Skip to main content

मुकुट परत मिळाला..

लेखक विवेकवि यांनी बुधवार, 12/03/2008 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
आजच पेपर वाचताना बातमी वाचली म॑दीरातला मुकुट परत मिळाला. वाचून आन॑द झाला .. पण चोरणारी व्यक्यी कोण ? काय हेतू चोरण्याचा ? आपले काय मत आहे आपली मते कळवावी...

काही दुर्मिळ फोटू...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 12/03/2008 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
सदर फोटू मला बाबुजींच्या घरनं मिळालेले आहेत. आमच्या ललितामावशींनी हे फोटू मला दिले आहेत. मिपाकरांसाठी येथे देत आहे! श्रेय : श्रीमती ललिता फडके, श्री श्रीधर फडके. टिप्पणी : तात्या अभ्यंकर... १) दिदी, मन्नादा आणि बाबूजी! कुणाचा गळा अधिक गोड, या प्रश्नाचं उत्तर मला तरी अद्याप मिळालेलं नाही! २) बहुतेक 'ज्योती कलश छलके'च्या आठवणी ताज्या होत असाव्यात!

खेळ माझा संपला

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 12/03/2008 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
बेसनलाडवांने सांगून सुद्धा "केश्या" ने आपला हट्ट सोडला नाही..

...फिरवा चला आरी पुन्हा!!

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 12/03/2008 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम गझल ...त्याचीच ओढा री पुन्हा!! ............................................................. ...फिरवा चला आरी पुन्हा!! ............................................................. सारे उकिरडे फुंकुनी आलो तुझ्या दारी पुन्हा ! जाऊन मी जाऊ कुठे, तू सांग, माघारी पुन्हा ? सार्‍याच विषयांचे असे पेपर तरी देऊ कसे... लाजू नको नापास हो...येईल रे वारी पुन्हा ! ऐकून माझे घे जरा...मारू नको नुसते मला... खोडी अधी मी काढली,म्हणलेचना सॉरी पुन्हा ! जीमेत मी जातो जरी...

सलाम मुंबई!!!

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 12/03/2008 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज १२ मार्च, मुंबईच्या त्या काळ्याकुट्ट दिवसाला उद्या पंधरा वर्षे होतील. पंधरा वर्षांपूर्वीचा तो दिवस आजही अगदी आठवणीत आहे. दुपारी दोनचा सुमार होता. मी त्यावेळच्या माझ्या वरळी येथील टि व्ही औद्योगिक संकुलातल्या कार्यालयातून नुकताच बाहेर पडलो होतो. दुपारी तीन वाजता कफ परेड येथे आय डी बी आय च्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटायचे होते, तशी वेळ ठरली होती. मी इमारतीतुन बाहेर पडलो आणी समोरच उभ्या असलेल्या टॅक्सीत शिरणार इतक्यात एक दणद्णीत स्फोटाचा आवाज आला. मी आत शिरताना थबकलो आणि प्रतिक्षिप्त क्रिया घडल्यागत आपोआप बाहेर आलो.

धर्मवीर संभाजी महाराज - संस्मरण

लेखक शेखर यांनी मंगळवार, 11/03/2008 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
११ मार्च ही धर्मवीर संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. सन १६८९ मध्ये ह्या महापुरुषाने आपला देह ठेवला. मुगलानी कपटाने पकडून त्यांना हाल हाल करुन ठार मारले. धैर्याने सगळ्या हाल अपेष्टांना तोंड देणार्‍या छाव्याला माझा त्रिवार मुजरा.. - (मराठी मावळा) शेखर

चारोळी म्हणजे

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 11/03/2008 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
चारोळी म्हणजे चारोळी म्हणजे चारोळी म्हणजे चारोळी असते तुमची आमची आणि सर्वंचि सेम असते चारोळी म्हणजे एक स्वप्न असते. चारोळी म्हणजे गुलबकावलिचे फूल असते मिळाले तर कूल नाही तर भूल असते चारोळी म्हणजे एक श्वास असतो.... आवडेल त्याला दरवळणारा धूंद सुवास असतो आवडली नाहितर भपकारयाचा वास असतो..... चारोळी असते एक घरटे आवडती साठी महाल आणि नावडती साठी खुरटे चारोळी म्हणजे एक सफर असते ज्यात दोन ओळींच्या मधे भावनेचे बफर असते... चारोळी म्हणजे चार ओळींचे एक नाजूक महाकाव्य असते ज्यातल्या भावनेचे चित्र नेहमीच अती भव्य असते दोन तुझ्या दोन माझ्या असा काही सौदा नसतो देण्या घेण्याचा काही एक वाद