Skip to main content

स्त्रीया आणि कॉपीराईट

लेखक माहितगार यांनी सोमवार, 01/05/2017 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
लेख शीर्षक स्मजण्यास सोपे जावे म्हणून कॉपीराईट हा शब्द प्रयोग केला असला तरीही या लेखातून एकुणच बौद्धीकसंपदा कायद्यांचा उहापोह करण्याचा मानस आहे. कॉपीराईटमुळे कलाकृती हा शब्द प्रयोग लेखनात पुन्हा पुन्हा वापरला जात असला तरीही सॉफ्टवेअर सारख्या मोठा सेवा उद्योग बौद्धीक संपदा कायदे आणि कॉपीराईट कायद्यांने संरक्षीत पायावर ऊभा आहे हे लक्षात घेऊन मी तर कलाकार नाही मला याचे काय काम असा विचार सुरवातीसच टाळलेला बरा असे वाटते. सप्तरंगी यांच्या चित्र विषयक माझी काही ट्युलिप्स पेंटिंग्स या धाग्यावर चित्रांवरील कॉपीराईट बद्दल चर्चा करण्याचा योग आला.

ये कश्मीर है - दिवस दुसरा - १० मे

लेखक एक_वात्रट यांनी सोमवार, 01/05/2017 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
टीपः छायाचित्रांवर टिचकी दिल्यास ती मोठ्या स्वरूपात पाहता येतील. आज आमच्या काश्मीर सहलीचा पहिला दिवस. आम्ही हाउसबोटीबाहेर पडलो आणि शेजारच्या बागेत गाडीची वाट पहात बसलो. ही बाग महानगरपालिकेने बनवलेली एक छोटीशी पण देखणी बाग होती. बागेत माझे लक्ष वेधून घेतले ते दोन गोष्टींनी. पहिली गोष्ट म्हणजे बागेत उभा असलेला चिनारचा प्रचंड वृक्ष आणि दुसरी गोष्ट म्हणजे जागोजागी फुललेले गुलाब. या गुलाबांमधे लाल, पांढरा, गुलाबी असे अनेक रंग होते. एकेका झाडाला अक्षरश: शेकड्यांनी फुले लगडलेली होती आणि सगळी एकजात टपोरी. कुंपणांवर सोडलेले ते गुलाब पाहून मला आपल्या इकडच्या गुलबकावलीची आठवण आली.

जीत्याची खोड

लेखक संदीप-लेले यांनी रविवार, 30/04/2017 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
समोरून येत आहे ती व्यक्ति . . वर्णाने जातीने धर्माने शक्तीने विचाराने हुद्याने कर्तुत्वाने ऐपतीने . . काळी का गोरी? . अरे ! हा तर यमदूत !
काव्यरस

आठवणीच भारी!

लेखक अज्ञात यांनी रविवार, 30/04/2017 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
zip माझ्या कडे लिहायला काही नाहीये सध्या, सीरियल्स, चित्रपट, गाणी आणि अन्वयाचे छोटे किस्से सोडले तर काहीच लिहिले नाहीये गेले वर्ष, दीड वर्ष... आणि तितक्यात एक लेख वाचला, लेखाची सुरुवात काहीशी अशी - 'तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी.' आणि शेवट असा - 'दुःख गाव हरवल्याचं आपल्याला कधीच नव्हतं. गाव हरवला हरकत नाही. गावपण हरवायला नको होतं.' ह्या लेखावरून मी परत गेलो ना...

ये कश्मीर है - दिवस पहिला - ९ मे

लेखक एक_वात्रट यांनी रविवार, 30/04/2017 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
काश्मीर हे भारतातले सगळ्यात प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे यात काही वाद नाही. फिरायला जायच्या ठिकाणांची भारतात कमतरता नाही, पण काश्मीर या नावाभोवती जे कोंदण आहे ते इतर कुठल्याच पर्यटनस्थळाला नाही. निसर्गसौंदर्य पहायला आवडणा-या प्रत्येक भटक्यासाठी भारतात काश्मीर आणि परदेशात स्वित्झर्लंड ही दोन्ही स्वप्न-गंतव्ये असतात हे नक्की. २०१५ वर्षीच्या मे महिन्यात आम्ही काश्मीरचा प्रवास केला. हे प्रवासवर्णन हे म्हणजे त्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.

मैत्रि...

लेखक DTPS यांनी रविवार, 30/04/2017 04:03 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते कधि हसून तर कधि मुक्त रडून ति कुलवायची असते गरज नाही रोजच भेटले बोलले पाहिजे पण मनापासुन एकदा तरि आठवण काढायची असते मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते... कोण आपले कोण परके हे भेद मैत्रित विसरायचे असते सगळ्यांना सोबत घेऊन जगायचे असते भांडण रुसवे फुगवे आनंदाने उपभोगायचे असते मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते.... फायद्या तोट्याला इथे किंमत नसते सगळी गोळा बेरीज शेवटि शून्यच असते हेवे दावे सारे काही इथे गौंन असते मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते.... आयुष्याच्या शेवटी हि मैत्रिचि कुपी अलगद उघडायची असते आठवणींच्या रम्य स्वप्नात सैर करायची असते

ओंजळीने ती जसा,झाकून घेते चेहरा...

लेखक सत्यजित... यांनी रविवार, 30/04/2017 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
ओंजळीने ती जसा झाकून घेते चेहरा... का कसा ठावूक नाही,लाल होतो मोगरा! मोकळ्या केसांतुनी बहरून येतो केवडा अन् बटांचा जीवघेणा पीळ दिसतो कोबरा! आरसा घायाळ होतो ती जशी डोकावते केवढी नाजूक आहे,हीच का ती अप्सरा! ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी खेचतो भोळ्या जिवाला पाकळ्यांचा भोवरा! काय सांगू केवढी असते सुगंधी भेट ती? ती फुलांची पाहुणी अन् मी फुलांचा सोयरा! —सत्यजित

बाहुबली २ - The Conclusion

लेखक समीर_happy go lucky यांनी शनिवार, 29/04/2017 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण भारतीय चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा ते निर्विवादपणे नायक प्रधानच असतात. नायक प्रधान अन कहाणी असूनही कहाणीत नायकाच्या चारित्र्याला वेगळ्या उंचीवर सामान्यांच्या आवाक्याबाहेर पोचवणारे. अमोल पालकरांच्या छोटी सी बात सारखे हलके फुलके करमणूक प्रधान चित्रपट दक्षिण भारतात बनतात कि नाही दे जाणे. अर्थात "देव जाणे" कारण भाषा सीमा. तर हा भाग बाजूला ठेवू पण बाहुबली २ म्हणजे भारतीय किंबहुना दक्षिण भारतीय सिनेमा हा खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर पोचला असेच म्हणावे लागेल.

कथुकल्या ५ ( विज्ञानकथा स्पेशल )

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 29/04/2017 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
१. टेस्ट सब्जेक्ट नाकातून परत रक्त यायला लागलं. मी खिशातल्या रूमालाने नाक पुसलं. कमाल आहे, यावेळचं रक्त लालऐवजी काळपट दिसत होतं. कदाचित रस्त्यावरच्या उघडझाप होणाऱ्या दिव्यांमुळे तसं दिसत असावं. “मुव्ही आवडला का रे?” प्लियानीने आपला रेशमी हात माझ्या गळ्यात टाकत विचारलं. ती माझ्या इतकी जवळ असूनसुद्धा तिचा सहवास मला जाणवत नव्हता. पण परफ्युमचा मंद मोहक चंदनी सुगंध मात्र मनाला मोहवून टाकत होता. हा सुगंध मला पृथ्वीची आठवण करून देतो. “तुला मुव्ही आवडला का ?” तिने परत विचारलं. “हो.