Skip to main content

कधी कधी

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी शुक्रवार, 05/02/2010 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी नभालाही वाटत असेल घ्यावे धरतीला मिठीत कधी कधी ढगांनाही वाटत असेल शिरावे ह्या दरीच्या कुशीत कधी कधी शिखरालाही वाटत असेल खोल खोल दरीत उतरावे अन कधी कधी दरीलाही वाटत असेल उंचावरून जग पहावे कधी कधी पावसालाही वाटत असेल ओलेचिंब भिजावे अन कधी कधी थंडीलाही वाटत असेल उबदार गोधडीत शिरावे कधी कधी उन्हालाही वाटत असेल सर्वस्व सावलीला द्याव अन सावल्यांनाही वाटत असेल सोनसळी उन्हात नहाव .. कधी कधी शब्दानांही वाटत असेल कवितेला सजवावे कधी कधी कवितेलाही वाटत असेल शब्दांचेच होऊन जावे..

PEGA म्हणजे काय?

लेखक गणा मास्तर यांनी शुक्रवार, 05/02/2010 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, फार फार काळानंतर मिपावर यायला फुरसत झाली. हाटेलं जोरात चालु आहे हे दिसतच आहे. आता थोड कामाच. मागच्या वर्षात मंदाबाईनी सगळ्यांनाच काहीना काही धडे दिले. त्यामुळे सध्या आम्ही नवी नोकरी शोधत आहोत. तर आम्हाला पुण्यातल्या एका कंपनीने PEGA नावाच्या सिस्टीमवर काम करण्याची ऑफर दिली आहे. PEGA हे Business  Process Managementसाठीचे एक टूल आहे. नेटवरपण याची फारशी माहिती नाही.

म्हणून.....

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 05/02/2010 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
माझे एक सीनिअर आणि एक उत्तम कवी असलेले पण माझ्यासारख्या नवख्या कवीला मित्र मानणारे श्री.महेश घाणेकर यांनी मला तू "मुक्तछंदात पण लिही , उगीचच यमकात स्वतःला जखडून घेऊ नकोस !" असे स्पष्टपणे सांगितले.ते सांगणे आज जे लिहिण्याचा प्रयत्न करतोय त्यात उतरले असावे अशी दाट शंका मनात आहे.....बघा , जमलय का ते ! म्हणून..... ए , तुझ्या जाड वेणीवर मस्त गजरा माळू ? नाही, मला काही हौस नाहिये , ती वेणी एकटीच उदास वाटत्येय ना, म्हणून ! रात्रभर मोगर्‍यातली ती वेणी सोडू? मोकळे करू का लांबसडक काळेभोर केस तुझे? नाही , न पिता नशा चढावी ना , म्हणून ! श्रावणसरीत अबोली साडीत भिजलेली तू , थरथरत्या तनूला कवेत घेऊ का? न

नागाव, कोरलई: एक भटकंती

लेखक प्रचेतस यांनी शुक्रवार, 05/02/2010 12:14 या दिवशी प्रकाशित केले.

हा माझा मिसळपाव वरचा पहिलाच लेख तरी जुन्याजाणत्या मिपाकरांनी संभाळून घ्यावे. नुकताच २३/२४ ला नागाव, कोरलई ला जायचा योग आला. २३ ल पहाटे ५ वाजता पिंपरी वरुन निघालो ते ८.१५ ला नागाव ल पोहोचलो. कर्पेवाडी येथे अगोदरच बुकिंग करुन ठेवले होते. ९.३० ला न्याहारी करुन चौल, रेवदंडा मार्गे कोरलई किल्ल्यावर गेलो.

प्लस-व्हॅली...

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 05/02/2010 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
समोर प्रचंड खोल दरी... नजर जिथपर्यंत भिरकावता येईल तिथपर्यंत सृष्टीचं अमाप सौंदर्य... आजुबाजुला उत्तुंग कडे... वातावरणात फक्त पक्ष्यांचा चिवचिवाट... निखळ एकांत... हे सगळं अनुभवत मी प्लस-व्हॅलीच्या टोकावर उभा होतो... त्याक्षणी शरीरानं मनावर घातलेली सगळी बंधनं गळून पडली आणि मनाला काहीच अशक्य राहिलं नाही... मन एखाद्या पाखरा प्रमाणे कड्यावरुन दरीत झेप घेत होतं... कधी कड्यावर तर कधी झाडाच्या शेंड्यावर जावून बसत होतं... मी सुद्धा ह्या सृष्टीचाच अविभाज्य अंग आहे असं वाटलं...

सर्वच राजकीय पक्षांचा निषेध

लेखक देवदत्त यांनी शुक्रवार, 05/02/2010 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
ताजी बातमी : रॉकेल ६ रु., गॅस १०० रु. वाढीची शिफारस. गेल्या कित्येक दिवसांपासून डाळ, तांदूळ, गहू, भाज्या, दूध, साखर ह्या सर्व महाग होत असलेल्या वस्तूंमध्ये आता रॉकेल, गॅसची ही भरती. अर्थात त्यांना भाववाढ करायची असेल ५० रू ची. पण १०० सांगितले तर ५० वर लोक तयार होतील असाच त्यांचा विचार असेल म्हणून १०० रू.ची शिफारस. आणि पुढे डिझेल/पेट्रोल रांगेत आहेतच.

कोलंबीचे लोणचे

लेखक स्वाती२ यांनी शुक्रवार, 05/02/2010 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
कोलंबीचे लोणचे साहित्य १/४ किलो कोलंबी १ टी स्पून तिखट १/४ टी स्पून हळद १/४ टी स्पून मेथी पावडर १ टी स्पून मोहरीचे कुट १/४ टी स्पून हिंग २ टी स्पून आलं, किसून १/२ टी स्पून मोहरी २ टी स्पून विनेगर १ टे. स्पून तेल मीठ चवी प्रमाणे कृती कोलंबी साफ करुन त्याला हळद आणि तिखट लावून अर्धा तास मुरवत ठेवा. कोलंबी मुरली की एका भांड्यात तेल गरम करत ठेवा. तेल चांगले तापले की त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडली की त्यात आल्याचा किस घालुन १ मिनिट परता.