मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

...फिरवा चला आरी पुन्हा!!

केशवसुमार · · जे न देखे रवी...
आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम गझल ...त्याचीच ओढा री पुन्हा!! ............................................................. ...फिरवा चला आरी पुन्हा!! ............................................................. सारे उकिरडे फुंकुनी आलो तुझ्या दारी पुन्हा ! जाऊन मी जाऊ कुठे, तू सांग, माघारी पुन्हा ? सार्‍याच विषयांचे असे पेपर तरी देऊ कसे... लाजू नको नापास हो...येईल रे वारी पुन्हा ! ऐकून माझे घे जरा...मारू नको नुसते मला... खोडी अधी मी काढली,म्हणलेचना सॉरी पुन्हा ! जीमेत मी जातो जरी... पाले मुळे खातो जरी... मोजून जेव्हा पाहतो...भरतोच मी भारी पुन्हा ! मी शब्द हा होता दिला नाही शिव्या देणार मी... येता समोरी आज तू... म्हणलेच "च्यामारी" पुन्हा ! करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! अध्याय पहिला संपुनी झाला न थोडा वेळ ही... भलत्याच अन रंगात ही आली पहा स्वारी पुन्हा फुटले जरी डोळा तरी सजतात दुढ्ढाचार्य हे... बसती नव्या कट्ट्यावरी लावून हे बारी पुन्हा ! गेला कुठे रे खांब तो , इतक्यात मी जो पाहिला... डोळ्यापुढे आली कशी माझ्याच अंधारी पुन्हा ? डोके कशाला खाजवा...? मेंदू कशाला चालवा...? गझलेवरी निर्धास्त या, फिरवा चला आरी पुन्हा!! 'पाडू विडंबन रे नको...' "केश्या" तुला सांगीतले... नाही कुणाचे एकले, केलीस ओकारी पुन्हा!! ............................................................. - केशवसुमार .............................................................

वाचने 6992 वाचनखूण प्रतिक्रिया 15

बेसनलाडू Wed, 03/12/2008 - 09:21
एकदम शॉल्लिड. मस्त विडंबन. फार आवडले. जीमेत मी जातो जरी... पाले मुळे खातो जरी... मोजून जेव्हा पाहतो...भरतोच मी भारी पुन्हा ! करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! डोके कशाला खाजवा...? मेंदू कशाला चालवा...? गझलेवरी निर्धास्त या, फिरवा चला आरी पुन्हा!! 'पाडू विडंबन रे नको...' "केश्या" तुला सांगीतले... नाही कुणाचे एकले, केलीस ओकारी पुन्हा!! लई बेस! (आस्वादक)बेसनलाडू

In reply to by प्रमोद देव

चित्तरंजन भट गुरुवार, 03/13/2008 - 01:40
"केशवसु'मार' मार डाला पापडवालेको" म्हणजे काय, प्रमोदकाका? तुम्ही पापड विकायला सुरुवात केलीत की काय? असो. पोटाला जपा.

इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 10:40
केशवा खल्लास रे!लय भारी......! सारे उकिरडे फुंकुनी आलो तुझ्या दारी पुन्हा ! जाऊन मी जाऊ कुठे, तू सांग, माघारी पुन्हा ? जबरा............ "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु Wed, 03/12/2008 - 19:03
वावावा..... करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! हे मस्तच... असा नवरा भेटला तर काय सुख...! - (सर्वव्यापी)प्राजु

हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा............ 'पाडू विडंबन रे नको...' "केश्या" तुला सांगीतले... नाही कुणाचे एकले, केलीस ओकारी पुन्हा!! हीहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा............ (आपला पंखा) छोटी टिंगी ;)

सुधीर कांदळकर Wed, 03/12/2008 - 22:18
मान लिया सरकार. चांगली मूळ कविता असली की आपले विडंबन रंगते. हे खरेच. करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! हे शब्द झकास. आपल्या प्रतिभेस दंडवत.

रविराज गुरुवार, 03/13/2008 - 02:23
खुपच छान विंडंबन. वाचून मजा आली. धन्यवाद!! सगळीच कडवी एकसे एक भारी. -रवी.

केशवसुमार गुरुवार, 03/13/2008 - 16:49
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार