Skip to main content

तमिझ्(तमिळ)शिकण्यासाठी

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 22/02/2017 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
तमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक! सर्वात शुध्द द्रविड भाषा! म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड! कामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते. अशा तमिळ शिकणार्‍यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आहोत. पुस्तके,टिव्ही,इंटरनेट याद्वारे तमिळ शिकणारे काहीजण इथे एकत्र येत आहेत.प्रत्येकाची याबाबत प्रगती निरनिराळी!

मोबियस प्रकरणे भाग -२ : प्रकरणे १७-१८

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 22/02/2017 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
दरवाजाची चौकट एकदम अस्पष्ट झाली व तरंगत कुठेशी नाहीशी झाली. चंद्र...चंद्राचा रोगट प्रकाश... त्याचे डोळे त्या प्रकाशाला सरावताच त्या विवराचा तळ एखाद्या चमकदार पाण्यासारखा चमकू लागला. जणू काही त्या पाण्याला नवी पालवीच फुटली आहे.
मोबियस १७ तेवढ्यात विवराच्या कडेला पंख फडकताना जसा आवाज येतो तसा आवाज झाला.

आईसक्रीम

लेखक तिमा यांनी बुधवार, 22/02/2017 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
‘टबुडी टबुडी’ चाच (http://www.misalpav.com/node/26051) हा पुढचा भाग आहे असे समजावे, म्हणजे पुन्हा सर्व पात्रांची ओळख करुन द्यायची आवश्यकता नाही. तो वेडा जागा सोडून गेल्यावर तिथे दुसरे एक श्रीमंत गुजराती कुटुंब रहायला आले. त्यांचा बहारिनला मोठा धंदा होता. कुटुंब मोठे, मुख्य मोटाभाई म्हणजे आसुभाई, दोन तीन महिन्यांनी कधी एखादा आठवडा घरी यायचे. त्यांचे धाकटे भाऊ, नवीन आणि खिमन, मुंबईतला बिझिनेस सांभाळायचे. एक बहीण, बायको आणि दोन मुली आणि तीन मुले, शिवाय एक म्हातारी दमेकरी आई.

कदाचित (भयगुढ कविता)

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी बुधवार, 22/02/2017 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
कदाचित ही फक्त हवा असेल जी चाल करून येतीये विव्हळणाऱ्या जीर्ण फांद्यांना खिडक्यांवर फटकारतीये कदाचित हा फक्त पाऊस असेल जो ढगांना प्रसवतोय दाराछतातून टपटपून अंगावर बर्फशहारे आणतोय कदाचित ह्या फक्त सावल्या असतील ज्या श्वापदांसारख्या दिसताहेत सराईत शिकाऱ्यासारख्या मला चारीबाजूंनी घेरताहेत कदाचित हा फक्त कावळा असेल जो आत्ताच खिडकीवर धडकलाय रक्ताळलेली चोच आदळून काचांना तडे देत सुटलाय कदाचित हा फक्त भास असेल कुणीतरी जोरात किंचाळल्याचा आपोआप दिवे विझल्याचा अन मानेवरच्या उष्णगार श्वासांचा कदाचित भासच असेल हा कदाचित स्वप्न असेल कदाचित... ती आली असेल -------------------

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९९ - सुपर सिक्स - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रीका

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 22/02/2017 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
१३ जून १९९९ हेडींग्ली, लीड्स यॉर्कशायर काऊंटीचं माहेरघर असलेल्या हेडींग्लीच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात सुपर सिक्समधली शेवटची मॅच रंगणार होती. ऑस्ट्रेलियाच्या दॄष्टीने ही मॅच अत्यंत महत्वाची होती. सेमीफायनल गाठण्यासाठी ही मॅच जिंकणं अत्यावश्यक होतं. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रीका आणि पाकिस्तान यांनी आधीच सेमीफायनलम गाठली होती. पण या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्यास न्यूझीलंडविरुद्धची मॅच पावसात वाहून गेल्यामुळे एक पॉईंट मिळालेल्या झिंबाब्वेला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळाला असता!

मराठी भाषा दिन २०१७: पुणेरी कसे बनाल? (पुणेरी)

लेखक सपे-पुणे-३० यांनी बुधवार, 22/02/2017 06:16 या दिवशी प्रकाशित केले.
1

पुणेरी कसे बनाल?

पुणेरी मराठी भाषा, पुणेरी माणसांचे स्वभाव, पुण्याचे रस्ते, पुण्याची रहदारी, पुण्यातील दुचाकी आणि दुचाकी चालक, पुणेरी दुकानदार आणि गिर्‍हाइक अशा अनेक विषयांवर मिटक्या मारत, कुत्सितपणे चर्चा केली जाते. पुण्याला, पुणेरी माणसांना आणि तत्सम पुणेरी गोष्टींना नावं ठेवायचं काम पुण्याबाहेरील मंडळीच करतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे - न्यूनगंड! स्वतःला 'पुणेरी' बनता न आल्याने निर्माण झालेली कमीपणाची भावना! म्हणतात ना - कोल्ह्याला द्राक्षं आंबट, तसंच काहीसं.

मराठी भाषा दिन २०१७: प्राकृत

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 22/02/2017 06:15 या दिवशी प्रकाशित केले.
1 प्राकृत... कोसाकोसावर बदलणारी बोली भाषा सोडल्यास या जगाच्या पाठीवर अंदाजे दोन हजार भाषा बोलल्या जातात, असा अंदाज आहे. यातील बहुतेक भाषांचा अभ्यास झालेला आहे किंवा सुरू आहे. पण आफ्रिकेतील काही दुर्गम विभाग व ॲमेझॉनमधील काही घनदाट जंगलातील भाग जेथे अजूनही पुढारलेल्या (?) जगातील माणसे पोहोचली नाहीत, तेथील भाषांचा उगम कसा झाला किंवा भाषा ही संवादाचे साधन म्हणून कशी विकसित झाली, याचा अभ्यास अजूनही सुरू आहे. उदा. डॅनियल एव्हरेट याने एका जमातीच्या भाषेचा अभ्यास केला.

मराठी भाषा दिन २०१७ - हरनी (वर्‍हाडी)

लेखक ऊध्दव गावंडे यांनी बुधवार, 22/02/2017 06:13 या दिवशी प्रकाशित केले.
1 हरनी नख्खी नख्खीतुन बोंड कापसाचं फुललं पराटीच्या वावरातं जसं चांदनं सांडलं हे बावरली हरनी कोनं ऊभी वावरातं टाके चान्नी वानी बोंड पाठीवरं खंदाळीतं बोंडा बोंडाच्या मंधात गोलं मुखळा खुलला आजूबाजूनं चांदन्या मंदी चंद्र उजीळला मोठ मोठाल्या डोयानं कायं ईकळे पायते जीवघेनी ते नजरं घोरं जीवाले लावते ठुलं बांधूनं गाठोळं तुया येचल्या बोंडाचं सांगं कुठीसा ठेवलं बोंड माया हुर्दयाचं? -ऊद्धव गावंडे 1

शब्दप्रधान गायकी : यशवंत देव

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 21/02/2017 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदाच्या क्षणी कुणाच्याही मनात उमटणारी पहिली गोष्ट म्हणजे गाणं. खरं तर आनंद म्हणजे मनाचं काही काळासाठी स्थिर होणं आणि मग आत चाललेल्या अविरत वार्तालापाचा एक सुरेल ध्वनी होणं. हे मनातल्या शब्दांचे सूर होणं म्हणजे गाणं. यशवंत देवांचं `शब्दप्रधान गायकी' हे पुस्तक गाणं तयार होऊन अभिव्यक्त होणं आणि त्याचा एक माहौल तयार होणं या सकल प्रक्रियेचा एक समग्र वेध आहे. देव स्वतः जानेमाने संगीत दिग्दर्शक आहेत, कवी आहेत, गायक आहेत आणि सुगमसंगीताच्या एका प्रदीर्घ कालावधीचे प्रत्यक्ष साक्षी आहेत. अनेक प्रतीभावंत कवी आणि नामवंत गायकांकडून त्यांनी सुरेल गाणी घडवून घेतली आहेत.