Skip to main content

डायरेक्ट टँक्स कोड (डिटिसी)

लेखक सदानंद ठाकूर यांनी गुरुवार, 01/12/2011 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
डायरेक्ट टँक्स कोड (डिटिसी) मंत्रीमंडळाने डायरेक्ट टँक्स कोड (डिटिसी) बील मंजूर केलेले असून, लोकसभेने मंजूरी दिल्यानंतर सध्या अस्तीत्वात असणा-या इंकम टँक्स अँक्ट १९६१ व वेल्थ टँक्स अँक्ट १९५७ रद्द होऊन त्याऐवजी हे बील अंमलात येईल. हे बिल आर्थीक वर्ष २०१२-१३ पासून म्हणजेच १ एप्रिल २०१२ पासून अंमलात येईल. या बिलामुळे होणारे महत्वाचे बदल खालीलप्रमाणे असणार आहेत. इंकम टँक्सचे दर सर्वच आयकर दात्यांसाठी हे महत्वाचे आहे.

महाराष्ट्र धर्म :- महोत्सव मराठी साहित्याचा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 01/12/2011 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सर्व मिपाकरांना सस्नेह निमंत्रण. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या 'ही राजभाषा आहे' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी ठाण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते होत आहे. पानिपतकार विश्वास पाटीलही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

|| || माझे गाव माझे बालपण || ||

लेखक विवेकखोत यांनी गुरुवार, 01/12/2011 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
" लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा " काल अचानक गप्पाच्या ओघात लहानपणा विषयी गप्पा निघाल्या आणि मन अचानक गावाकडे चक्कर मारून आले. लहान पणाची मजा काही औरच, ती मजा, ती धमाल, तो बिनधास्त पणा मोठे पणी नाही सापडत हो. प्रत्येक गोष्टी मला आठवतात अजून. आमच्या गावाला पाणी टंचाई खूप मला तर आमच्या नळाला पाणी कधी आले ते पण आठवत नाही. नळाच्या खड्डया चा उपयोग आम्ही लपंडाव खेळायला करत असू , एखादा माणूस सहज गडप होईल असे ते खड्डे असत. मग प्रत्येक मोसमात सगळ्या मित्र मंडळीची स्वारी कुठल्या तरी शेतावर असायची.

रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुक

लेखक नितिन थत्ते यांनी गुरुवार, 01/12/2011 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
रिटेल क्षेत्रात ५१ टक्के विदेशी गुंतवणुकीस परवानगी देणारा निर्णय सरकारने नुकताच जाहीर केला आहे. त्यावर मोठाच गदारोळ उठला आहे. त्याबाबत त्यात इन्वॉल्व असलेल्या स्टेकहोल्डर्सच्या दृष्टीकोनातून काय परिणाम होतील हे मांडले आहे. [या प्रस्तावात मॉल्समधील उच्चभ्रू दुकाने- उदा. स्वरॉस्की, रीबॉक, फास्ट्रॅक, ग्लोबस, जिली, तनिष्क वगैरे विचारात घेतलेली नाहीत]. (मोठ्या शहरांतील) मध्यमवर्गीय ग्राहकाच्या दृष्टीने: सध्याच्या व्यवस्थेत एका लांबलचक पुरवठा साखळीतून ग्राहकाला माल मिळतो.

एकदा वाटलं कविता करावी...

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 01/12/2011 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा वाटलं कविता करावी... सोप्पं तर असतं.. 'र' ला 'र' आणी 'ट' ला 'ट', त्यात काय एवढं... जमेल की आपल्यालाही एवढे काय आपण 'हे' आहोत... थोडे छान, थोडे दुर्बोध, थोड रुपकात्मक,थोडे तरल, काही मात्र अगदीच वास्तव लिहू आपण चार शब्द... मात्रा देखील जमतीलच की, वृत्त थोडी अडखळ्तील ही, कवयत्रिचे देउन नाव, निभावून ही जाईलच की... मग वाटले नको असे, मग वाटले नकोच ते, मिळेल फटका, होईलही कौतुक, पण कशाला हवे जोडायला आपलं पोतेरं कवितांच्या मलमली गालिच्यांना..... ( इतरत्र पूर्वप्रकाशित)
काव्यरस

चर्चाविषय विदेशी थेट गुंतवणुक...

लेखक कोदरकर यांनी गुरुवार, 01/12/2011 05:43 या दिवशी प्रकाशित केले.
केंद्रीय मंत्रिमंडळाने रिटेल व्यापार क्षेत्रात ५१% परदेशी गुंतवणुक करण्यास मान्यता दिल्यामुळे सद्ध्या आपल्या देशात या योजनेच्या दुरगामी परिणामांची चर्चा चालु आहे.. दोन्ही बाजुच्या बाबी लक्षात घेता काही विचार करण्यासारख्या गोष्टी १) मोठया प्रमाणात गुंतवणुक आल्यामूळे देशातील पायाभूत सुविधा मध्ये वाढ, शीत केंद्र, गोदाम बांधणी २) स्पर्धेमुळे भाव वाढ नियंत्रण ३) छोट्या शहरातील व्यापारी संरक्षण ४) सरकारी कर रुपी उत्पन्न विरोधी मुद्दे १) व्यापारी म्हणुन येणार राज्यकर्ते बनणार २) संस्क्रुति अतिक्रमण ३) छोटे व्यापारी यांचा असुरक्षित ४) स्थानिक उद्योग धोक्यात वरील मुद्दे पाहता माझे सध्याचे मत तरी निर्

पालक वडी

लेखक Mrunalini यांनी गुरुवार, 01/12/2011 03:57 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पालक - १ जुडी बेसन - १/२ कप तांदुळाच पीठ - ३ चमचे आले-लसुण पेस्ट - १ चमचा हिरवी मिरची पेस्ट - १ चमचा हळद - १/२ चमचा लाल तिखट - १ चमचा गरम मसाला - १/४ चमचा हिंग - १/४ चमचा ओवा - १ चमचा तिळ - १ चमचा तेल - १ चमचा मिठ चवीनुसार कृती: १. पालक धुवुन १ तास निथळत ठेवावा. जितका जास्त कोरडा करता येईल, तेवढा कोरडा करुन घ्यावा. २. पालक बारीक चिरुन घ्यावा. ३. त्यात बेसन, तांदुळाचे पीठ, आले-लसुण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, हळद, ओवा, लाल तिखट, गरम मसाला, तिळ व चवीनुसार मिठ टाकावे. ४. हे पीठ निट मिक्स करावे. हे करताना पालकाला पाणी सुटल्यामुळे पीठ ओले होते. ५.

मनातली घालमेल

लेखक सचिन भालेकर यांनी गुरुवार, 01/12/2011 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
विषय थोडा वेगळा असेल कदाचित............... माझी चुक नसताना पण माझ्याकडुन खुप मन दुखवली जाणार असेल तर................ माफी कशी मागावी हेच समजत नाहिये............... मदत हवी आहे तुमच्या सल्ल्याची..............