शिळ्या भाताच्या चकल्या.
शिळ्या भाता चा फोडणी चा भात सोडला तर काय करायचे हा घरातल्या आई समोर प्रश्न असतो... हि रेसिपी करयला सोप्पी आणि सर्वाना आवडेल ... माझी आई करायची.
फोटो नाहि आहे आत्ता म्हणुन लावु शकले नाहि.
साहित्य :
शिळा भात
आले
लसुण
हिरव्या मिर्च्या
जिरे
मीठ
ईथे प्रमाण दिले नाहिये कारण भात किति आहे त्यावर अवलंबुन आहे... त्यामुळे अंदाजाने घालणे..
आले मिर्च्या लसुण आणि जिरे वाटुन घ्यावेत. शिळ्या भातात वरिल वाटण आणि चविप्रमाणे मिठ घालुन खुप कुस्करुन नीट मळुन घ्यावे.. थोडा तेलाचा हात लावुन त्याचा गोळा करावा.
आता चकली च्या ढाच्यातुन वरिल गोळ्याच्या चकल्या पाडुन घ्या...
मिसळपाव