Skip to main content

टोरोंटो, कॅनडा इथे कोणी मिपाकर वास्तव्यास आहेत का?

लेखक ट्रेड मार्क यांनी रविवार, 12/03/2017 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
टोरोंटो, कॅनडा इथे कोणी मिपाकर वास्तव्यास आहेत का? मला तिथल्या वास्तव्याविषयी थोडी माहिती पाहिजे.

रंग

लेखक परशु सोंडगे यांनी रविवार, 12/03/2017 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरीचे कान्हा तू जरा समजून घे. उधळून जीवास मी रंग माझे शोषून घे. मी चिंब रंगी तुझ्या बासरी दिल छेडते. रंगबावरी मी राधा सुराच्या रंगी न्हाते. परशुराम सोंडगे,पाटोदा 9673400928
काव्यरस

शुभ्रक्रांती

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी रविवार, 12/03/2017 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
“शुभ्रक्रांतीच्या रूपाने कृष्णवर्णियांच्या जिवनात नवीन सूर्य उगवलाय. मला आठवतोय तो दिवस जेव्हा गोऱ्यांनी आपल्यावर वांशिक हल्ला केला होता. पण यावेळी आपण संघटीत होतो. एकूणएक गोऱ्याला चिरडून टाकलं आपण, नामोनिशान मिटवून टाकलं त्यांचं या भूमीवरून. जॉनसारखे अनुयायी मिळाले म्हणून हे शक्य झालं.” “शुभ्रक्रांती जिंदाबाद, जॉन स्मिथ जिंदाबाद” अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला. मध्यरात्रीच्या सुमारास थकलाभागला जॉन घरी आला. हॉटेलमधून आणलेलं जेवण त्याने ताटात वाढलं. शुभ्रक्रांती ध्वजांच्या ढिगाऱ्यांतून मार्ग काढत तो अडगळीच्या खोलीत आला. अंधुक उजेडात अंगाचं मुटकुळं करून ती बसलेली होती.

होळीच्या निमित्ताने

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 12/03/2017 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
आपण आजवर अनेक कथा एकल्या आणि वाचल्या आहेत होळी सणासंदर्भात! त्यातली सर्वसाधारणपणे सर्वांनाच माहित असणारी कथा म्हणजे  दुष्ट हिरण्यकष्यपू राजाची! हिरण्यकश्यपू राजाने आपला मुलगा प्रल्लाद श्रीविष्णूचा भक्त आहे हे समजल्यानंतर त्याला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे अग्नीमध्ये न जळण्याचा वर मिळालेल्या होलिकेला त्याने प्रल्लादकडे पाठवले. होलीकेने प्रल्लादाला आपल्या मांडीत बसवले आणि चारही बाजुने अग्नी प्रज्वलित करून घेतला. प्रल्लादाने डोळे मिटून श्रीविष्णूची प्रार्थना करायला सुरात केली आणि आपल्या भक्ताची हाक एकून श्रीविष्णूने होलिकेचे दहन केले.

Naked नक्की पाहायला हवी अशी शॉर्ट फिल्म !

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 12/03/2017 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यातला विषय काही नवा नाही. निष्कर्ष तर अजिबातच नवा नाही पण फक्त नाविन्याचीच कास धरायची गरज काय आहे... कालिदासाच्या शाकुन्तलापासून जुही चावला आणि ऋषी कपूर च्या "बोल राधा बोल" पर्यंत आपण दिल चुराके भागणेवाला परदेसी बाबू आणि गाव कि भोली भाली गोरी(भारतातल्या गावच्या पोरी आणि गोरी?.....) च्या कथा ऐकत वाचत पाहत आलो आहेतच कि ...तेहा तेच तेच पुन्हा पून्हा पाहण्याचे आपल्याला काही इतके वावडे नाही .... नक्की बघा , लिंक दिलेली आहे https://www.youtube.com/watch?v=R29hoYjAF6w

पत्र व्यवहार ... एक दुर्मिळ होत चाललेलं काम , कौशल्य ...काय म्हणाल ?

लेखक १००मित्र यांनी रविवार, 12/03/2017 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
आजच सकाळी (रविवार) जुन्या गोष्टी हाताळत असताना एक जुनं पोष्ट-कार्ड (हो हो पो”ष्ट” च) हाती लागलं. फार जुनं नाही , १० एक वर्षांपूर्वीचं. पण “दुर्मिळ” वाटावं इतकी ही पत्र लिहिण्याची-पाठविण्याची सवय पार भूतकाळात गेल्यासारखी वाटतीये आता. ह्या पत्रामुळे अनेक गोष्टींची विचार शृंखला जागृत झाली, शिवाय रविवार असल्याने विचारांना पसरायालाही मी भरपूर वावही दिला. आता खरं म्हणजे इतरही वार मला असा वेळ नक्कीच देवू शकतात बरंका. पण “रविवार” डोस्क्यात बसलाय , तो त्याचं एक विशिष्ट स्थान घेवून.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०१५ - सेमीफायनल - दक्षिण आफ्रीका विरुद्ध न्यूझीलंड

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 12/03/2017 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
२४ मार्च २०१५ इडन पार्क, ऑकलंड ऑकलंडच्या इडन पार्कवर यजमान न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल रंगणार होती. क्वार्टरफायनलमध्ये मार्टीन गप्टीलच्या २३७ रन्सच्या इनिंग्जमुळे न्यूझीलंडने वेस्ट इंडीजला १४३ रन्सनी धूळ चारली होती तर श्रीलंकेविरुद्धची क्वार्टरफायनल आरामात जिंकून दक्षिण आफ्रीकेने सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता. १९९२ मधल्या आपल्या पहिल्या वर्ल्डकपपासून अखेर ७ व्या वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रीकेने नॉकआऊट स्टेजमध्ये आपली पहिली मॅच जिंकण्यात यश मिळवलं होतं. न्यूझीलंडची ही ७ वी सेमीफायनल तर दक्षिण आफ्रीकेची ४ थी!

घे भरारी..मन म्हणाले...

लेखक सत्यजित... यांनी रविवार, 12/03/2017 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
घे भरारी..मन म्हणाले,पाखरु झालो... सोडले घरटे..नभाचे लेकरु झालो! जाहला अंधार तेंव्हा दाटली भीती... वाटले की..वाट चुकले कोकरु झालो! राजरस्त्याची तमा ना आडवाटेची... मी तुझ्या कळपात घुसलो,मेंढरु झालो! गाव सारा गाय का म्हणतो तुला कळले... धन्य झाला जन्म की मी वासरु झालो! बासरीचा सूर होणे मज कुठे जमले? राधिकेच्या पैंजणांचे घुंगरु झालो! हुंदके दाबून सारे स्वागता गेलो... अन तुझ्याही हुंदक्यांशी रुबरु झालो! घेतली हाती कलम बहुधा बरे झाले... मी मुक्या संवेदनांची आबरु झालो! —सत्यजित

अशी व्हती आमची होळी.....

लेखक इरसाल कार्टं यांनी रविवार, 12/03/2017 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
व्हलीचे पाच दिवस आगोदार व्हलीला सुरवत व्हायची..... गावान जर एकी आसंल त तरणी पोरा एक व्हवून बैलगारी घेऊन रानात लाकरा आनाय जायाची. महामूर लाकरा आसायची म्हून व्हलीचे दिवसापरेत बारकी व्हली पेटायची. व्हलीचे दिवस सांचे ज्याची त्यानी लाकरा बिदीव आनून टाकायची. खरा म्हजे कुर्हाडीन फुटत नसतील आसं लाकराचं वंडं लोखा लय करून व्हलीला दियाची. म एक-दोन बैलगार्या जुपून व्हलीचे खासरान लाकरा पोचती व्हयाची. व्हलीचे दिवस राच्चे 8-9 वात्ता बाया नटून-थटून व्हलीव आरती घेऊन जमा व्हयाच्या. दरम्यान देवलान भजन सुरू असायचा. नंतर भजने भजन करीत-करीत व्हलीव जानार. व्हली पेटवायचा मान मातर गावचे पोलीस पाटलाचाच असायचा.

गाता रहे मेरा फिल्मी दिल

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 11/03/2017 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
गाता रहे मेरा फिल्मी दिल दहावी पास होई पर्यन्त माझी चित्रपटीय ( भक्त म्हणून ) वाटचाल अगदीच अगाध होती. "तू एकदा दहावी पास हो मग तूला घरी केबल लावून देइन" हे आईने दिलेले आश्वासन मला दहावीची परिक्षा पास होण्यास पूरेसे होते. तो पर्य.न्त गाण्याच्या भेण्ड्यातील माझे योगदान हे " शेवटचे अक्षर "ळ" आल्यास " ल" घेता येइल का? किन्वा " आता म्हटलेले गाणे मागे म्हटले गेले होते काय यावर चर्चा करणे येथ पर्‍यन्त सिमीत होते. शाळेतली मुले गाण्याच्या अन्तरा बरोबर पूर्ण दोन-तीन कडवी म्हणताना पाहून मला अचम्बीत व्ह्यायला होई. माझे चित्रपटातले करीयर हे खरे पहाता दहावी नन्तर सुरू झाले असे म्हणायला हरकत नाही.