पत्र व्यवहार ... एक दुर्मिळ होत चाललेलं काम , कौशल्य ...काय म्हणाल ?
आजच सकाळी (रविवार) जुन्या गोष्टी हाताळत असताना एक जुनं पोष्ट-कार्ड (हो हो पो”ष्ट” च) हाती लागलं. फार जुनं नाही , १० एक वर्षांपूर्वीचं. पण “दुर्मिळ” वाटावं इतकी ही पत्र लिहिण्याची-पाठविण्याची सवय पार भूतकाळात गेल्यासारखी वाटतीये आता. ह्या पत्रामुळे अनेक गोष्टींची विचार शृंखला जागृत झाली, शिवाय रविवार असल्याने विचारांना पसरायालाही मी भरपूर वावही दिला. आता खरं म्हणजे इतरही वार मला असा वेळ नक्कीच देवू शकतात बरंका. पण “रविवार” डोस्क्यात बसलाय , तो त्याचं एक विशिष्ट स्थान घेवून. नोकरशाहीचा परिणाम , की “८ तास आठवडाभर वर्किंग व एक दिवस विश्रांती” ह्या कामाच्या व्यवस्थेमुळे हे असं झालंय, देवास ठाऊक. पण मुद्दा तो नाही. मुद्दा पत्र व्यवहारांचा आहे.
http://phirasta.com/wp-content/uploads/20170312_094940-e1489296210930.jpg
ही अशी पत्र लोकं लिहीत असत , आणि असा लोकांमध्ये बांध बांधला जात असे. आता संवाद साधताना लिहिण्याचाच मुळात प्रश्न उरलेला नाही , तर मग अशा बिचाऱ्या संगणक-अशिक्षित (साध्या मऱ्हाटी भाषेत Computer not savvy हो) मंडळींनी कुठे जायचं ? परवाच माझ्या कार्यालयातील एका सहकारीण भगिनीला ( जी अशी Computer savvy वगैरे आहे) एक पोस्ट कार्ड टाकायला दिलं , तर तिला आयुष्यात प्रथमच अशा गोष्टीचा म्हणे शोध लागला. बरोबरच आहे ना , कारण जेव्हा पासून तिनं होश वगैरे सावरला, म्हणजे तिला कळू वगैरे लागलं तेव्हापासून ती फक्त इमेल्स पाहतीये. अशी पत्र बित्र म्हणजे फक्त “जा-जा” गाण्याकारेता , अशी तिची ठाम समजूत होती तोपर्यंत. तरी बरं ; आम्ही काही वस्तू “Speed Post” ह्या मार्गाने पाठवितो म्हणून पोस्ट ऑफिस तरी ठाऊक झालाय !
पत्र-मैत्र
माझी पत्नी, स्वाती हिला प्रचंड पत्र येत. येत म्हणजे.... ती अजूनही आहे, पत्र मात्र येत नाहीत. ती तिच्या सर्व मैत्रीणीत ह्याकरिता अगदी प्रसिद्ध होती. आमचं लग्न झाल्यावर मी अगदी चकित होवून जायचो. पोस्टमन रोज आमच्याकडे एक तरी पत्र टाकायचाच. स्वाती सुद्धा अत्यंत आत्म-मग्न होऊन तिच्या मित्र मैत्रिणींशी पत्र-संवाद साधायची. ती मूळ पोफळीची. तिने एकदा एका दिवसात २३ पत्र लिहिली होती, आणि एकदा तिला तब्बल १४ पत्र आली होती. तिचं काही जणींशी असं पत्र-मैत्र जरा खासच असायचं. तिची अनु नावाची एक खास मैत्रीण आहे. काश्मीर ट्रीप ला गेलेली असताना, ती रोज एक पत्र तिला पाठवित असे म्हणे.
अशीच पत्र आमच्याकडे एक श्री.नानल नावाचे एक सद्गृहस्थ पाठवित असत. ह्यांचा आमचा काहीच संबंध नव्हता, कधी भेटलोही नाही त्यांना, परंतु ही व्यक्ती मात्र मला, माझ्या बहिणी वगैरेंना हमखास पत्रे पाठवीत असे. हे प्रसंग साधारणपणे परीक्षांची तयारी , त्यातील यश वगैरे ह्या संबंधी असायची. विशेष म्हणजे ही पत्र बऱ्यापैकी कलरफुल असायची. वेगवेगळ्या परीच्छेदांना ते वेगवेगळ्या रंगांच्या लेखण्यांनी रंगवायचे. खूपच छान पत्र असायची ती. हेही एक पत्र-मैत्रच.
मी कोणताही अधिकृत-म्हणजे कार्यालयीन पत्र व्यवहार करताना त्याच्या साधारणत: ३ प्रती करायचो. पहिले त्या पार्टीला , दुसरी “जनरल” व तिसरी “मास्टर” फाईल ला जोडत असे. परिणाम असा व्हायचा की कोणताही कागदाचा कपटा सापडायचाच. सर्व्हर,कनेक्शन भानगड नव्हती. त्या यंत्रणेतले फायदे-तोटे हा विषयच इथे नाही, फक्त नोंदवतोय-झालं. बाहेर गावी गेलो, कि तिथून पत्र पाठवायचं, पुन्हा. माझा एक मित्र – श्री सुनील पवार हा त्याच्या बरोबरच्या मेडिकल प्रतिनिधींना (MR) प्रत्येक दिवशी त्या त्या ठिकाणाहून एक पत्र धाडायला सांगत असे. आपोआप “लोकेशन” ट्रेस व्हायचं. जीपीएस नसून सुद्धा. मग हळू हळू कुरियर, fax , मग कालांतराने इमेल , आता एसेमेस , whatsapp इ. येत गेलं.
तातडीचा संवाद किंवा निरोप हा “तार” करून दिला जायचा. मला आठवतंय , अनेक साखर कारखान्यांच्या “मिटींग्ज” ची मला तारच येत असे. तार म्हणजे समथिंग अर्जंट – असा एक अलिखित समज होता. ही “तार” आली कि कोण धावपळ. तरी मी ह्या “तारे”च्या जमान्यातला नाही तितका. नुकतीच तार व्यवस्था हद्दपार झाली. पूर्वी Post and Telegraph ( p & t) हा एक खास विभाग होता. माझे आजोबा त्याच खात्यातून निवृत्त झाले; मुलुंड ला p & t कॉलनी सुद्धा होती, अजूनही असेल कदाचित.
इमेल्स व कचरा
सध्या हेच आपण सगळे इमेल्स करत असतो, राहतो. इमेल्स वगैरेचं महत्त्व , ते कसं अविभाज्य आहे, डिजिटल लिटरसी कशी महत्त्वाची आहे, हे मी सतत ऐकतच असतो; त्याबद्दल दुमत नाहीच , पण काळाच्या ओघात एखादं लुप्त होत चाललेलं नित्यकर्म - ह्याची ओळख-आठवण व्हावी इतकाच ह्या स्वैर लेखनाचा हेतू.
एखादाच माझा गणेश गायकवाड सारखा मित्र मला कधीतरी पत्र लिहून पोष्टात टाकायला सांगतो, किंवा एखाद्या “मागास” भागात राहणारा माझा कुणीतरी सख्या हरी – जेव्हा त्याला इमेल पोचतच नाही , तेव्हाच फक्त मी पोस्ट ऑफिस चं तोंड पाहतो !
नाहीतर आहेच इनबॉक्स, स्पॅम , अर्थात ... कचरा. जय मार्केटिंग युग !
वर्गीकरण
खरेच पत्र लिहायचा आनंद काही
In reply to खरेच पत्र लिहायचा आनंद काही by ज्ञान
अजूनही लिहिता का ?
कालमानाप्रमाणे येणार्या
In reply to कालमानाप्रमाणे येणार्या by डॉ सुहास म्हात्रे
बाकी, जुन्या नष्ट होत
चिठ्ठी आई है चिट्ठी से चिट्ठी
In reply to चिठ्ठी आई है चिट्ठी से चिट्ठी by अरुण मनोहर
आता चिठ्ठी whatsapp वरूनच !
In reply to चिठ्ठी आई है चिट्ठी से चिट्ठी by अरुण मनोहर
पाकीट बाबा है, बाबा है, बाबा
ते पत्रलेखनाचा आनंद वगैरे ठीक
In reply to ते पत्रलेखनाचा आनंद वगैरे ठीक by सतिश गावडे
मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल आभार !
In reply to मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल आभार ! by १००मित्र
मी अगदी इंजियरिंगला असेपर्यंत
In reply to मी अगदी इंजियरिंगला असेपर्यंत by सतिश गावडे
गुलाबी पत्रे?
In reply to मी अगदी इंजियरिंगला असेपर्यंत by सतिश गावडे
लवकर सुरुवात करा .
कागदावर लिहिलेल्या शाईच्या
In reply to कागदावर लिहिलेल्या शाईच्या by एस
अगदीच !
In reply to अगदीच ! by १००मित्र
<<<सतत वेगातच गम्मत असते असं
In reply to <<<सतत वेगातच गम्मत असते असं by विशुमित
संगणक संस्कृती म्हणजे पटापट
लेखन आवडले. पत्रव्यवहाराचा
In reply to लेखन आवडले. पत्रव्यवहाराचा by रेवती
हे एक डबल चेकिंग , फारच
पत्र लिहायला विषयच सुचत नाहीत
पत्र हा आजही जिव्हाळ्याचा
In reply to पत्र हा आजही जिव्हाळ्याचा by मितान
मग तुम्हीच अनुकरणीय ! अभिनंदन
In reply to पत्र हा आजही जिव्हाळ्याचा by मितान
आपला जुना २०१० चा लेख वाचण्यात आला.
लेखन हा कायम संवाद आहे
In reply to लेखन हा कायम संवाद आहे by संजय क्षीरसागर
तुम्ही ते पत्रानं करता की
In reply to लेखन हा कायम संवाद आहे by संजय क्षीरसागर
अजूनही एक गोष्ट सुचली :-
छान लेख
In reply to छान लेख by पैसा
दोन्ही लेख अगदी भरभरून वाचले.
In reply to दोन्ही लेख अगदी भरभरून वाचले. by १००मित्र
"आधुनिक तंत्रज्ञान वापरून हे
In reply to "आधुनिक तंत्रज्ञान वापरून हे by डॉ सुहास म्हात्रे
त्याच्या पलिकडचच तर पकडायचय ना !
पूर्वी पत्रांतही तत्कालीन
In reply to पूर्वी पत्रांतही तत्कालीन by आदूबाळ
:-))))))))))
मिपाकरांना जाहीर पत्रं
In reply to मिपाकरांना जाहीर पत्रं by कपिलमुनी
कोणाचं कसं अक्षर आहे हे तरी
आजच हे पाहिले. पत्राच्या