मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चारोळी म्हणजे

विजुभाऊ · · जे न देखे रवी...
चारोळी म्हणजे चारोळी म्हणजे चारोळी म्हणजे चारोळी असते तुमची आमची आणि सर्वंचि सेम असते चारोळी म्हणजे एक स्वप्न असते. चारोळी म्हणजे गुलबकावलिचे फूल असते मिळाले तर कूल नाही तर भूल असते चारोळी म्हणजे एक श्वास असतो.... आवडेल त्याला दरवळणारा धूंद सुवास असतो आवडली नाहितर भपकारयाचा वास असतो..... चारोळी असते एक घरटे आवडती साठी महाल आणि नावडती साठी खुरटे चारोळी म्हणजे एक सफर असते ज्यात दोन ओळींच्या मधे भावनेचे बफर असते... चारोळी म्हणजे चार ओळींचे एक नाजूक महाकाव्य असते ज्यातल्या भावनेचे चित्र नेहमीच अती भव्य असते दोन तुझ्या दोन माझ्या असा काही सौदा नसतो देण्या घेण्याचा काही एक वादा नसतो स्वप्ना अलीकडचे जग कवेत घ्यायचा ध्यास असतो जागेपणीच स्वप्नपूर्तीचा भास असतो.. चारोळी म्हणजे शब्दांचा खेळ असतो.... जित्या जागत्या भावनांचा प्रदर्शनाशी मेळ असतो चारोळी म्हणजे मस्त सॉफ्ट्ड्रींक असते मिक्स न करता प्याले तरी मस्त झिंग देतं.... आपला चारोळी बाज .....................विजुभाऊ

वाचन 9987 प्रतिक्रिया 18