Skip to main content

काय करावे या किड्याला ?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 28/12/2011 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
काय करावे या किड्याला साला लिहिता लिहु देत नाही डोक्यात बरेच येत असते पण डोळ्यांना पाहु देत नाही. सुचत असते पान उघडल्यावर 'हे'...'हे'...लिहायचे.. पण बसले एकदा लिहायला की..ते-तेच का रहायचे..?
काव्यरस

कचरावाला

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 28/12/2011 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , खुप दिवसानी मिसळपाव वर लिहित आहे ..खुप म्हणजे अगदी बरेच दिवस झाले .... इंजिनिअरींग ,त्यासोबत असणार्‍या अ‍ॅक्टिव्हिटीज आणि बरेच पालथे धंदे ...

अण्णा चक्रव्यूहातील अभिमन्यू !

लेखक आशिष अनिल म्हात्रे यांनी बुधवार, 28/12/2011 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
Anna Hajare महाभारताच्या युद्धात १६ वर्षीय अर्जुनपुत्र अभिमन्यू याने कौरवांच्या चक्रव्यूहाचा भेद करण्याचा प्रयत्न केला. दुर्योधन, कर्ण, जयद्रथ इत्यादी कौरवांच्या महारथींना तोंड देत तरुण वयात एवढा मोठा पराक्रम केल्यामुळे भारताच्या इतिहासात अभिमन्यू अजरामर झाला. अधर्माच्या विरोधात धर्माने दिलेल्या या लढाईत धर्मासाठी अनेक रथी-महारथींनी पराक्रम केला. त्यांच्या पराक्रमामुळेच धर्माचा जय झाला. कौरवांच्या ११ अक्षौहिणी सैन्याचा केवळ ७ अक्षौहिणी पांडव सेनेकडून पराभव झाला.

मागे वळुन बघायच नाही

लेखक निश यांनी बुधवार, 28/12/2011 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
समजावल आहे मनाला आता मागे वळुन बघायच नाही. जरी आला विचार अंतरी आठवणीत अडकायच नाही. झाली जखम मनाला तरी जखमी होऊन रडायच नाही. आपल सुख मिळाव आपल्याला तरी हे जरी असल खर तरी जगात कोणी कुणाच नसत हे खोट समजायच नाही. असेल ताकद लढायची तर हरलेला डाव नव्या उमेदीने उभा करुन परत कधी खचायच नाही. मागे वळुन बघायच नाही....

आठवतोस तू .....!!

लेखक फिझा यांनी बुधवार, 28/12/2011 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
फोन हाती घेतल्यावर बघावा एखादा sms सेंड करावासा वाटावा , मग नकोच जाऊदे असे वाटावे , फक्त कळावे एवढंच कि या क्षणी आठवतोस तू ..... न चुकता करावा तुला फोन मग तू उगीचच काहीतरी बोलवे बोलता बोलता मग असाच वेळ निघून जावा ,फक्त कळावे एवढंच कि या क्षणी आठवतोस तू .... बोलणे व्हावे खूप काही पण जेवढ्यास तेवढे असेच नेहमी, गप्पच असतात मग ते बोलणारे शब्दही ,फक्त कळावे एवढंच कि या क्षणी आठवतोस तू ..... अगदी पहाटे कधी पाऊस पडावा, तुझी आठवण येऊन चहा पिऊन झालेला असावा, आरसाही सकाळीच रुसलेला असावा,फक्त कळावे एवढंच कि या क्षणी आठवतोस तू .....

एकी १

लेखक लीलाधर यांनी बुधवार, 28/12/2011 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
एकी १ आईने केला केक, दुरकी २ बाबांना केला फोन ! तीरकी ३ ताईने दीला पेन, चौकी ४ आमचा बाळू हुशार ! पाची ५ मिळून करू नाच, साही ६ आमचा नाच पहा ! साती ७ आमची न्यारी बात, आठी ८ घडेल का आई बाबांची भेट? नौवे ९ मिळून सारे गाऊ, दाही १० बाळूला आवडते माऊ !
काव्यरस

दत्त दत्त बोलत गेलो

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 28/12/2011 04:13 या दिवशी प्रकाशित केले.
दत्त दत्त बोलत गेलो दत्त दत्त बोलत गेलो गेलो गेलो दत्त दत्त बोलत गेलो दत्ताला भजूनी धन्य झालो झालो झालो दत्ताला भजूनी धन्य झालो || दत्तनाम सदा राहे माझ्या मुखी जगामधे मीच आहे सर्व सुखी नकळे मला मी कोण होतो दत्ता समोर प्रत्यक्ष शरण आलो || गुरूदत्तावरी माझा राही विश्वास दत्त दत्त सदा घेई अंतरी श्वास विस्मये आश्चर्ये असे दत्त किर्ती वेळीअवेळी दत्ताला आठवित गेलो || चिंता क्लेश उणीवा असती माझ्यात प्रयत्न करणे केवळ असे हातात मागणे माझे काही नसता दत्तगुरू प्रसाद नित्य मुखी मिळो || - पाभे
काव्यरस

कळीकाळानं असला कसला मौका साधला

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 28/12/2011 03:14 या दिवशी प्रकाशित केले.
कळीकाळानं असला कसला मौका साधला कळीकाळानं असला कसला मौका साधला व्हता तो आधार आमचा निघूनीया गेला ||धृ|| बाप तू रं आमचा तूच आमची माय दूध बी तूच आन तूच दूधावरली साय कोना म्हनू आता आमी माय अन बाप तुझ्यायीना जगू कसं कळंना आम्हाला ||१|| न्हावूमाखू केलं तू रं तूच घातलं खावू तू न्हाई समोर आता आमी कुठं पाहू इस्तवात पडलो जवा तवा तूच विझवाया आला ||२|| पुर्वप्रकाशित:
काव्यरस

सुके मटण चॉप्स

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 28/12/2011 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः मटण चॉप्स - ५-६ दहि - १/२ कप आले लसुण पेस्ट - १ चमचा मिरची पेस्ट - १/२ चमचा हळद - २ चमचे लाल तिखट - ४ चमचे धणे जिरे पावडर - १ चमचा गरम मसाला - १ चमचा विलायची पावडर - १/४ चमचा लिंबुचा रस - १ चमचा रवा - १/२ वाटी तेल - १/२ वाटी मिठ चवीनुसार कृती: १. मटण चॉप्स धुवुन कोरडे करुन घ्यावेत. २. दही, आले लसुण पेस्ट, मिरची पेस्ट, १ चमचा हळद, २ चमचे लाल तिखट, गरम मसाला, धणे जिरे पावडर, विलायची पावडर, लिंबुचा रस, २ चमचे तेल व चवीनुसार मिठ टाकुन मिक्स करुन घ्यावे. ३. ह्यात मटण चॉप्स टाकुन, मिक्स करुन ४-५ तास मुरवावे. ४.

तोच थंडगार भात

लेखक विदेश यांनी मंगळवार, 27/12/2011 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : तोच चन्द्रमा नभात ) तोच थंडगार भात तीच प्लेट पाहुनी एकांती मजसमीप तीच भीति का मनीं ! खारट चटणी तशीच रोज तेच भांडणे पोळ्यांनी सोडियले नीट येथ भाजणे भाजीचा गंध तोच तीच कुबट फोडणी ! सारे जरि ते तसेच संधि आज ती कुठे ? मीहि तोच, तीच तीहि, दुसरी मेस ती कुठे ? ती कपात ना दरात अश्रु दोन लोचनी !
काव्यरस