रिटेल क्षेत्रात ५१ टक्के विदेशी गुंतवणुकीस परवानगी देणारा निर्णय सरकारने नुकताच जाहीर केला आहे. त्यावर मोठाच गदारोळ उठला आहे. त्याबाबत त्यात इन्वॉल्व असलेल्या स्टेकहोल्डर्सच्या दृष्टीकोनातून काय परिणाम होतील हे मांडले आहे.
[या प्रस्तावात मॉल्समधील उच्चभ्रू दुकाने- उदा. स्वरॉस्की, रीबॉक, फास्ट्रॅक, ग्लोबस, जिली, तनिष्क वगैरे विचारात घेतलेली नाहीत].
(मोठ्या शहरांतील) मध्यमवर्गीय ग्राहकाच्या दृष्टीने:
सध्याच्या व्यवस्थेत एका लांबलचक पुरवठा साखळीतून ग्राहकाला माल मिळतो. त्या साखळीतल्या प्रत्येक दुव्याच्या नफ्यामुळे* उत्पादकाला जी किंमत मिळते त्यापेक्षा खूप जास्त (काही पट) किंमत ग्राहकाला पडते. याचे कारण ग्राहक किरकोळ विक्रेत्याकडून खरेदी करतो त्याला फार मोठ्या प्रमाणात खरेदी करणे शक्य नसल्याने त्यालाही बर्याच जास्त किंमतीला माल मिळतो.
अ-सध्या काही प्रमाणात बिग बझार, रिलायन्स फ्रेश यांच्या मेगास्टोअरमधून थेट खरेदी - थेट विक्री या मार्गाने व्यापार होतो त्यात ग्राहकाला काही प्रमाणात कमी किंमतीत माल मिळतो असा अनुभव आहे. याचा अर्थ हे कॉर्पोरेट (देशी अथवा विदेशी) रिटेलचे माध्यम ग्राहकासाठी फायद्याचे ठरत असल्याचे दिसते.
ब- हे मॉडेल अधिकाधिक ग्राहकांना उपलब्ध व्हावे असा प्रयत्न होणे फायद्याचे आहे. त्यासाठी अश्या स्टोअरची आणि पुरवठा साखळीची उभारणी, यांत भरपूर आर्थिक गुंतवणुकीची गरज असेल. सध्या या क्षेत्रात असलेल्या आणि येऊ पाहणार्या देशी कंपन्यांची ही गुंतवणुक करण्याची क्षमता आणि तयारी आहे की नाही हे माहिती नाही. ती नसेल तर विदेशी गुंतवणुक येणे फायद्याचे ठरेल.
क- ५१ टक्केच विदेशी गुंतवणुक असेल तर उरलेली ४९ टक्के गुंतवणुक देशी असेल. ती गुंतवणुक देशीच लोक (विदेशी गुंतवणुकीशिवाय) का करणार नाहीत? कदाचित या ४९ टक्के देशी गुंतवणुकदारांकडे अश्या सप्लाय चेन चालवण्याचा नो-हाऊ नसेल.
उत्पादकांच्या दृष्टीने:
अ- ग्राहकोपयोगी औद्योगिक मालाचे उत्पादक (टिव्ही, एसी, पंखे, फ्रीज, खेळणी, पादत्राणे, विजेवरील इतर उपकरणे)- सध्याच्या व्यवस्थेत ग्राहकाला पडणार्या किंमतीच्या ४० टक्के किंमत उत्पादकाला मिळते. त्यापेक्षा किंचित जास्त किंमत कॉर्पोरेट रिटेल माध्यमातून मिळण्याची शक्यता आहे. एक फरक पडण्याची शक्यता आहे. आज अनेक औद्योगिक उत्पादक चीनमधून वस्तू आयात करतात आणि स्वतःच्या नावाने बाजारात विकतात. थेट विदेशी गुंतवणुकीनंतर या वस्तू वॉलमार्ट वगैरे लोक थेट आयात करतील. त्यामुळे देशी उत्पादक त्यावर जो मलिदा आज खातात तो त्यांना खाता येणार नाही.
ब- ग्राहकोपयोगी पॅकेज्ड मालाचे कॉर्पोरेट उत्पादक (सॉस, जॅम, साबण, सौंदर्यप्रसाधने, बिस्किटे, शीतपेये, मसाले, फरसाण, नमकीन) - यातही सध्याच्या व्यवस्थेपेक्षा फारसा फरक पडण्याची शक्यता नाही.
क-पॅकेज्ड अन्नपदार्थांचे आणि ग्राहकोपयोगी वस्तूंचे स्थानिक उत्पादक (पापड, लोणची, विविध पिठे, फरसाण, नमकीन, पर्सेस, बाळांचे कपडे)- या उत्पादकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परंतु ते बर्याच अंशी ग्राहकांच्या वर्तणुकीवर अवलंबून असेल. अजून भारतात सर्व खरेदी सुपरस्टोअर्समधूनच करण्याची पद्धत नाही. तसेच पुढे चालू राहिले तर यांच्या किंमती कमी असल्याने ग्राहकांचा आश्रय मिळत राहील. मात्र अमेरिकेत अश्या प्रकारचे उत्पादक नामशेष झाले असल्याचे वाचले आहे.
ड- अन्नधान्याचे उत्पादक शेतकरी - आजच्या व्यवस्थेत यांची भयंकर नाडणूक होते असे आपल्याला माहिती आहे. त्यात झाली तर सुधारणा होऊ शकेल. याचे कारण सध्याच्या सवयीमुळे ग्राहक तांदूळ चाळीस रुपयांनी घेत असेल तर ते पस्तीस रुपयांनी घ्यायला तयार होईलच. मग हे कॉर्पोरेट रीटेल स्टोअर त्यांना २० रुपयांपर्यंत भाव देण्याची शक्यता आहे. परंतु अन्नधान्याचे उत्पादन सहसा सीझनल असले म्हणजे एका विशिष्ट कालावधीत ते मोठ्या प्रमाणात तयार होतात / उपलब्ध असतात. त्यामुळे भाव पडण्याची रड चालूच राहील असे वाटते. शेतकर्यांनी आगाऊ करार केले तर फायदा होऊ शकेल. परंतु तो करार निभावणे भाग पडेल.
इ. भाजी, फळे इत्यादि नाशिवंत मालाचे शेतकरी- यांचा बराच फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु येथेही आगाऊ करार करणे आवश्यक ठरेल. शिवाय सध्या मालाच्या दर्जाबद्दल जागृती नसते माल 'जसा आहे' तत्त्वावर शेतकरी पुरवतात. त्या दर्जाबद्दल जागरूक रहावे लागेल आणि माल व्यवस्थित सॉर्ट करून द्यावा लागेल,
(मोठ्या शहरांतील) कनिष्ठ वर्गातील ग्राहकांच्या दृष्टीने-
अ- हे ग्राहक मोठ्या सुपरस्टोअर्मध्ये जात नसल्याने आणि मोठ्या सुपरस्टोअरमधून भरपूर प्रमाणात वस्तू घेण्याची शक्यता नसल्याने त्यांना सध्याच्या पुरवठायंत्रणेवर अवलंबून रहावे लागेल आणि त्यांना फरक पडणार नाही. मध्यमवर्गीय ग्राहक या पुरवठायंत्रणे पासून तुटले तर धंदा टिकवण्यासाठी या जुन्या पुरवठा यंत्रणेला भाव कमी करणे गरजेचे वाटू शकेल.
ब- हे ग्राहक अनेकदा ब्रॅण्डेड वस्तू घेत नाहीत. ते लक्स, सर्फ, विमबार घेत नाहीत लक्सजैसा, सर्फजैसा दुसरे काहीतरी घेतात. या लक्सजैसा साबण मॉलमध्ये मिळत नाहीत (बिग बझार/डीमार्टमध्ये मिळतातसुद्धा) त्यामुळे ते जुन्या प्रकारच्या दुकानांवर अवलंबून राहतील.
उत्पादक आणि ग्राहक या साखळीतल्या दुव्यांच्या दृष्टीने
अ- वर सांगितलेल्या कारणांमुळे फारसा फरक पडणार नाही.
ब- शिवाय स्थानिक दुकानदार घरपोच डिलिव्हरी, उधारी, महिन्याचे खाते वगैरे सोयी देतो ज्या सुपरस्टोअर्स मध्ये मिळत नाहीत. त्यामुळे असे ग्राहक स्थानिक दुकानदारांकडे जात राहतीलच.
क- आयत्या वेळी लागणार्या प्रत्येक छोट्या वस्तूसाठी मॉलमध्ये जाणे शक्य नसेल त्यामुळेही स्थानिक दुकानदारांची चलती राहील. पण व्हॉल्यूम कमी होईल हे मात्र खरे.
ड- सुपरस्टोअर मॉल हे प्रकरण मोठ्या शहरांपुरतेच सीमित असल्याने इतरत्र अजूनही रान मोकळेच आहे.
इ- काही शहरांत असलेल्या स्थानिक स्टोअरच्या साखळ्यांना (तीव्र आणि कदाचित असमान) स्पर्धेचा सामना करावा लागेल.
देश, समाज आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने
अ- यात र्हेटरिकल पवित्रा घेतला जाऊ नये असे वाटते. सुपरस्टोअर हवीत असे असेल तर रिलायन्स टाटा चालतील वॉलमार्ट नको या म्हणण्याला अर्थ नाही.
ब- देशाचा नक्की काय फायदा होणार आहे हे माहिती नाही. कोणते विशेष तंत्रज्ञान येणार आहे, किती भांडवल येण्याची शक्यता आहे वगैरे प्रश्नांची उत्तरे सध्या माहिती नाहीत.
क- स्पर्धा ही ग्राहकांसाठी चांगली हे खरे असले तरी एक्सेसिव्ह स्पर्धा अर्थव्यवस्थेसाठी मारक असू शकते. कारण त्यात काही खेळाडू बंद पदण्याची शक्यता असते आणि त्या खेळाडूचे इन्फ्रास्ट्रक्चर (म्हणजे त्यावर खर्च झालेले मटेरिअल वगैरे) वाया जाऊ शकते.
सदस्यांनी अधिक भर घालावी.
मला अजून सुचेल ते मी प्रतिसादातून मांडेन.
वाचन संख्या
16041
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
हायला !
माझे दोन पैसे
डावे विचार
In reply to माझे दोन पैसे by मन१
गांधीजींनी आणि टिळकांनी
In reply to डावे विचार by अप्पा जोगळेकर
कोल्हापुरच्या गुळाच्या
चेन विदेशी कशाला हवी?
In reply to कोल्हापुरच्या गुळाच्या by विजुभाऊ
चेन विदेशी कशाला हवी? हा
In reply to चेन विदेशी कशाला हवी? by मन१
म्हणजे हो.
In reply to चेन विदेशी कशाला हवी? हा by नितिन थत्ते
चिली / थायलंड / युरोप
मी किराणा मालाचे दुकान
हो. मिपावर जाहीरात देऊन
In reply to मी किराणा मालाचे दुकान by subakathengani
या बाबतीत ओपन सोर्स पद्धत वापरता येणार नाही का?
म्हणजे?
In reply to या बाबतीत ओपन सोर्स पद्धत वापरता येणार नाही का? by चैतन्यकुलकर्णी
सहमत
अगदी असच!
In reply to सहमत by तिमा
माझे थोडे विचार.
In a nutshell
In reply to माझे थोडे विचार. by जयंत कुलकर्णी
उत्पादकाला आणि
In reply to In a nutshell by अन्या दातार
काही मतं पटली
In reply to माझे थोडे विचार. by जयंत कुलकर्णी
बायस्ड नाहीत पण जरा
In reply to काही मतं पटली by दादा कोंडके
अनेक थोर थोर लोकांना, अगदी
अगदी मुद्याचं बोललात !!
In reply to अनेक थोर थोर लोकांना, अगदी by आशु जोग
वाचतोय.
'मॉल'च्या विळख्याचा अर्थ वेळीच ओळखा
http://72.78.249.107/esakal/2
सध्या
राईचा पर्वत करण्यात काय अर्थ आहे?
अमेरिकेच्या चीनमधुन होणार्या
सकारण विरोध
>>इथे संस्थळावर
In reply to सकारण विरोध by विसुनाना
देशासमोर
निर्णय स्थगित...
+१
In reply to निर्णय स्थगित... by दादा कोंडके
मला वाटते जेव्हा लोक त्यांचे
In reply to +१ by नगरीनिरंजन
मुद्दे थोडेफार पटतात पण...
In reply to मला वाटते जेव्हा लोक त्यांचे by जयंत कुलकर्णी
प्रतिसाद
In reply to मुद्दे थोडेफार पटतात पण... by नगरीनिरंजन
ननि,मुद्दा ही वेळ हे करायला
In reply to मुद्दे थोडेफार पटतात पण... by नगरीनिरंजन
चाचा वालमार्ट किंवा इतर मेगा स्टोअर
स्थानिक उत्पादकांचे हित
In reply to चाचा वालमार्ट किंवा इतर मेगा स्टोअर by वेताळ
@ननि.. तुमच्या वरच्या
In reply to स्थानिक उत्पादकांचे हित by नगरीनिरंजन
माझ्या उत्तराततरी मी वॉलमार्ट
In reply to @ननि.. तुमच्या वरच्या by गवि
अहो मी तुमचा किंवा कोणाचा
In reply to माझ्या उत्तराततरी मी वॉलमार्ट by जयंत कुलकर्णी
अहो गवि, तुम्ही मला उद्देशून
In reply to अहो मी तुमचा किंवा कोणाचा by गवि
http://www.loksatta.com/index
चांगला
धन्यवाद
In reply to चांगला by विकास
काय वाटते...
In reply to धन्यवाद by नितिन थत्ते