वेडे'कर'णारी बेडेकर मिसळ
पुण्यातील रविवार सकाळ. खरं तर ही वेळ म्हणजे 'सकाळ' च्या बातम्या वाचत (चितळे च्या दुधाचा) चहा पीत आता ब्रेकफास्ट ला रूपाली, गुडलक आणि बेडेकर ह्यापैकी कुठे जायचं हे ठरवण्याची वेळ. पण बायको सुद्धा बरोबर येणार असेल तर हा प्रश्न सहज सुटतो (तिच्या इच्छेनुसार जातो. सकाळी सकाळी वाद कशाला ?!) मित्राबरोबर जायचं असेल तर मग भरपूर चर्चा होऊन ठिकाण निश्चित होतं.
गेली ४ वर्षे मस्कत ला नोकरीनिमित्त स्थायिक असल्याने आता मात्र रविवार हा ऑफिस चा पहिला दिवस असतो (इकडे शुक्र -शनि वीकएंड!) पुण्यातील मित्रांच्या भाग्याचा हेवा करीत गप-गुमान ऑफिस ला जावं लागतं...
मिसळपाव