Skip to main content

दक्षिणायन चित्रपटांचे !

लेखक धर्मराजमुटके यांनी शनिवार, 22/07/2017 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
युट्युबवर शोधतांना उत्तम दर्जाचे मराठी चित्रपट जास्त सापडत नाहित. जे उत्तम आशय असलेले आहेत ते उत्तम दर्जाचे चित्रिकरण असलेले असतीलच असे नाही. बहुसंख्य मराठी, हिंदी चित्रपट एकतर नवीन आले असताना चित्रपटगृहात बघीतलेले असतात किंवा थोड्याच दिवसात युट्युब, टोरंटस वर मिळतात. हॉलीवुड चित्रपट देखील बरेच पाहायला मिळतात. पण ते कधी कोणत्या प्रकारचे धक्के देतील ते सांगता येत नाही म्हणून घरात बघण्याला मर्यादा येतात. या सगळ्या चित्रपटांच्या भाऊगर्दीत दक्षिणेचे चित्रपट पहायला सुरुवात केली आणि मग ते आवडू लागले. विशाखापटटणमला कंपनीच्या कामानिमित्त महिनाभर रहावे लागले होते.

चंद्रकिनार

लेखक चांदणशेला यांनी शनिवार, 22/07/2017 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
मावळतीच्या चंद्रकिनारी श्रावणाची चिंब पहाट उतरुन आला शुक्र निळी निळी पाऊलवाट सावळ्या तरुंच्या छायेत पसरला धुक्यांचा फुलोरा थरथरणाऱ्या पानांतून सांडला शुभ्र कवडसा लाजरा संथ उभ्या जळांत मधुर ओले चांदणे निशब्द ही लहर गाते मंजुळ गाणे वेलींवरचा धुंद गारवा घेवून पंखांच्या कुशीत एक थेंब जागलेला गंध हिरवा वेचित
काव्यरस

गोवा सफर --मंडळीबरोबर-- आणि ते पण २ व्हीलर वर..

लेखक विशुमित यांनी शनिवार, 22/07/2017 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नाची सुपारी फुटल्या नंतरच्या तिसऱ्याच दिवसापासून जो आमचा NXG स्प्लेंडरवर प्रवास चालू झाला तो आमची कन्यारत्न पोटात आली आहे समजल्यावरच त्याला ब्रेक लागला. (पोटात असताना ती कन्या आहे का हे तपासले नव्हते बरका मायबाप हो..!! ) आमच्या दोघांच्या जवळपास सगळ्या आवडी निवडी खूप भिन्न आहेत पण एकच आवड आता कॉमन झाली आहे ती म्हणजे २ व्हीलरवर (च) भटकंती करणे. पहिल्या चार वर्षात सिंहगड, लोणावळा, सज्जनगड, कास, ठोसेघर, महाबळेश्वर, प्रतापगड, कोल्हापूर, जोतिबा,पन्हाळा, शिर्डी, तुळजापूर, सांगली, सोलापूर सगळं २ व्हीलर वर फिरलो. ते दिवस आठवले तर वाटतं खूप येडे होतो आम्ही. कसलीच फिकीर नव्हती.

नाच्या बेडुक

लेखक हेमंत ववले यांनी शनिवार, 22/07/2017 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
नाच्या बेडका विषयी दोन तीन वर्षापुर्वी वाचले होते. परवा आपल्या निसर्गशाळा कॅम्पसाईट परीसरात हा बेडुक प्रत्यक्ष पाहाण्याचा योग आला. यशदिप आणि जेवण आटोपुन पसायदाना विषयी एक ऑडीयो ऐकत झोप येण्याची वाट बघत होते. कॅम्पिगला आलेले लोक देखील कॅम्पफायर भोवती गराडा करुन गप्पा टप्पा मध्ये मग्न होते. आमच्या किचन शेड वर नळीचा पत्रा आहे. अचानकच पावसाची एखादी सर यायची आणि आमच्या डोक्यावर (पत्र्यावर) ताशा वाजवुन जायची. असा हा ताशाचा आवाज थोडा कमी झाला की मग मात्र एक विशिष्ट आवाज दुरवरुन कानावर येत होता. चालबध्द, लयबध्द उच्च स्वरात म्हणजे अगदी खर्जातला वाटावा असा हा आवाज लक्ष वेधुन घेत होता.

ठिपक्यांची मनोली (मुनिया) आणि माळमुनिया

लेखक सानझरी यांनी शनिवार, 22/07/2017 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो! मागच्या वर्षी मी मुनिया वर एक लेख टाकला होता. या वर्षी ठिपक्यांच्या मनोली सोबत माळमुनियाही येत आहेत. माळमुनिया (Silverbill) पक्षी मुनियाच्याच जातीचा पण रंगाने वेगळा. याच्या पोटावर मुनियासरखे ठिपके नसतात, तर याच्या शेपटीवर एक मोठा पांढरा ठिपका आसतो. ज्यामुळे व्हिडीओत याला पटकन ओळखायला सोप्पं जाईल. याचे २ फोटोही खाली देत अहे. मुनियांना त्यांच्या आवाजासाठी पाळल्या जायचे. मुनियांचा नाजूक घुंगरां सारखा मंजुळ आवाज बर्‍याच लोकांना ऐकायचा होता म्हणून यावर्षी (महत्प्रयासाने) मुनियाचा व्हिडीओ काढला. तो व्हिडीओ इथे देत आहे.

अंदाज अपना अपना....

लेखक सरनौबत यांनी शनिवार, 22/07/2017 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळ्याच्या काळात हवामान खात्यातील कर्मचारी दिवसभर पावसाचे अंदाज वर्तवून कामकाज आटोपून घराकडे निघतात. निघताना कार्यालयातील सुरक्षा कर्मचारी आणि सेवकांना बजावतात,‘रात्री दारं खिडक्या नीट लावून घ्या. पावसाचं काही खरं नाही, कधीही येऊ शकतो!’. सतत चुकणाऱ्या अंदाजांमुळे हवामान विभाग हा एक विनोदाचा विषय बनून राहिलाय. हवामानाच्या अंदाजाची सतत थट्टा होऊ नये म्हणून आता हवामान खातं वाऱ्यानुसार दिशा बदलतं. अधून-मधून जरा सावध पवित्रा घेतात. दर वर्षी ‘१० जून ला पावसाचे आगमन होण्याची शक्यता’ म्हणायचं. नाही आला तर ‘उशीरा चालू होईल’ सांगायचं.

दिव्याची आवस

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 22/07/2017 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्यांची आवस आपण ज्याला 'गटारी अमावस्या' म्हणतो ती खर तर 'दिव्याची आवस' किंवा 'दर्श अमावस्या' आहे. दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरवात होते. आपल्यला श्रावणात उपवास करायचे असतात; नॉनवेज आणि दारू याला हात लावायचा नसतो; अस मानलं जातं. अलीकडे मात्र कितीजण हे पाळतात कोण जाणे. पण गटारी अमावास्या मात्र अनेकजण साजरी करतात. आठवडा-पंधरा दिवस अगोदरच आपल्याला whatsaap वर यासंदर्भातले जोक्स यायला लागतात. आपण ते कधी वाचतो... कधी दुर्लक्ष करतो. पण 'गटारी अमावस्या' याव्यतिरिक्त या दिवसाचे काही महत्व आहे हे आपल्याला माहित नाही आणि सहसा कोणी माहित करून घ्यायचा प्रयत्न देखील करत नाही.

"ती सध्या कुठे सापडेल"

लेखक Swapnaa यांनी शुक्रवार, 21/07/2017 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
"ती सध्या कुठे सापडेल" ~~~~~~~~~~*****~~~~~~~~~~ ती अडथळ्यांमध्ये मार्ग काढताना सापडेल, ती परीक्षां जोमाने देताना सापडेल, ती प्रसंगांना तोंड देताना सापडेल, ती सगळ्यांसाठी दाणापाणी मिळवताना सापडेल, ती घरच्यांमध्ये रमताना सापडेल, ती निस्वार्थ हसताना सापडेल, ती मैत्री निभवतांना सापडेल, ती निसर्गचित्र टिपताना सापडेल, ती कला कौश्यल्यात भरारी घेताना सापडेल, ती लिखाणातून व्यक्त होताना सापडेल, ती पशु,प्राण्यांना
काव्यरस

कधी मध्यम,कधी पंचम...

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 21/07/2017 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
कधी मध्यम कधी पंचम,सुरांचा साज अलबेला किती समतोल आहे हा,तुझा अंदाज अलबेला! मनाचा वेगही अाता अनावर वाढला आहे मला हाकारतो आहे तुझा आवाज अलबेला! असे भरतेस काजळ तू तुझ्या डोळ्यांत बंगाली निशाणा बांधतो कोणी निशाणेबाज अलबेला!
काव्यरस

दिड शतकी सायकल सफर २०जुले२०१७

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी शुक्रवार, 21/07/2017 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
दीड शतकी सायकल सफर २०जुले२०१७ मागच्या महड सायकल सफरीच्या वेळी जुन्या मुंबई पुणे रस्त्याने जात असता खालापूर पाली असा एक फलक पाहिला होता. तेव्हाच पाली ची राइड करायचा किडा डोक्यात वळवळला होता. नक्की कसे जायचे याबद्दल थोडा गोंधळ होता मनात. एक मार्ग खोपोली वरुन तर एक खालापूर वरुन असे दोन रस्ते माहीत झाले होते. गुगल बाबाने अंबरनाथ ते पाली हे अंतर ८७ किमी दाखवले होते.मागे डोंबिवलीतील एका सायकल ग्रुप ची पाली राइड दोन दिवसांत केल्याची पोस्ट पाहिली होती. तो ग्रुप दर वर्षी ही राइड करतो असेही समजले होते. या आठवड्यात सुटीचे दिवस होते गुरु व शुक्रवार.