कोकणातल्या तुळस नावांच्या एक खेड्यात रमाकांत तुळसकरने खूपच सामाजीक कार्य केलं आहे,असं माझ्या एका मित्राने मला सांगितल्याने मला माझ्या शाळेतला दोस्त रमाकांत तुळस्करची आठवण आली.हा तोच तर नसेल,असं कुतुहल मनात येऊन मी त्या खेड्यात मुद्दाम गेलो.आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या मनातला तोच रमाकांत होता.मला इतक्या वर्षानी पाहून त्याला ही खूप आनंद झाला.
इकडतिकडच्या गप्पा झाल्यावर मी त्याला म्हणालो,
"काय रे बाबा!