Skip to main content

इच्छेच्या पाऊलवाटा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 10/01/2009 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मामेबहिण सुमती कोकणातल्या एका खेड्यात रहाते.ती, तिचा नवरा आणि मुलं घराच्या मागे शेती करतात.घर मोठं आहे आणि मागे मांगर,विहीर आणि गाईबैलांचा गोठापण आहे.एक दिवस मी तिच्या घरी गेलो असताना मला ती तिच्या घराच्या मागच्या परड्यातून गाईगुरं दाखवीत खोल विहिरीची आणि आजूबाजूच्या शेतीची माहिती देत देत आपला अनुभव सांगत होती.एका जागेतून दुसर्‍या जागेत जाताना लहान लहान पाऊलवाटा झाल्या होत्या.ह्या पाऊलवाटावरून विषय निघाला. मी तिला विचारलं, "सुमती प्रत्येक पाऊलवाटांच्या टोकाला तू आखांडे घातले आहेस.हे अटकाव कशासाठी ?" सुमती खेड्यात रहात असली तरी तिने कॉलेजचं शिक्षण पूरं केलं होतं.काही दिवस ती त्याच कॉलेजात

करकरे व ओम्बळे : वेगळ्या भूमिका

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 10/01/2009 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच सामनाने एक वादळ उठवले. हेमन्त करकरे यान्च्या पत्नीने असे विधान केले की त्यान्च्या कन्येला (जी लन्डनला रहाते) असे वाटते की कसाबाला फाशी देऊ नये. त्याला त्याच्या चुकीची जाणीव होऊ द्या (कशी बुवा?). याउलट ज्या वीराने आपले बलिदान करून त्या कसाब नामक नराधमाला जिवन्त पकडून दिले तो हुतात्मा तुकाराम ओम्बळे, त्याची कन्या वैशाली हिने ठासून सान्गितले की ज्याने तिच्या वडिलान्ना आणि अनेक निरपराधाना निष्कारण ठार मारले त्या नीचाला गेटवे वर जाहीर फाशी द्या. हीच एक योग्य शिक्षा आहे. सामनाने करकरे कुटुम्बाशी आपण सहमत नाही असे अत्यन्त सुसन्स्कृतपणे एका अग्रलेखात लिहिले.

सत्यमच्या निमित्याने

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 10/01/2009 03:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक मर्यादित कंपनी जेवढा नफा कमावते त्याच्या प्रमाणात तिला कर भरावा लागतो आणि तिचे सममूल्यधारक उरलेल्या संपत्तीचे वाटेकरी बनतात. सरकार आणि सममूल्यधारक यांना त्यांचा न्याय्य वाटा द्यावा लागू नये या उद्देशाने कांही स्वार्थी संचालक हिशोबाच्या वहीत लिहिलेल्या आकडेवारीत कंपनीला झालेला नफा कमी दिसेल अशी तरतूद करून नफ्याचा कांही भाग स्वत:च्या घशात घालतात असे यापूर्वी ऐकले होते. पण या राजू महाशयांनी याच्या विपरीत जाऊन कंपनीला न झालेला फायदा झाला असे दाखवले असे दिसते. न झालेल्या नफ्यातून त्यांनी सरकारला कर कसा भरला आणि सममूल्यधारकांना परतावा कसा दिला ? अखेर तसे केल्याने त्यांनी काय साध्य केले असेल?

जिवासवे जन्मे मृत्यू

लेखक शशिधर केळकर यांनी शनिवार, 10/01/2009 03:47 या दिवशी प्रकाशित केले.
स्वर्गामधे देवांची वार्षिक सभा व स्नेहसम्मेलन भरले होते. कोट्यवधी देवांनी यंदाच्या सम्मेलनाला उपस्थिती लावली होती. संध्याकाळी नित्याप्रमाणे सौंदर्यावलोकन करायला विविध मार्गिकांतून आज सर्वजण बाहेर पडले होते. गर्दी टाळून यमदेव एकटेच नंदनवनाकडे वळले. अतिशय सुंदर हवा पडली होती. नंदनवनात अनेक लतापल्लवी, लक्षावधी वल्लरी, रंगीबेरंगी आणि सुगंधी फुले बहरली होती, मोहक सडा पडला होता. सुगंधी वायू वाहात होता. पक्षी सुरेल सुस्वरामधे कूजन करत आनंदात विहरत होते. क्षणभर यमदेवांना परिपूर्ण शांतीचा आस्वाद घेता आला. समाधानाने त्यांचा ऊर भरून आला. इतक्यात गरुडाचे तिथे आगमन झाले.

मराठी माणूस.. आणि स्टॉक मार्केट.

लेखक रेझर रेमॉन यांनी शनिवार, 10/01/2009 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
सत्यम चा घोटाळा... ८५ % फ्री - फॉल. सेन्सेक्स गोईंग स्टीपर डाऊन... म्युच्युअल फंडस् किरकोळीत गेलेले... मराठी माणसाचा टक्का बाजारात जरा कुठे दिसतोय न दिसतोय तोवर एक महाघोटाळा होतोच... मग आपण बाजारातून पळून जाणार का? शेअर्स चे भाव गडगडतात हे आपलं लाडकं मत... धोका आहेच... ब्लू चिप.. मेगा-जायंट कॉर्पोरेट अशी चालवली जाते तर विश्वास कुणावर ठेवायचा? असे धोके आपल्याला बाजारा पासून दूर नेतील का? सत्यम् च्या धक्क्याचा तुमच्या आर्थिक धोरणावर बदल झाला का? आणि कसा? नसल्यास का झाला नाही? बिट कन्फ्युज बावत ऑल. -रेझर

मराठी विकी किती उपयोगी वाटतो ??

लेखक अभिरत भिरभि-या यांनी शुक्रवार, 09/01/2009 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकी ज्ञानकोश किती काल सुसंगत वाटतो ? विकी हा मराठी मधील मुक्त ज्ञानकोश आहे हे इथल्या सर्वांआ माहिती असेलच. सध्या मराठी विकीवर सुमारे २२ हजार लेख आहेत. भारतीय विकींमध्ये मराठी सध्या ४ थ्या स्थानावर आहे. व २ / ३ स्थानावरील भाषांपेक्षा मराठी फ़ार मागे नाही.

लेखकांचे मानधन (लेखाचा दुवा)

लेखक लिखाळ यांनी शुक्रवार, 09/01/2009 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आजच साप्ताहिक सकाळ मध्ये एक लेख वाचला. श्री सुनील कर्णिक यांनी लिहिलेल्या लेखकाचं मानधन ४४ लाख रुपये या लेखात भारतीय लेखकांसाठी काही उत्साहवर्धक बातमी आहे. आंतरजालावर अनेक मराठी लेखक त्यांच्या कसदार आणि बहारदार लेखणीने लेखन करताना आपण पाहतो. त्यांना ही बातमी वाचून उत्साह यावा अश्या सदिच्छेने त्या लेखाचा दुवा दिला आहे. पुढेमागे आपल्या माहितीतल्या कुणाला असे लाखो रुपये लेखनासाठी मिळाले तर आपल्याला आनंदच होईल नाही का ? :) या लेखात लिटररी एजंट असा जो उल्लेख आहे, त्या बद्दल कुणाला माहिती आहे का?

नेहरूंवर लेखन करावे का? प्रस्ताव.

लेखक नितिन थत्ते यांनी शुक्रवार, 09/01/2009 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर अनेक लेखकांनी गांधी (महात्मा) या विषयावर विपुल लेखन केले आहे. स्वतंत्र भारताच्या वाटचालीवर दूरगामी परिणाम करणर्या नेहरूंवरही लिखान करण्याची शिफारस करतो. कोणी लिहिले नाही तर मी लिहिन