मराठी भाषा दिन २०१७ - हरनी (वर्हाडी)
हरनी
नख्खी नख्खीतुन बोंड
कापसाचं फुललं
पराटीच्या वावरातं
जसं चांदनं सांडलं
हे बावरली हरनी
कोनं ऊभी वावरातं
टाके चान्नी वानी बोंड
पाठीवरं खंदाळीतं
बोंडा बोंडाच्या मंधात
गोलं मुखळा खुलला
आजूबाजूनं चांदन्या
मंदी चंद्र उजीळला
मोठ मोठाल्या डोयानं
कायं ईकळे पायते
जीवघेनी ते नजरं
घोरं जीवाले लावते
ठुलं बांधूनं गाठोळं
तुया येचल्या बोंडाचं
सांगं कुठीसा ठेवलं
बोंड माया हुर्दयाचं?
-ऊद्धव गावंडे

वाचने
18619
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
सुरेख!
वाह!
छान कविता उद्धवजी!
आय हाय हाय उद्ववभाऊ, एकदम
In reply to आय हाय हाय उद्ववभाऊ, एकदम by कैलासवासी सोन्याबापु
हेच आन् हेच मंतो, दोस्ता..
मस्त !
सुंदर !
खूप मस्त लिहिलय उध्धवजी!!
सुंदर !
हृद्य!
छान
छान
डोळ्यासमोर आल कापसाचं शेत
खूप छान कविता.
छान. लयीत म्हणता येईल अशी गेय
फार आवडली! साधी.. सहज...
कविता आवडली.
मस्त !!
आवडलीच!!
कविता आवडली !
गावंडे पाटिल
वा! सुंदर!
खूप सुंदर !!
मस्त कविता
आवडली!
धन्यवाद मित्रांनो!