आपल्याला तर बुवा नाही पटत....तुम्हाला काय वाटतं?
काय पटत नाही विचारताय?? साहाजिकच आहे तुमचा प्रश्न! अहो मी बोलतोय आपल्या माय-मराठीवरच्या आक्रमणाबद्दल. हे आक्रमणकर्ते कोण? अहो बघा आजूबाजूला.. दिसले का? हे आक्रमणकर्ते दुसरे तिसरे कोणी नसून आपणच आहोत. नाही पटत? चला तर प्रत्यक्ष उदाहरणंच पाहू...
दृश्य १ - स्थळ- बाजार. एक मराठी आई आपल्या मराठी मुलांना इंग्रजीत बोलते आहे. काय हवं आहे, काय नको आहे, सर्व काही इंग्रजीतून. दुकानदाराशी मात्र इंग्रजाळलेल्या मराठीतून.
दृश्य २ - स्थळ - स्थानिक बस. ऐन गर्दीत चुकून वाहकाचा हात मुलीच्या खांद्याला लागतो. मराठी मुलगी इंग्रजीतून बिचार्या वाहकाच्या सात पिढ्यांचा उद्धार करते.
मिसळपाव