Skip to main content

तरीही…

लेखक मनिष यांनी शनिवार, 26/03/2022 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
Gulal शेंदूर दगडांचा उतरला तरीही, गुलाल भक्तीचा उधळत राही धुरळ्यात काही उमजत नाही, पावलांवर पाऊल पडत राही झापडे काढली डोळ्यांची तरिही उजेडाला डोळे हे सरावत नाही रक्त सांडले कळपात तरिही मेंढरे लांडग्याला ओळखत नाही पाणी डोळ्यातले रोखले तरिही लेखणीतून मग ते झरत राही ~ मनिष

राजधानीची सफर

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 26/03/2022 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात मात्र अचानक दिल्लीला जायचं ठरलं, तेही अगदी एकाच दिवसात. आता इतक्या ऐनवेळी राजधानी, दुरोंतोशिवाय अन्य गाड्यांची आरक्षणं मिळण्याची शक्यता नव्हती. म्हणून मिळताहेत, तोवर लगेच मुंबईहून राजधानीचं आरक्षण करून टाकलं. मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराज (ट) (CSMT) वरून सुटणारी आणि मुंबई सेंट्रलवरून सुटणारी ऑगस्ट क्रांती तेजस राजधानी यांची आरक्षणं शिल्लक होती. 22221 राजधानी ही भारतामधली सर्वात नवी म्हणजे सर्वात अलीकडे सुरू झालेली राजधानी एक्सप्रेस आहे. त्याचबरोबर “ढकल-ओढ” म्हणजेच Push-Pull तंत्रज्ञानावर चालणारी ही एकमेव राजधानी एक्सप्रेस आहे. दुपारी तीन वाजता गाडी फलाटावर लावली गेली.

मी काय पाहतोय.....

लेखक सुजित जाधव यांनी शनिवार, 26/03/2022 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मी यूट्यूब वरती गावाकडच्या गोष्टी नावाची वेबमालिका पाहतोय. मला माहित नाहीये की तुमच्यापैकी किती लोकांनी ही वेबमालिका पाहिली आहे किंवा ह्या वेबमालिकेबद्दल बद्दल ऐकलं/वाचलं आहे...ज्यांना या वेबमालिकेबद्दल माहिती नाही त्यांच्यापर्यंत हि मालिका पोहचवण्याचा या लेखाच्या माध्यमातून केलेला प्रयत्न… वेबमालिकेचे नाव: गावाकडच्या गोष्टी लेखक व दिग्दर्शक : नितीन पवार निर्माते: कोरी पाटी प्रोडक्शन एकूण पर्व (Total Season): ३ एकूण भाग: १०० कुठे पाहू शकाल: यूट्यूब वर फुकटात उपलब्ध खरं तर मला वेबमालिका हा प्रकार थोडासा कंटाळवाणा वाटतो कारण ती पाहण्यासाठी खूप वेळ खर्ची घालावा लागतो.

मुक्तक

लेखक सागरसाथी यांनी शुक्रवार, 25/03/2022 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशाच्या रिक्तपणाच्या असतील काही कथा सूर्याच्या जळण्यापाठी असतील त्याच्या व्यथा नको शोधूस गुढ वाऱ्यावरच्या सुगंधाचे त्यांच्या कणाकणात मिळतील समर्पणाच्या गाथा.
काव्यरस

भरून येईल आभाळ.

लेखक Deepak Pawar यांनी शुक्रवार, 25/03/2022 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
भरून येईल आभाळ दाटून येतील मेघ बुडून जाईल अंधारात जेव्हा सारं जग तेव्हा तू एक कर....... माझा हाती हात धर....... चिंब चिंब पावसात बीज भिजून जातं झाड बनून मातीतून रुजून येतं तसंच.... अगदी तसंच मलासुद्धा तुझ्या मायेत चिंब चिंब भिजू दे तुझ्या छायेत रुजू दे फक्त तू एक कर...... बरसून येऊ दे...... तुझ्या मायेची सर.. वैशाखात तुझं प्रेम सावली होतं.... पानझडीत तुझं प्रेम पालवी होतं.... उधाणलेल्या सागरात ही जीवन नौका तरून जाते..... वळण वेडी वाट सुद्धा क्षणामध्ये सरून जाते..... जर तुझी सोबत असेल तर.... म्हणून तू एक कर माझा हात हाती धर..... दीपक पवार.

आज, 24 मार्च 2022, आपल्या सर्वांना, "गाॅडफादर डे" च्या शुभेच्छा...

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 24/03/2022 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
50 वर्षांपुर्वी, आजच्याच दिवशी, द गाॅडफादर, हा अविस्मरणीय सिनेमा प्रदर्शित झाला ... काही काही चित्रपट, एखादी लाट तयार करतात. द गाॅडफादर, हा पण असाच. चित्रपट परिक्षण, हा माझा प्रांत नाही. कारण, चित्र, नाटक, सिनेमा, अभिजात संगीत हे व्यक्तीसापेक्ष असते. माफिया, हा शब्द माहिती पडला तो, ही कादंबरी वाचतांना आणि संघटित गुन्हेगारीचे, भारतातील स्वरूप देखील समजत गेले... बाबू रेशीम, मन्या सुर्वे, इत्यादी समकालीन गुन्हेगारांपेक्षा, दाऊद इब्राहीमच साम्राज्य का उभारू शकला? ह्याची थोडीफार कल्पना, ही कादंबरी वाचतांना येतेच येते.

भीमाशंकर ट्रेक ०२.०१.२०२२ चढाई बैल घाटाने-उतराई गणपती घाटाने

लेखक Vivek Phatak यांनी बुधवार, 23/03/2022 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
भीमाशंकर ट्रेक ०२.०१.२०२२ चढाई बैल घाटाने-उतराई गणपती घाटाने २०२२ वर्षाची सुरुवात दोन नितांत सुंदर घाटवाटांच्या ट्रेकने झाली. जंगल भटक्यांना अजुन काय पाहिजे. एक कोकणातून, कर्जत तालुक्यातील नांदगावपासून वर जवळजवळ १००० मीटर्सवर भीमाशंकरला घेऊन जाणारी तर दुसरी भीमाशंकरहून पुन्हा कोकणात म्हणजे खांडसला (तालुका कर्जत) तेव्हढेच अंतर उतरणारी. एक थोडीशी आडवळणाची, त्यामानाने कमी वापराची, कमी रूळलेली पण अतिशय सुंदर, दाट झाडोऱ्याची रानशिळ घाटवाट. ह्याच वाटेला बैलघाट सुद्धा म्हणतात. तर दुसरी जास्त मळलेली नियमित वापराची गणेश/गणपती घाटवाट. दोन्हीही वाटा तुमच्या शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या आहेत.

आनंदयात्री

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 22/03/2022 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
सरल्या साऱ्या चिंता खंती उरल्या नुसत्या खाली भिंती नाही कुणाचे उगा लोढणे दुसर्‍या साठी उगा कुढणे संपून गेले वसंत वैभव भोगत आहे शिशीराचे यौवन फणसा सारखे पिकले गरे आपण बरे,आपले काम बरे पांघरून भूत भूतकाळाचे वेध लागले भविष्याचे खेद ना खंत या भूताचा विचार आता फक्त स्वताचा आनंदयात्री या जगातील वाट चालतो अनंताची ठेऊन दृष्टी अदृष्यातील वाट पाहतो गंतव्याची

डिटेक्टी्व पी.रामराव

लेखक भागो यांनी सोमवार, 21/03/2022 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
पी रामराव. जगप्रसिद्ध प्रायव्हेट डिटेक्टिव. (एफ आर एस डी) बाय अपॉइटमेंट ओन्ली. ही दरवाज्यावरील पाटी वाचून टरकून जायची मुळीच गरज नाही. ह्या क्षणी रामराव ऑफिसमध्ये टेबलावर पाय टाकून आपली नखे साफ करण्यात गुंतले होते. बेकार डिटेक्टिव दुसरे काय करणार? ‘ह्या क्षणी’ अस म्हणण्यातही काही अर्थ नव्हता. रामराव द ग्रेट गेले दोन अडीच तीन महिने दररोज नखे साफ करत होते. डोक्यात तुंबलेल्या बिलांचा विचार चालू होता. बँक बॅलंस अॅबसोल्युट मिनिमम लेवेलला आला होता. बँक आता फाईन लावणार अशी परिस्थिती झाली होती. दुष्काळात तेरावा महिना. दोन महिन्यांचे ऑफिसचे भाडे तुंबले होते.

घोळ - वाघजाई घाट - तेल्याची नाळ - घोळ ट्रेक १९.१२.२०२१

लेखक Vivek Phatak यांनी सोमवार, 21/03/2022 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
घोळ - वाघजाई घाट - तेल्याची नाळ - घोळ ट्रेक १९.१२.२०२१ सह्याद्रीतल्या घाटवाटांचे ट्रेक म्हणजे मनाला अतीव आनंद देणारे. निसर्गाच्या अगदी जवळ नेणारे, निसर्गाशी एकरूप व्हायला लावणारे. इथे जाऊन इथला सुखवणारा नेत्रदीपक निसर्ग पाहून, आनंदीत रोमांचित न होणारा माणूस विरळाच. हां, मात्र त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात, भरपूर पायपीट करायची तयारी असावी लागते. पण खरं सांगतो ह्या घाटवाटांमध्ये फिरताना, वेळ किती गेला आणि पायपीट किती केली ह्याचं भानच राहत नाही इतका तो निसर्ग आपल्याला भरभरून आनंद देतो. तर असाच एक सर्वांग सुंदर घाटवाटेचा ट्रेक करायचा योग आला तो आमच्या STF (Sahyadri Trekkers Foundation) मुळे.