Skip to main content

संयमाची रेघ..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 26/09/2008 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
वादळांचे श्वास होते भावनांचे मेघ ही मीलनाची ओढ होती संयमाची रेघही ओठ नाही त्या गुलाबी दोन होत्या पाकळ्या चुंबताना होत काटेरी जरासा स्पर्शही कामिनीचे रूप पाहू दे मला गे सुंदरी रोखले मी श्वास आणी सोसला आवेगही तारकांचे गूज सांगे रातराणी गंधुनी चांदण्याशी रासक्रीडा खेळला ना चंद्रही पश्चिमेचा गारवारा का सुगंधी वाहिला संयमाची तो परिक्षा घेत आहे आजही - प्राजु
Taxonomy upgrade extras

नागीण आणि काही कविता.

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 26/09/2008 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजच्या दिवसात लिहीलेल्या या कविता आहेत.माझ्या कॉलेज मध्ये दिलीप मालवणकर नावाचा एक चळवळ्या मुलगा होता. त्यानी एक प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशीत केला होता. त्या संग्रहातल्या या माझ्या कविता आहेत.
Taxonomy upgrade extras

फोन हरवला ...आहे

लेखक नि३ यांनी शुक्रवार, 26/09/2008 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार.. आज सकाळी ऑफीस ला जात असतांना लोकल ऑटो रिक्शा मधे माझा नोकिया एन गेज क्युडी हा फोन हरवीला आहे.. पोलीस मधे तक्रार नोंदवीली आहे...IMEI NO.. नोट करुन ठेवला होता तो पण दीला पोलीसांना ....विचारल काही चान्सेस आहे का परत मिळ्ण्याचे...म्हणाला सायबर शाखेकडे पाठ्वतो तक्रार बहु... तुम्हाला काय वाट ते फोन पुन्हा मिळेल आता पर्यंत जे एक्त आलो त्यानुसार एकदा हरवीला की गेला.... महाग नव्हता...पण खुप भावना जुड्ल्या आहेत त्यासोबत माझ्या आईने भेट म्हणुन दीलेला माझा पहीला-वहीला मोबाईल फोन होता तो.... मि माझ्याक्डून आणखी काही करु शकतो काय तो फोन ट्रेस करायला???

मला आवडलेल्या दूरदर्शन संचावरील जाहिराती.

लेखक शितल यांनी शुक्रवार, 26/09/2008 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स, बहुतेक लोकांच्या घरी दुरदर्शन संच सतत चालु असतोच, त्यामुळे सतत जाहिराती नक्कीच जाता येता कानावर , डोळ्यावर पडतात. त्याला वेळ काढुन बसावे लागत नाही. आणि एखादे गाणे जसे आपल्या तोंडात बसावे तशी एखाद्या जाहिरातीचे वाक्य आपल्या तोंडात बसते. तर मी आज अशाच कोणत्या जाहिराती मिपाकरांना आवडतात हे जाणुन घ्यायला आले आहे. मला मिन्टॉस - दिमाक की बत्ती जला दे ! अमुल - द टेस्ट ऑफ इंडिया तसेच थंडा मतलब कोका कोला ही अक्षय कुमारची जाहिरात ही आवडते. ह्या जाहिराती मला आवडतात, आणि ती जाहिरात कानावर पडल्यावर पाऊले आपोआप दुरदर्शन संचाकडे वळतात.

आय.सी.यू.----एक आत्मचिंतन

लेखक वैशाली हसमनीस यांनी शुक्रवार, 26/09/2008 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
आय.सी.यू .मध्ये कांही दिवस दाखल झालेले असताना मनात आलेले विचार मुक्तकाच्या रूपात मांडले आहेत. आय. सी. यू. चा मॉनिटर जणू सुतार पक्ष्याची टकटक वाजवितो मृत्यू आपलेच गाणे. व्हेंटीलेटरचा आवाज वाजवितो त्यू आपल्याच घंटा! आय‌. सी. यू. त चालते सारखीच गडबड, नर्सेसची लगबग नि डॉक्टरांची धावपळ, सगळ्यांचे प्रयत्न या तीरावर अडकविण्यासाठी जीवाला घाई पैलतीर गाठण्यासाठी ! मधला तो काळाशार अंधार, आणि समुद्राचा आवाज, गुदमरून टाकणारा अन श्वास कोंडून ठेवणारा. हे कोण कुजबुजले कानाशी, ''चल, येतेस का सफरीला? जाऊन येऊ तिरुपतिला !
Taxonomy upgrade extras

हिरवाई

लेखक स्नेहश्री यांनी शुक्रवार, 26/09/2008 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मला डॉक्टर ने जेवणात दुधी खायला सांगितला आहे. तर सध्या माझा दुधीवर संशोधन चालु आहे. आजच सकाळी एक मॉकटेल दुधीपासुन केला. खर सांगते दुधीपासुन एवढ छान मॉकटेल होवु शकत अस कधी वाटल नव्हत. फ्रेश फ्रेश हिरवाई तुमच्यासाठी खास. दुधी १/४ किलो साल काढुन आणि उकडुन काकड्या २ बारीक तुकडे करुन १५/१६ पुदिन्याची पान ४/५ मिरी १/२ इंच आलं काळ मीठ चवीनुसार लिंबु रस ३/४ चमचे सर्व एकत्र मिक्सर मध्ये गुळगळीत वाटुन घ्यायच. मग ते सर्व पाणी घालुन सारख करुन परत मिक्सर मध्ये फिरवुन घ्यायच. आणि मग ग्लास मध्ये घालुन थंड करुन प्यायच. सजावटी साठी पुदिन्याची पान बारिक चिरून वर घाला आणि काकडीचे बारीक तुकडे पण घाला पिता

कुणी सल्ला देता का हो सल्ला?

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शुक्रवार, 26/09/2008 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस नविन मोबाइल फोन घ्यायचा विचार सुरू आहे. त्या दृष्टीने शोधाशोध चालू होती. मी आयफोन साठी थांबलो होतो. मग आयफोन आधी अमेरिकेत लाँच झाला आणि २-३ दिवसात १० लाख आयफोन विकले गेले... जरा बरे वाटले की चला आता आपणही घ्यायला हरकत नाही. मग हळूहळू आयफोन बद्दल प्रतिकूल मतं यायला लागली. कोणी काही कोणी काही म्हणायला लागले... तेवढ्यात कोणी तरी म्हणाले ब्लॅकबेरी घे, नोकिया इ७१ घे... आणि काय काय. मी पुरता गोंधळून गेलोय. आमच्या राजेभाऊंचं मत आहे की ब्लॅकबेरी चांगला...

वाहनाच्या मागे...

लेखक निसर्ग यांनी शुक्रवार, 26/09/2008 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यामध्ये सध्या ट्राफीक जाम मुळे वाहनाचा वेग कमीच ठेवावा लागतोय. पण त्यातूनही मला एक नवीन छंद जडलाय, काही वाहनांच्या मागे छान वाक्य वाचायला मिळताहेत.काही वाक्य सुरक्षे संबंधी तर काही विडंबनात्मक, काही विचार करायला लावणारी, अशी वेगवेगळी असतात. " सुरक्षित अंतर ठेवा " , "आईचा आशिर्वाद " या सारखी नेहमीच दिसणारी आहेतच पण वेगळी अशी वाचायला मिळालेली काही वाक्य..

क्रेडिट कार्ड वापरताना जरा सांभाळुन... (आमचा खुप वेगळा अनुभव)

लेखक टुकुल यांनी शुक्रवार, 26/09/2008 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स, नविन लेखन/लेखक असल्यामुळे काहि चुका झाल्यास सांभाळुन घ्या..