Skip to main content

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ३)

लेखक Anand More यांनी सोमवार, 24/04/2017 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीपूरच्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असते मंजुनाथाचे मंदिर. हा मंजुनाथ भारतीपूरच्या पंचक्रोशीत आपली सत्ता गाजवत असतो. त्यासाठी त्याचा सहाय्यक असतो भूतराया नावाचा देव. तो अंगात येतो आणि लोकांवर वचक ठेवतो. मंजुनाथ सर्वशक्तिमान पण निष्क्रिय असतो तर भूतराया सेवक पण क्रियाशील असतो. या भूतरायाची कीर्ती इतकी मोठी की प्रत्यक्ष राष्ट्रपती त्याच्या दर्शनाला येऊन जातात आणि प्रसाद म्हणून कपाळभर कुंकू माखून घेतात. भूतरायाचा प्रभाव एव्हढा मोठा की भारतीपूरमध्ये कोणीही आपले वाद विवाद कोर्टात घेऊन जात नाही. सगळे वादविवाद भूतरायच्या मर्जीने सुटतात.

प्रिय सचिन

लेखक चिनार यांनी सोमवार, 24/04/2017 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे सचिन...!! आजकाल तुझ्याविषयी बोलणं..लिहिणं...इतकंच काय तुला टीव्हीवर बघणंही सोडून दिलंय मी.. का म्हणजे काय?? त्रास होतो रे..खरंच खूप त्रास होतो... आज तुझा वाढदिवस आहे...म्हटलं बघूया, जमतंय का काही लिहायला.. लिहायला लागतंच काय रे??

अता ही भेट टळणे शक्य आहे ..

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 24/04/2017 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
अता ही भेट टळणे शक्य आहे (तुझे मजला वगळणे शक्य आहे) जरासा जोर लावावास अजुनी पहा माझे निखळणे शक्य आहे नको इतकी मुजोरी आरशावर तुझेही रुप ढळणे शक्य आहे असे येऊ नये वेळीअवेळी (कुणी काही बरळणे शक्य आहे) जरा जपूनीच ये ग्रीष्मात इथल्या तुझी काया वितळणे शक्य आहे तुला पाहून येथे एकटीला फुलांचे बावचळणे शक्य आहे डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

ती एकदाच दिसली...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 24/04/2017 05:01 या दिवशी प्रकाशित केले.
ती एकदाच दिसली अन् छंद होत गेला दिनदर्शिका-फुल्यांचा धरबंद होत गेला! होती कथा विराणी,झाली गझल रुमानी बहुधा पुन्हा व्यथेला,आनंद होत गेला! शर खोल-खोल रुतला नजरेतला तिच्या अन् एकेक मंद ठोका मग बंद होत गेला! केसांत मोकळ्या त्या मन गुंतवीत गेलो कमळात बंद भुंगा स्वच्छंद होत गेला! टिपतो सुगंध वारा..उबदार ओंजळींनी बागेतल्या कळ्यांचा गुलकंद होत गेला! ती गुणगुणत असावी बहुतेक शेर माझे प्रत्येक शब्द माझा मकरंद होत गेला! केंव्हातरी अचानक येतो सुगंध अजुनी हा कायदा ऋतूंचा,बेबंद होत गेला! —सत्यजित
काव्यरस

डिअरपिअर...मॅकबेथले... काळाची उधई गिळी टाकई!

लेखक माहितगार यांनी रविवार, 23/04/2017 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
(माफी नाम्यांची रांग आहे, विडंबन काळाची मांग आहे प्रेर्ना १ प्रेर्ना २) अरे डिअरपिअर कशास बघतोस स्वप्नात जुई...

पुस्तकदिनानिमित्त विडंबन- (बघ माझी आठवण येते का?)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी रविवार, 23/04/2017 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
सौमित्र आणि शेक्सपिअर दोघांची क्षमा मागून :- रात्री दिव्याखाली ’मॅकबेथ’ हाती घेऊन पहा बघ माझी आठवण येते का? पाने चाळ, पाचव्या ऍक्टचा पहा पाचवा प्रसंग मॅकबेथची सॉलिलॉकि वाचून टाक बघ माझी आठवण येते का? डोक्यावरून जाणारे इंग्रजी शब्द ऑक्सफ़र्डमध्ये बघ डोके आपटून घे, वैतागून जा नाहीच कळलं काही तर बंद कर ते,’सॉनेट्स’ घे त्या डोक्यावरून जातीलच,शब्दांची जुळवाजुळव करून अर्थ लावून पहा भंडावून जाशील तू, बघ माझी आठवण येते का? मग सुरू हो, शेक्सपिअरची सगळे साहित्य चाळून घे चाळत रहा पुस्तके संपेपर्यंत, काही कळणार नाहीच, शेवटी रडून घे कपाट बंद करू नकोस, दिवा मालवू नकोस, पुन्हा तेच मॅकबेथ हाती घे आता नवऱ्
काव्यरस

नातं..!

लेखक हर्षु यांनी रविवार, 23/04/2017 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
नातं हे दोन व्यक्तींमध्ये असतं, मग ते कुठलेही असो. पण यातील मैञीच्या नात्यात आपण आपली सगळीच नाती जगु शकतो, बघु शकतो, आणि जेव्हा या सुंदर नात्यामध्येआपल्या नकळत का होइना पण, संध्याकाळच्या वेळी कमळ फुलावर बसलेला भ्रमर जसा सकाळपर्यंत त्यात कैद होतो, अगदी तसाच कटुपणा कैद होवु पाहतो तेहा मन नावाचा अवयव अगदीच हेलावुन जातो. नातं जोडण्यासाठी जश्या दोन व्यक्ती लागतात, तसेच ते टिकवण्यासाठी सुद्धा दोघांचे प्रयत्न सुद्धा गरजेचे असतात.

इंग्लंड भटकंती भाग ६ - पूल बाईक शो आणी मूर्स व्हॅली

लेखक अभिजीत अवलिया यांनी रविवार, 23/04/2017 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भागाची लिंक इंग्लंड भटकंती भाग ५ - पूल मे आणी जून ह्या दोन महिन्यात पूल शहराच्या समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या भागात पूल बाईक शो भरवला जातो. अनेक लोक त्यांच्या वेगवेगळ्या बाईक्स आणून प्रदर्शनात मांडतात आणी त्यातून एक विजेती बाईक निवडली जाते. प्रदर्शन पाहायला कोणतेही तिकीट नाही. प्रदर्शनात पाहिलेल्या काही आवडलेल्या बाईक खाली.

काही कविता अशा..तर काही तशा! - भाग १

लेखक पद्मावति यांनी रविवार, 23/04/2017 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
काही कविता मनात अलगद उतरतात, काही कविता अगदी खोलवर रुततात.. काही कविता हातात येता येता सूळ्ळकन निसटतात तर काही धडधडत वेगाने डोक्यावरून जातात काही मनाला पटतात तर काही पटुनही नकोशा वाटतात काही टच्चकन डोळ्यात पाणी आणणार्‍या, काही मात्र फक्त शब्द उधळणार्या... काही कविता अंतर्मुख करणार्‍या तर काही कविता सुंदर पण परकाश्या वाटणार्या काही असतात फील गुड कविता तर काही असतात 'काहीही हं' टाईप्स कविता .... काही कविता मात्र सहज समजतात, मनमोकळ्या भेटतात, लयीत गुंफतात, जिभेवर वसतात, मनात भिनतात.....या कविता 'आहा..क्या बात है' अशी उत्स्फूर्त दाद क्षणार्धात घेऊन जातात!! अशीच एक नितांत सुंदर कविता-- मिपाक

चकल्या….. ३४२५

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 23/04/2017 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. यावेळी तुमच्यासाठी एक चॅलेंज टाकलं आहे. तिसरी कथा मजेदार आहे…पण ती आहे अपूर्ण. तुम्हाला येईल का ती पुर्ण करता? … १) १२३४५६७८९…… मी माझ्या बायकोच्या दबावा मूळे या प्रयोगात सामिल झालो होतो. माझ्या कवटीला भोक पाडताना सुध्दा ती डॉक्टरांना अखंड सूचना देत होती. माझे डोके बधिर असल्यामुळे परत बधिर करायची गरज नाही असे तिनेच डॉक्टरांना सांगीतले होते, ऑपरेशन सक्सेसफुल, डॉक्टरांनी जाहिर केले, आणि हिच्या चेहर्यावर आन्ंदाचा महापुर उसळला, लगेच तिने पर्स मधुन एक बटाटा काढून डोक्याच्या पोकळीत टाकला. आणि आन्ंदाने म्हणाली “ बरं झाल!