Skip to main content

PEGA म्हणजे काय?

लेखक गणा मास्तर यांनी शुक्रवार, 05/02/2010 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, फार फार काळानंतर मिपावर यायला फुरसत झाली. हाटेलं जोरात चालु आहे हे दिसतच आहे. आता थोड कामाच. मागच्या वर्षात मंदाबाईनी सगळ्यांनाच काहीना काही धडे दिले. त्यामुळे सध्या आम्ही नवी नोकरी शोधत आहोत. तर आम्हाला पुण्यातल्या एका कंपनीने PEGA नावाच्या सिस्टीमवर काम करण्याची ऑफर दिली आहे. PEGA हे Business  Process Managementसाठीचे एक टूल आहे. नेटवरपण याची फारशी माहिती नाही. मला सापडलेले २ दुवे खाली दिले आहेत. आपल्या मिपाकरांपैकी कोणी मला PEGA विषयी माहिती देउ शकतील काय? विशेषकरुन खालील २ प्रश्नांची उत्तरे मी शोधत आहे. १. आजनंतर ४-५ वर्षांनी PEGA चे भविष्य काय? २. PEGA ही C,C++,Java,。NET या पारंपारीक Languages पेक्षा कशा रोतीने वेगळी आहे. धन्यवाद, आपला गणा मास्तर, (भोकरवाडी बुद्रुक)

वाचने 2960
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

BPM tools ना हल्ली मार्केटमध्ये 'डिमांड' आहे व भविष्यकाळातही तो राहिल असे वाटते.dice.com वर PEGA संबंधीत ९५ नोकर्‍या आहेत.naukri.com वर ४० नोकर्‍या आहेत.म्हणजे एकदम 'हॉट' म्हणता येणार नाही. http://pdn.pega.com/ इकडे आय डी बनवून विचारुन बघायला हरकत नाही.कंपनी १९८३ पासुन अस्तिवात आहे.अचानक बुडायची शक्यता कमी. भेंडी P = NP

http://pdn.pega.com/ इकडे आय डी बनवून विचारुन बघायला हरकत नाही.कंपनी १९८३ पासुन अस्तिवात आहे.अचानक बुडायची शक्यता कमी. तो आयडी पन सरळ मिळत नाही. एप्लॉयरकडुन रजिस्ट्रेशन करावे लागते. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

प्रथमतः हा पाचर या शब्दाला काईतरी विंग्रजी शब्द असावा असे वाटल. नंतर म्हन्ल यखांद्या बारीला विंग्रजी दारु पेताना किती पेग मारशील? हे म्हन्न्यासाठी पेगचे अनेकवचन पेगा झाले असावे. बाकी पेताड ला पेगाड शब्द रुढ का नसावा याचा विचार करताना पेताडाला पेग सिस्टिम परवड नस्ल्याने तो किमान क्वार्टर शिशिस्टिम मदी जाता असावा प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

काका चांगला कल्पनाविलास ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक) (वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

पेगा चे बिपीएम आणि रुल्स इंजीन आहेत... मार्केट्मधे चांगला स्कोप आहे पुढे... - अफाट जगातील एक अडाणि.

युकेतील जॉब मार्केटची माहिती पाहिली असता त्याचा संदर्भ घेऊन तुम्हाला काही अंदाज बांधता येतील का पहा. Pega Demand Trend Pega Salary Trend

अडाणि आणि अजयचे आभार - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)