आम्ही : एका स्वप्नपूर्तीचे साक्षीदार
मराठी जालावर आल्यापासून जे काही लोक ओळखीचे झाले आहेत, जीवाभावाचे मैतर झाले आहेत, त्यात प्राजुचं नाव अगदी आवर्जून घ्यावं असं. मराठी आंतरजालावर जे काही लोक अगदी सातत्याने आणि चांगलं लेखन करतात त्यातही तिचं नाव अगदी अग्रणी आहे. तिच्या सुंदर कविता / गझला मराठी संस्थळांवर नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. तर अश्या या आमच्या मैत्रिणीच्या कवितांचा एक अल्बम येऊ घातलाय ही बातमी कुठून कुठून कानी येतच होती. आता प्राजुचा स्वभाव माहिती असल्यामुळे हा अल्बम एकदम नीटनेटका आणि झकास होणार हे नक्की असे वाटतच होते.
मिसळपाव
आंबोळी यांच्या मागणीवरुन.
लागणारे साहित्य :
करडईची पाने निवडून, धुवुन चिरुन
३-४ लसुण पाकळ्या
१ मोठा कांदा चिरुन
कोणती डाळ भिजवुन (चणाडाळ, मुगडाळ, तुरडाळ)
मिरची १ किंवा २
थोड ओल खोबर करवडून
हिंग, हळद
चवीपुरत मिठ
किंचीत साखर
तेल
पाककृती:
तेलात लसणाच्या पाकळ्यांची फोडणी देउन त्यावर मिरची व कांदा घालावा, हिंग, हळद घालुन डाळ व करडई घालावी. ड नंतर परतुन थोडावेळ भाजी शिजु द्यावी. मग मिठ, साखर, खोबर घालुन परतुन गॅस बंद करावा.
जाणकारांनी अधिक माहीती द्यावी
मी भाजीवालीकडून भाजी घेतली. आणि तिलाच रेसिपी विचारली.