मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाहनाच्या मागे...

निसर्ग · · काथ्याकूट
पुण्यामध्ये सध्या ट्राफीक जाम मुळे वाहनाचा वेग कमीच ठेवावा लागतोय. पण त्यातूनही मला एक नवीन छंद जडलाय, काही वाहनांच्या मागे छान वाक्य वाचायला मिळताहेत.काही वाक्य सुरक्षे संबंधी तर काही विडंबनात्मक, काही विचार करायला लावणारी, अशी वेगवेगळी असतात. " सुरक्षित अंतर ठेवा " , "आईचा आशिर्वाद " या सारखी नेहमीच दिसणारी आहेतच पण वेगळी अशी वाचायला मिळालेली काही वाक्य.. .... १) बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलयं वाघानं २) योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये.. ३) कितने भी खरीद ले हिरे मोती,लेकीन कफ़नपर जेब नही होती ४) जळा पण प्रेमाने ५) Don't Kiss me. ६) एका मिनीडोअर (सहा आसनी) च्या मागे तर डब्लू डब्लू डब्लू.टमटम. काम असे वाक्य आहे. ७) अरे नाही , अहो रिक्शावाले म्हणा. ८) वाट पाहिन पण एस टी नेच जाईन . ९) Mom say's ,No Girl friend मिपाकरानो,कदाचित आपणासही अशी अनेक वाचायला मिळली असतीलच. सांगा...... ... आणि आमच्या परदेशातल्या मिपाकरानो तुम्हाला तिकडे अस काही वाचायला मिळतं काहो? आपल्या गाडीच्यामागे काहीही लिहायची इच्छा नसेल तर गाडी क्रमांक तरी लिहा :) वाचाळ --- निसर्ग

वाचन 10072 प्रतिक्रिया 0