इच्छेच्या पाऊलवाटा
माझी मामेबहिण सुमती कोकणातल्या एका खेड्यात रहाते.ती, तिचा नवरा आणि मुलं घराच्या मागे शेती करतात.घर मोठं आहे आणि मागे मांगर,विहीर आणि गाईबैलांचा गोठापण आहे.एक दिवस मी तिच्या घरी गेलो असताना मला ती तिच्या घराच्या मागच्या परड्यातून गाईगुरं दाखवीत खोल विहिरीची आणि आजूबाजूच्या शेतीची माहिती देत देत आपला अनुभव सांगत होती.एका जागेतून दुसर्या जागेत जाताना लहान लहान पाऊलवाटा झाल्या होत्या.ह्या पाऊलवाटावरून विषय निघाला.
मी तिला विचारलं,
"सुमती प्रत्येक पाऊलवाटांच्या टोकाला तू आखांडे घातले आहेस.हे अटकाव कशासाठी ?"
सुमती खेड्यात रहात असली तरी तिने कॉलेजचं शिक्षण पूरं केलं होतं.काही दिवस ती त्याच कॉलेजात
मिसळपाव
