अलिस्टर परेरा
आजच वर्तमानपत्रात एका बातमीने लक्ष वेधून घेतले. दारू पिऊन गाडी चालवून पदपथावरील ७ लोकांना मारल्याबद्दल अलिस्टर परेरा या व्यक्तीस दिलेल्या ३ वर्षांच्या शिक्षेबाबत बातमी होती. ही आणि आणि अश्या अनेक बातम्या दर महिन्याकाठी आपण वाचत असतो. म्हणजे कोण्या मोठ्या व्यक्तीच्या हातून असा काही घडलं की त्याची बातमी पहिल्या पानावर असते, बाकीच्या अश्या दुसऱ्या/तिसऱ्या पानावर येतात.
लेखाचा विषय असा की ह्या माणसावर (आणि पूर्वी सलमान खानवर) जो आरोप केलेला आहे त्यात मनुष्यवधाचाही समावेश होतो. 'Culpable homicide' म्हणजे सदोष मनुष्यवध. ह्याला थोडासा आक्षेप घ्यावासा वाटतो.
मिसळपाव

