Skip to main content

उकडलेल्या अंड्याचि भुर्जि

लेखक शिप्रा यांनी सोमवार, 21/07/2008 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
उकडलेलि अंडी, कांदा खुप बारिक चिरलेला, टॉमेटो, आले, लसुण पेस्ट, हि मिरचि, तिखट, गरम मसाला, बटर,मिट उकडलेलि अंडी किसुन घ्यावि. मग पॅन मध्ये खुप बटर टाकुन कांदा गुलाबि परतुन घ्यावा. आणी मग त्यात आले लसुण पेस्ट व बाकि सर्व साहित्य टाकावे. थोडे परतल्यावर त्यात किसलेलि अंडि टाकावि...परत परतावे.. हावितर कोथिंबिर टाकावि आणि ब्रेड बरोबर हापसावि..ह्यात उकडलेलि अंडि किसुन घातल्यामुळे वेगळि चव येते..नक्कि करुन पहा...

मोरारजी आणि जेठमलानी

लेखक अजय यांनी सोमवार, 21/07/2008 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
राजकारण म्हणजे विरोधाभासाचं आगार.... त्यातही दिल्लीतलं राजकारण म्हणजे महाभयंकर... ही राजकारणीमंडळी एकमेकांवर सदैव कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. या नादात तत्वांना कधी तिलांजली दिली जाते, द्यावी लागते हे त्यांनाही कळत नाही. अर्थात, हे आपल्यालाही जाणवते. पण कधीतरी या तत्वच्युतीला आदर्शवादाचं समर्थन घेण्याचा प्रयत्न केला जातो. या साऱ्या प्रकारांना वेगळ्या चष्म्यातून पाहिलं कधी कधी विनोदी चित्र पाहावयास मिळतं. त्यामुळे बाबूंच्या सरकारीपणाचे किस्से आपल्याला प्रत्यक्ष दिसतात. पण राजकारणीमंडळींचे किस्से कळायला चांगलं माध्यम लागतं. त्याशिवाय ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही.

सट्टाशाही

लेखक विकास यांनी सोमवार, 21/07/2008 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या भारतात विश्वासदर्शक ठरावाच्या नावाखाली जे काही चालले आहे ते पहाता आपली सर्वात मोठी "सट्टाशाही" आहे असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. खालील बातम्या वाचताना अथवा जे काही चालले आहे ते पहाताना आपल्याला काय वाटते? परिस्थिती बदलता येईल का हे असेच चालणार म्हणत गप्प बसण्याला पर्याय नाही? सामान्य माणसाला यात काय करता येईल - एकट्याने अथवा एकत्रीत? संदर्भः महाराष्ट्र टाइम्स
युपीए सत्तेवर राहील म्हणून ० . ३८ पैसे तर युपीए सत्तेवर राहणार नाही यासाठी २.९० पैसे असा भाव सध्या बाजारात सुरू आहे. याव्यतिरिक्त २७२ मतांसाठी ०.३८ पैसे , २७३ मतांसाठी ० .

भानगड

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 21/07/2008 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा आमच्या गुरुंची निवृत्ती --------------------------------------------------------------------- छळले मी त्या सर्व मुलींना स्मरतो आहे शेवटची मी आज भानगड करितो आहे जाड चपला खूप मिळाल्या मज रसिकेच्या आत तरीपण एक प्रेमी धुसफुसतो आहे कसा अडकलो प्रतिभेच्या जाळ्यात कळेना सुटण्यासाठी माशासम तड्फडतो आहे चित्राने ही सावज केले होते मजला आठवणींनी त्या पोरींच्या गलबलतो आहे डोळ्यांन मध्ये प्रितीच्या ना पाहू शकतो भावालाही बघण्यास तिच्या घाबरतो आहे प्रेमाच्या मी या कोलांट्या खूप मारल्या लफड्यांचा सोस आज मज कळतो आहे करा मोकळा कॉलेजच

( हे चिकन मस्त आहे )

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 21/07/2008 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
इथे दिलेली चिकनची पा.कृ. पाहिली आणि हे गाणे सुचले. चालः 'चौकर राजा" मधील गाणे "हे जीवन सुंदर आहे." ----------------------------------------------------------------------- हे चिकन सुंदर आहे !! धृ !! निसर्ग धाबा हायवेवरचा अन् मित्रांची पार्टी ! रसात बुडल्या तंगड्यांना चापायाची घाई !! (अहो विसरा हे सगळ. एथं सगळेच विचित्र. वर कोंबड्या चिकनगुनियाने त्रस्त. सोबतीला ही प्रचंड महागाई !!!) पापलेट, बोंबील , वडे , खिमा हेही मस्त आहे ! हे चिकन सुंदर आहे !!
Taxonomy upgrade extras

निवॄती

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 21/07/2008 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
छळले मी त्या सर्व कवींना स्मरतो आहे शेवटचे मी आज विडंबन लिहितो आहे वा व्वा टाळ्या खूप मिळाल्या मज रसिकांच्या आत तरीपण एक कवी घुसमटतो आहे कसा अडकलो प्रतिमेच्या जाळ्यात कळेना सुटण्यासाठी माशासम धडपडतो आहे मित्रांनी ही सावध केले होते मजला आठवणींनी त्या सार्‍या गलबलतो आहे डोळ्यांन मध्ये स्वप्नांच्या ना पाहू शकतो आरसाही बघण्यास मी घाबरतो आहे शब्दांच्या मी या कोलांट्या खूप मारल्या विदूषकाचा भोग आज मज कळतो आहे करा मोकळा प्रतिमेच्या पिंजर्‍यातून आता हेच मागणे, हीच विनवणी करतो आहे साद घालते मला खुले आभाळ कधीचे आज नवी सुरुवात पुन्हा मी करतो आहे

मंडळी , येताय चिकन खायला?

लेखक आंबोळी यांनी सोमवार, 21/07/2008 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : मदनबाणाची कणसे चिकन धूवुन घ्या. हळद, आले-लसणाची पेस्ट लाउन अर्धा-पाउण तास ठेउन द्या. बटर गरम करून बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. मग त्यात आल्,लसूण,मिरची, कोथींबीर्,कांदा यांची पेस्ट आणि मसाला घालून परता. चिकनचे तुकडे घालून व्यवस्थीत हलवा.

अनमोल ठेव.....

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 21/07/2008 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा कर ! आज बरेच दिवसांनी मी "त्या" फाऊंटन पेन नी लिहिताना मागच्या आठवणी जाग्या झाल्या आणि या पेनामागची कथा तुम्हाला सांगाविशी वाटली.बघा तर वाचून .....

अरे पावसा पावसा, तु आहेस तरी कुठं !!!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 21/07/2008 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळ भरुन येतंय, पण पावसाच पत्ताच नाही. १९३६, १९७२, आणि आता २००८ म्हणजे बरोबर छत्त्तीस वर्षानंतर आता पाऊस पडणारच नाही, भयंकर दुष्काळ पडणार आहे, अशी भविष्यवाणी आमच्या एका दोस्ताने केली. आणि पुन्हा आम्ही कवितेच्या पुस्तकात घुसलो. कविता वाचता...वाचता.......कवितेच्या शब्दा-शब्दावरुन. लिंकवर क्लिक केल्यावर जसे इतर दूवे उघडतात तसे मनाचे अनेक दुवे उघडत गेले ....दररोज, कडाक्याचे ऊन पडत असल्याने पावसाची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. केवळ शेतकरीच नव्हे तर सामान्य माणूसही पावसाने डोळे वटारल्याने हवालदिल झाला आहे. आषाढीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन वारकरी एकदा परतला की तो पाऊस घेऊन येतो असा एक समज आहे.