'), म्हणजेच दुसरा ग्रीक शब्द θεάομαι (theáomai - 'to see', 'to watch', 'to observe').

क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का?

लेखक ट्रेड मार्क यांनी गुरुवार, 19/01/2017 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात आणि मिपावरही नोटबंदीच्या निमित्ताने कॅशलेस होण्यावर बराच गदारोळ झाला आहे. हा धागा त्या गदारोळात भाग घेण्यासाठी नसून कॅशलेस पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड वापरणे खरंच फायद्याचे आहे का नाही हे स्वानुभवातून व उदाहरणासहित सांगण्याचा प्रयत्न आहे. सगळ्यात आधी हे सांगणे महत्वाचे आहे की हे अनुभव अमेरिकेतील आहेत. येथे आता बहुतेक सर्व दुकानांमध्ये क्रेडिट कार्ड्स वापरली जातात. किंबहुना एखाद्या ठिकाणी रोख दिले तर "बऱ्याच दिवसात एवढी रोख रक्कम बघितली नाही" असे बिलिंग काउंटरवरील व्यक्ती गमतीने म्हणते.