Skip to main content

आठवणी..

लेखक प्रमोद पानसे यांनी शनिवार, 08/08/2020 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
उगवत्या आणी मावळत्या सुर्याच्या वेळा वेगवेगळ्या भाव भावनांचे प्रतिनिधित्व करतात हे समजायचं ते वय नव्हतं. सकाळी उत्साहात उठून शाळेच्या गडबडीत असलेला मी जेंव्हा घरासमोरच्या अंगणात आजोबांच्या देवपुजेसाठी फुलं तोडायला जायचो ,झाडांच्या गर्दितुन पुर्वेकडे उगवलेल्या सुर्याची किरणं पाणी तापवायच्या बंबातुन निघालेला धुर कापत अंगणात यायची.त्या किरणांच्या फांद्यांमधुन डोकावणार्या सरळ रेषा अस्ताव्यस्त पसरलेल्या धुराला एका मर्यादेत आखताहेत असं वाटायचं. तो धुराचा आणी किरणांचा खेळ बघत घाईघाईने फुलं गोळा करुन देउन मी घरामागच्या भिंतीवरुन उडी मारत शाळेत जात असे.

केरळ कढीलिंब झिंगे

लेखक चौकस२१२ यांनी शनिवार, 08/08/2020 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
केरळ कढीलिंब झिंगे खुलासा: मी यात आळस केला आहे , तयार मदर्स रेसिपी ( देसाई बंधू पुणे किंवा "परंपरा ") या नावाचा "केरळ झिन्गा फ्राय" हा तयार मसाला वापरला आहे त्यामुळे १० पैकी मला २ च गुण. हा मसाला कोरडी पुड नसून मासात तेलात घोळलेला , कांडा परतून घातलेला असा असतो त्यामुळे खरे तर त्यात इतर काहीही अधिक घालण्याची जरुरी नसते परंतु मी एक दोन फरक केले - सोललेले झिंगे ( बिनसोललेल पण जगात वापरले जातात म्हणून हा खास उल्लेख) - कांदे बटाटे, लसूण मिरची चे वाटण ( केरळात यात बटाटे वापरात नसावेत, माझी बुंदेलखंडातील पाकृ आहे असे धरा हवेतर जिथे तिथे बटाटा !) - नारळाचे दूध ( नारळाचे दूध आणि क्रीम अश्या

राजयोग - २४ (उपसंहार)

लेखक रातराणी यांनी शनिवार, 08/08/2020 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग - २३ (अंतिम भाग) *** फकीराबरोबर असलेली ती तीन मुलं म्हणजे वेषांतर केलेल्या शुजाच्या तीन मुली होत्या. मक्केला जाण्यासाठी शुजा चट्टग्राम बंदरावर गेला मात्र वादळी पावसामुळे त्यादिवशी एकही जहाज निघाले नाही. वाटेत परत येताना, पुन्हा किल्ल्यात गोविंदमाणिक्यांची भेट झाली. काही दिवस किल्ल्यात राहिल्यानंतर सम्राटाचे सैनिक अजूनही शुजाच्या शोधात फिरत आहेत अशी बातमी आली. गोविंदमाणिक्यांनी आपले बरेच सेवक बरोबर पाठवून शुजाला त्यांचा मित्र असलेल्या आराकानच्या राजाकडे पाठवले.

राजयोग - २३ (अंतिम भाग)

लेखक रातराणी यांनी शनिवार, 08/08/2020 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग - २२ *** इकडे शाहशुजाला त्याचा भाऊ औरंगजेबाच्या सैन्याने सळो की पळो केले होते. इलाहाबादजवळ रणभूमीवर शेवटी त्याचा पराजय झाला. या पराभवाने अपमानित, भयभीत झालेल्या शुजाला आपले कोण आणि परके कोण यातला फरक कळेनासा झाला. वेषांतर करून तोही सर्वसामान्य लोकांप्रमाणे लपतछपत पळू लागला. जिकडे जाईल तिकडे त्याला शत्रूच्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. शेवटी पटन्याला पोचल्यावर त्याने नवाबाचा वेष परिधान करून प्रजा आणि आपल्या परिवारासमोर येण्याची घोषणा केली.

रायगडाच्या घेर्‍यात

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 07/08/2020 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
६ एप्रिल १६५६ चा दिवस. एन आषाढ वणव्यात एका बलदंड आणि प्राचीन गडाच्या पायथ्याशी फौजा पोहचल्या आणि बघता बघाता त्यांनी गडाला मोर्चे लावले, मोक्याच्या जागा रोखल्या, गडाला वेढा पडला. अर्थात गडाचा फास हा असा आवळल्यानंतर गडावर कैद झालेला सरदार, त्याच्या दोन मुलांसह लगेचच शरण आला. हा जहागीरदार होता चंद्रराव मोरे आणि बरोबर होती त्याची दोन मुले कृष्णाजी व बाजी. अर्थात चंद्रराव हे याचे खरे नाव नव्हते, हि होती पदवी. जावळीच्या दुर्गम प्रदेशावर राज्य करणार्‍या मोरे घराण्याच्या राजपुरुषाला हि उपाधी लावली जात असे.याचे खरे नाव येसाजी मोरे.

अनुष्टुप छंद - सोपा करून सांगायचा प्रयत्न

लेखक धष्टपुष्ट यांनी शुक्रवार, 07/08/2020 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
जशी मराठीमध्ये ओवी, हिंदीमध्ये दोहा, तसा संस्कृतमध्ये अनुष्टुप छंद मला खूप लवचिक आणि सार्वत्रिक वाटतो. अनुष्टुप संस्कृतमध्येच नव्हे तर मराठीमध्ये लिहिण्यासाठीही खूप सोयीचा आहे. सगळ्यांच्या ओळखीची भीमरूपी वापरून हा सोपा छंद स्पष्ट करायचा हा प्रयत्न. लघु गुरु यांची तोंडओळख आपल्याला असेलच असं मानून पुढचं लिखाण आहे. परंपरेनुसार अशी त्याची लक्षणे दिल्यामुळे तो विनाकारण अवघड वाटतो- श्लोके षष्ठं गुरु ज्ञेयं सर्वत्र लघु पंचमम्। द्विचतुष्पादयोर्ह्रस्वं सप्तमं दीर्घमन्ययोः॥ ह्याचा आकृतिबंध सोपा करून दिला तर असा दिसेल.

संवाद

लेखक aanandinee यांनी शुक्रवार, 07/08/2020 04:37 या दिवशी प्रकाशित केले.
संवाद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोन जणांचं एकमेकांशी चालणारं संभाषण येतं. पण खरं तर आपला सर्वाधिक संवाद हा आपल्या स्वतःशीच सुरू असतो. आपल्या मनात येणारे विचार हाही या संवादाचाच एक भाग झाला. कधी हा संवाद विचारांच्या रूपात असतो, कधी भावनेच्या, पण तो बहुतेक सारा वेळ सुरूच असतो खरा! काळे ढग आणि बरसणारा पाऊस पाहून कोणाला त्या पावसात चिंब भिजण्याची इच्छा होते, कोणी छत्री शोधू लागतो, कोणी भज्यांची फर्माईश करतो आणि कोणाला कालिदासाचा मेघदूत आठवतो. तोच पाऊस ह्या वेगवेगळ्या गोष्टी कसा साधतो? कारण त्याने वेगवेगळ्या मनांची वेगवेगळी तार छेडलेली असते.

पुरोगामी, लिबरल्स लोकांनी आता करायचे तरी काय ??? कोणती नवी चाल खेळायची?

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 06/08/2020 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
संघाचे काल भूमी पूजनाच्या निमित्ताने झालेले भव्य दर्शन त्या समस्त तथाकथित बुद्धिवंत पुरोगामी आणि लिबरल लोकांस किती त्रासदायक असेल ??? संघाच्या एक एक अजेंड्याची अशी पूर्तता होताना बघून किती यातना होत असतील ? चार पाच वर्षांपूर्वी पर्यंत स्वप्नात देखील या देशात कुणी कल्पना केली नव्हती की 370 कलम इतक्या लवकर हटवले जाईल. संघ गेली सत्तर वर्षे सातत्याने समस्त परिवारातल्या कार्यकर्त्याना 370 कलम हटविण्या संबंधीचा नारा देत होता आणि आपल्या उरीचे ते स्वप्न कार्यकर्ता जगत होता. सत्ता अशा स्वप्नांसाठी करायची आहे याची पदोपदी जाण होती आणि आहे. हमे राज नही, समाज बदलना है - कार्यकर्ता हेच तत्व जगतो आहे.

बाधा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 06/08/2020 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
बाधा ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ संध्याकाळची वेळ . गोकुळात तरुण आणि अवखळ गोपींचा खेळ रंगात आला होता . त्या झोके खेळत होत्या . फेर धरत होत्या आणि गाणीही म्हणत होत्या . मनभावन श्रावणऋतु होता ना . राधा मात्र सख्यांची नजर चुकवून पळाली . तिला आता यमुनाकाठ गाठायचा होता . हुरहूर लावणारीच ती वेळ . हवेत सुखद गारवा . सोनेरी पिवळसर ऊन . झाडांच्या शेंड्यांशी सलगी करणारं . घरी जाण्यापूर्वी प्रियाच्या गळ्यात लडिवाळपणे झुलणाऱ्या अभिसारिकेसारखं . पक्ष्यांचा किलबिलाट चाललेला . घरट्यांकडे परतण्यापूर्वीचा .