फोन हाती घेतल्यावर बघावा
एखादा sms सेंड करावासा वाटावा ,
मग नकोच जाऊदे असे वाटावे , फक्त कळावे
एवढंच कि या क्षणी आठवतोस तू .....
न चुकता करावा तुला फोन
मग तू उगीचच काहीतरी बोलवे
बोलता बोलता मग असाच वेळ निघून जावा ,फक्त कळावे
एवढंच कि या क्षणी आठवतोस तू ....
बोलणे व्हावे खूप काही
पण जेवढ्यास तेवढे असेच नेहमी,
गप्पच असतात मग ते बोलणारे शब्दही ,फक्त कळावे
एवढंच कि या क्षणी आठवतोस तू .....
अगदी पहाटे कधी पाऊस पडावा,
तुझी आठवण येऊन चहा पिऊन झालेला असावा,
आरसाही सकाळीच रुसलेला असावा,फक्त कळावे
एवढंच कि या क्षणी आठवतोस तू .....
संसारी माणसाने संसार करावा
गुंतलेला असतो जीव सगळ्याच गोष्टींमध्ये .....
तरीपण कधी कवितेचा विषय निघावा ,
कविता वाचायला वेळ नसला तरी ,फक्त कळावे
एवढंच कि या क्षणी आठवतोस तू .....
नेहमीचेच सगळे पण तरीही सगळे नवीन
ती पहाट तो पाऊस ,तो दिवस ती रात्र
पत्र लिहावे आणि परत खोडावे,फक्त कळावे
एवढंच कि या क्षणी आठवतोस तू .....
सगळे बदलले फक्त 'तू ' आणि 'मी' शिवाय
हवेची झुळूक सुद्धा आता वादळ वाटते ,
पावसाची सर आता अश्रुतल्या थेम्बासारखी भासते,
आठवण आलीच तर आता हा पाऊस कोसळतो ,
आठवण येऊ नये म्हणून गोंगाट करतो ,फक्त कळावे
एवढंच कि या क्षणी आठवतोस तू ....
पाऊस पडून गेल्यावरही नदी सागराकडेच वाहते
कितीही वादळ असले तरी ती मात्र संथ असते,
पावसाच्या सरी असो कि कोरडा वारा असो,
सागरापर्यंत ते कधी नाही पोहोचत,,,फक्त कळावे
एवढंच कि या क्षणी आठवतोस तू ......
कळणार नाही त्याला तिची व्यथा कधीच ,
कारण होकाराच्या तयारीत असतो तो आधीच ,
भेटण्याच्या ओढीने मग तीही काही बोलतच नाही ,
त्याच्यामध्ये सामावल्यावर तिचे अस्तित्व उरतच नाही ......
..............फक्त कळावे
एवढंच कि या क्षणी आठवतोस तू .....
| लेखनविषय: |
|---|
याद्या
1279
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान छान
अप्रतिम
छान आहे