Skip to main content

स्थलांतरण - आताचे आणि पूर्वीचे

लेखक शेखर काळे यांनी गुरुवार, 19/01/2023 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना उपयोजक यांनी काही दिवसांपूर्वी भारताच्या तुलनेत हा लेख लिहून विचाराला बरीच चालना दिली. त्यावर प्रतिक्रियांचा आणि विचारांचा बराच उहापोह झाला. सगळ्याच प्रतिक्रिया चांगल्या आहेतच. सगळ्यांनीच आपल्या मनातील विचार मांडले. माझे विचार जरा वेगळे आहेत. आपण सगळेच आपापल्या परीने आपले जीवन, जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला हवे ते काम, आवडणारे काम करण्याचा विचार करतो आणि अर्थार्जनाचाही विचार बराच वरचा असतो. स्थलांतरण स्थलांतरण किंवा इमिग्रेशन हे आजच होते आहे का?

पुन्हा एकदा पहाट झाली

लेखक सागरसाथी यांनी मंगळवार, 17/01/2023 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस रोज एक कावळा पुनईच्या उंंचच उंच झाडावर बसून आपल्या घराण्याचा तीव्र स्वर सोडून कोमल स्वरात साद घालताना दिसत होता. त्याच्या गोड बोलण्याला दाद देणारे आसपास कोणीच दिसत नव्हते. गावात कावळे दिसेनाचे होवूनही कितीतरी काळ लोटला हे त्याला माहीतीच नसावे असे वाटत होते.

विसरून जाऊ सारे.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 15/01/2023 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबी थंडी हवेत गारवा अंगावर रग शेकोटीची धग संक्रातीचा सण सुगडाचं वाण सवाष्णी सोळा काळी चंद्रकळा तीळाचा हलवा हलव्याचे दागिने तीळाचं दान बाळाचं बोरन्हाण बाजरीची भाकरी तीळाची पेरणी लोण्याचा गोळा खिचडीचा मान गुळाची पोळी तीळाची वडी हलव्याचा काटा वाढवतो गोडी तीळगुळ घ्या गोड बोला
काव्यरस

टेलिकॉम क्रांतीचे महास्वप्न -माझा प्रवास (सॅम पित्रोदा)-- भाग २

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 13/01/2023 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग टेलिकॉम क्रांतीचे महास्वप्न -माझा प्रवास (सॅम पित्रोदा) तर मागच्या भागात आपण पाहिले की ६० च्या दशकात अमेरिकेत काही स्वप्ने घेऊन आलेले सॅम आता चांगलेच स्थिरावले होते, अमेरिकन नागरिकत्व ,दोन मुले आणि पत्नी असे सुखी कुटुंब, शिवाय भाऊ बहिणी आई वडील बहुतेक सर्वजण एक एक करून अमेरिकेत आलेले होते. वेसकॉम विकल्यामुळे तर इतका पैसा मिळाला होता की पुढचे सर्व आयुष्य केवळ त्या पैशांच्या व्याजावर जाऊ शकत होते. पण त्यांना आता भारतातील टेलिकॉम क्षेत्र सुधारण्याचा किडा चावला होता.

पूर्वसंचित

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 12/01/2023 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
होत खळाळता प्रवाह नदीच्या अंगा खांद्यावर इवलेसे मुलं होऊन खेळावं होत चमचमता प्रकाश रात्रीच्या नभ अंगणात शुभ्र टिपूर चांदणं व्हावं घेत मखमल अंगावर घुटमळत मनाच्या पायरी लाडकी मांजर व्हावं मांडावं, पुसावे कागदावर पुढच्या वळण वाटेचे जुळवत हिशोब राहावं पूर्वसंचित फुलपाखरे बसता कमल मनी गहिवर ऊतू जावा... -भक्ती १२/०१/२०२३

मावळतीची दिशा....

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 12/01/2023 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे निसटल्या क्षणांना पुन्हा धरावे पारंब्या वरती झुलता झुलता पदराखाली पुन्हा लपावे कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे भोगल्या क्षणांना पुन्हा जगावे आठवणीतले विस्मृत चेहरे पुन्हा एकदा तरी दिसावे डोळ्या मधले दवबिंदू अन् चेहर्‍यावरले धुके पुसावे हुरहुरत्या त्या कातरवेळी ,कधी कुणाची वाट बघावी दुरून बघता ओंजळीतली, प्राजक्ताची फुले दिसावी किती मिळाली किती गळाली, मनात आता खंत नसावी मात्र मागणे एकच ,मावळतीची दिशा पूर्व असावी!! कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे भोगल्या क्षणांना पुन्हा जगावे

मनात माझ्या

लेखक किरण कुमार यांनी बुधवार, 11/01/2023 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या बटांतून अवखळ वारा छेदित जातो सळसळ पाने मनात माझ्या तुझ्या ओठीचे अल्लड आणिक अचपळ गाणे नदी वळावी कटी पाहूनी ओठांवरती लाली नभाची मनात माझ्या कवेत घ्यावी मोहक मूर्ती तुझ्या तनाची फिकेच पडती सागर येथे इतुके चंचल नयनी पाणी मनात माझ्या खोल आतवर तुझ्या प्रीतीची अबोल वाणी सुरेख बांधा घट्ट कंचुकी पदर जरीचा त्यावर तारे मनात माझ्या चुंबून घ्यावे पाठीवरचे कोंदण प्यारे लाखेचे ते चढवूनी कांकण साद कशाला नुपूर पदांना मनात माझ्या इथे टिपावे तुझ्या खोडकर खेच अदांना घरा घरातून दर्प सुटावा देह तुझा की आहे अत्तर मनात माझ्या प्रश्न कितीसे तूच त्यावरी होशी उत्तर गाभाऱ्यातील देव मनाचे

राहुलचे सल्लागार ?? (दिल्ली गुजरात निवडणूक)

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 11/01/2023 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच महिन्यानंतर शर्माजी(काल्पनिक नाव) बिंदापूरच्या चौकात वर्तमानपत्र वाचताना दिसले. शर्माजीचे वय 80 ते 85च्या मध्ये असेल. जेव्हा मी 1988 मध्ये उत्तम नगर भागात राहावयास आलो तेव्हापासून शर्माजींना पांढऱ्या दाढीचा बघत आलो आहे. शर्माजींचा व्यवसाय प्रॉपर्टी डीलरचा होता. याशिवाय ते काँग्रेसचे खंदे प्रचारक होते. त्यांच्या घरात नेहरू आणि इंद्राजी सोबत त्यांचे अनेक फोटो होते. निवडणुकीच्या काळात तर त्यांचा अंगात भूत संचारत असे. अनेक बूथांची व्यवस्था ते जातीने बघत असे. त्यात ते भरपूर कमिशन ही बनवत असे, असे लोक म्हणतात.

बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 10/01/2023 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये बदामी किल्ला उतरुन संग्रहालय पाहिले, हे संग्रहालय अगदी न चुकवण्याजोगेच आहे. ते पाहून आता अगस्ती तलावाच्या काठाने भूतनाथ मंदिर पाहायला निघालो. आपल्या डाव्या बाजूला बदामी किल्ला आणि उजव्या बाजूस अगस्ती तलाव, आणि त्याच्या पलीकडे बदामीच्या लेण्या असे सुरेख दृश्य येथून बघायला मिळते.