Skip to main content

आईस कचांग

लेखक वैशाली हसमनीस यांनी रविवार, 14/09/2008 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
येथे ''आईस कचांग''हा बर्फाच्या गोळ्यासारखा दिसणारा पदार्थ जेवणानंतर डेसर्ट म्हणून लोकप्रिय आहे.मोठ्या ग्लासात तळाशी शेंगदाणे,शिजविलेले रेड बीन्स,कॉर्न घालावे. त्यावर आपल्या आवडीचे सरबत(रोज,काला खट्टा इ.)घालावे. त्यावर बर्फाच्या चुरा एकत्र म्हणजे गोळा करून ठेवावा.त्यावर पुन्हा सरबत घालावे.आपल्याकडील बर्फाच्या गोळ्यासारखीच चव पण शेंगदाणे,बीन्स इ.मुळे अधिक चविष्ट लागतो.

विघ्नहर्त्यावरचे संकट टळणार?

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 14/09/2008 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती बाप्पा, ही बातमी खरी असेल तर तुम्हाला आमच्या उत्सवातली हजेरी संपवुन घरी जाताना काही अडचण येणार नाही असे वाटते.

गणेशभक्त सलमान!

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 14/09/2008 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
बेफाम गाडी चालवुन केलेला अपघात, केलेले तमाशे वगैरेसाठी कुप्रसिद्ध झालेल्या सलमानने घरात गणपती बाप्पांना आणले, त्यांची सहकुटुंब पूजा अर्चा केली. या कृत्यामुळे मुल्ला मौलवी व धर्मांध संघटनांनी त्याच्याविरुद्ध फतवा काढला आहे.

कण-भौतिकी आणि LHC

लेखक राहूल यांनी रविवार, 14/09/2008 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
आगाऊ सूचना: जर कुणाला विज्ञानाची (विषेशतः भौतिकशास्त्राची) ऍलर्जी असेल तर हा लेख वाचून स्वतःचे डोके आपटून घेऊ नये. हे लिखाण विकिपिडिया तसेच इतर काही पुस्तकांच्या आधारे केले आहे. याच संदर्भातील 'मिपा'वरचा अजून एक धागा येथे सापडेल. कण-भौतिकी विषयाचे नाव वाचून धक्का बसला असेल... मलाही बसला.

कका ची बाराखडी (भारूड)

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 14/09/2008 04:28 या दिवशी प्रकाशित केले.
चाल- काट्याच्या अणीवर वसले तीन गांव... ककाच्या नांवावर काढल्या मालीका ककाच्या नांवावर काढल्या मालीका काही सूरू काही संपेचना संपेचना ठार केले नायकाला नायीका रडते व्हीलन बधेचिना बधेचिना रीपीटले ब्राउन तुकडे फॉरवर्ड करती प्रेक्षक बघेचिना बघेचिना त्याचा केला पुनरजनम पुनरजन्मानी नायीका तरुण पुन्हा तरुण पुन्हा दादीचे केस काळे डिस्को करते दादी खपेचिना खपेचिना तिने मारल्या तीन थपडा तीनदा लागल्या एपीसोड सरेचिना सरेचिना टाकले कमरशीयल ब्रेक चहा ढोसूनही प्रेक्षक टळेचिना टळेचिना पाडल्या नवीन कहाण्या वाढता वाढे बाराखडी संपेचिना वाढता वाढे ककाराचा विकार मूर्ख बघे
Taxonomy upgrade extras

नशेचे प्रकार---अंतरीच्या नाना कळा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 14/09/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी कधी दारू प्यायलो नाही परंतु, दारू पिणाऱ्याच्या अंगात नशा आणण्याच दारूत सामर्थ्य असतं हे मला ठाऊक आहे.आणि ते कळण्यासाठी दारू पिऊन पाहिली पाहिजे असं नाही.ह्या नशेत माणूस, माणूस म्हणून राहात नाही असं म्हणतात. म्हणजे काय?

`म्हणी' मॅटर्स!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 13/09/2008 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
बोलण्यात अनेकदा म्हणींचा वापर आपण करत असतो. लिहितानाही करतो. त्यांचा अर्थ काही वेळा आपल्याला पूर्णपणे कळलेला असतो, काही वेळा फक्त म्हण माहीत असते. म्हण ही अतिशय कमी आणि चपखल शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी असते. म्हण ही त्या-त्या भागाचं वैशिष्ट्यही असते. आमच्या कोकणात अनेक वैशिष्ट्यपूर्ण म्हणी आहेत. हा धागा सुरू करतोय, आपल्याला माहिती असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण म्हणी आणि त्यांचा अर्थ सागण्यासाठी. उदा. 1. "वाघ पडला बावी, केल्डं गां* दावी' अशी एक म्हण कोकणात प्रचलित आहे. "बाव' म्हणजे विहीर. केल्डं म्हणजे लाल तोंडाचं माकड. ते कोकणात हमखास पाहायला मिळतं.