मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दत्त दत्त बोलत गेलो

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
दत्त दत्त बोलत गेलो दत्त दत्त बोलत गेलो गेलो गेलो दत्त दत्त बोलत गेलो दत्ताला भजूनी धन्य झालो झालो झालो दत्ताला भजूनी धन्य झालो || दत्तनाम सदा राहे माझ्या मुखी जगामधे मीच आहे सर्व सुखी नकळे मला मी कोण होतो दत्ता समोर प्रत्यक्ष शरण आलो || गुरूदत्तावरी माझा राही विश्वास दत्त दत्त सदा घेई अंतरी श्वास विस्मये आश्चर्ये असे दत्त किर्ती वेळीअवेळी दत्ताला आठवित गेलो || चिंता क्लेश उणीवा असती माझ्यात प्रयत्न करणे केवळ असे हातात मागणे माझे काही नसता दत्तगुरू प्रसाद नित्य मुखी मिळो || - पाभे

वाचने 1960 वाचनखूण प्रतिक्रिया 9

लीलाधर 28/12/2011 - 08:16
पाभे गुरूब्रह्मा गुरूर्विष्णू, गुरूर्देवो महेश्वरा: ! गुरू:साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ! श्री गुरूदेव दत्त !

अत्रुप्त आत्मा 28/12/2011 - 09:40
नेहमी सारखं जमलं नाही पा.भे.... कापड चांगलं होतं, बेतलं बी चांगलं, पण अंगाला नाही आलं...!

अमोल केळकर 28/12/2011 - 09:44
सुंदर रचना ! गुरुदेव दत्त ! अमोल

मृगनयनी 28/12/2011 - 10:14
अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त! :) शब्दाशब्दातून दत्त-भक्ती ओसंडून वाहते आहे..... :) आणि भक्तीरूप शब्दांना विभक्ती,मात्रा, वृत्त इ. गोष्टींची गरज भासत नसते. त्यामुळे जास्त आवडली! :)

मदनबाण 28/12/2011 - 10:19
गुरूदत्तावरी माझा राही विश्वास दत्त दत्त सदा घेई अंतरी श्वास विस्मये आश्चर्ये असे दत्त किर्ती वेळीअवेळी दत्ताला आठवित गेलो || सुंदर रचना... ही रचना वाचुन मला अजित कडकड्यांनी गायलेले हे गीत आठवले... दत्त दत्त मुखे म्हणा दत्त दत्त मुखे म्हणा दत्त गोविंद हो...

निश 28/12/2011 - 10:59
छान जमलीये रचना सुंदर रचना... मस्त

गणेशा 28/12/2011 - 13:41
मस्त प्रार्थना/आरती/कविता. असेच लिहित रहा... वाचत आहे.......