Skip to main content

ज्ञानेश्वरी आणि श्रोडिंगर्स कॅट

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 03/02/2023 02:36 या दिवशी प्रकाशित केले.
हा तर असं आहे की आपलं बैठं काम आहे. एका जागेवर आठ आठ तास बसून कोड रन करणे , कंपनीचा जास्तीत जास्त फायदा करुन देणे, हे सर्व भारतात बसुन करत असल्याने एक्सपेन्सेस कमी करणे आणि त्या योगे मेक अमेरिका ग्रेट अगेन हाच आपला उद्देश ! हां तर हे असे सारे असल्यामुळे बसून बसून खुर्ची कितीही कम्फर्टेबल असली तरीही एवढा वेळ बसल्याने व्हायचं तेच होते आणि पाठ दुखायला लागते. हलकीशी पाठ दुखायला लागली आणि अचानक अमृतानुभव मधील श्लोक आठवला.
तैसें अनुभाव्य अनुभाविक । इहीं दोही अनुभूतिक । तें गेलिया कैचें एक । एकासिचि ॥ ५-६१॥
ओवी तशी कळायला अवघड आहे म्हणून नेहमीप्रमाणे आपल्या वै. ह.भ.प.

काहीतरी सलत असतं...

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 02/02/2023 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
काहीतरी सलत असतं आपणास मात्र कळत नसतं कुणाच्यातरी आठवणीने मन आतल्याआत जळत असतं होवून कधी बेभान झुलत असतो फुलासारखं आपण सुध्दा फुलत असतो कुठल्याश्या भासापाठी मन सारखं पळत असतं. असं कसं कुणावरही आपण प्रेम करुन बसतो पण त्याचं आपल्याकडे लक्ष नसतं अन् आपण आयुष्यावर रुसतो ती आपल्याला झिडकारते किंवा तो आपल्याला झिडकारतो कळत असून मन आपलं त्याच्याकडेच वळतं. दीपक पवार. https://youtu.be/vsStJxhSSDU
काव्यरस

वार्तालाप : (३) नमस्कार करण्याचे फायदे

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 02/02/2023 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
श्री सार्थ दासबोधात समर्थ म्हणतात: नमस्कारास वेचावें नलगे नमस्कारास कष्टावें नलगे नमस्कारास कांहींच नलगे उपकरण सामग्री. (४/६/२२) आपल्या देशात आज ही खेडे गावांत रस्त्यातून येता जाता अनोळखी माणसाला ही लोक स्मित करून ,राम-राम, जय रामजी की म्हणतात नमस्कार करतात. आपण ही आई, वडील, गुरुजन आणि वरिष्ठांना नमस्कार करतो. पण समर्थ म्हणतात लहान मोठे अनोळखी सर्वांनाच नमस्कार केल्याने आपले काहीच जात नाही. ज्या गोष्टीसाठी पै ही लागत नाही ती करण्यात कंजूषी कारायची गरज नाही.

अशीच एक धुंद, सोनेरी सायंकाळ - (आणि अंतिम वगैरे सत्य)

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 02/02/2023 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
अशाच एका धुंद, सोनेरी संध्याकाळी सहज फिरायला निघालो होतो सहज मंजे मुद्दामच … – मला स्वतःशीच मोठ्याने बोलण्याची खोड आहे – घरात उगाच तमाशा नको म्हणून बाहेर पडलो. नकळत पाय तळ्याकाठच्या शांत रस्त्यावर वळले – मनात तात्त्विक वगैरे विचार घोळत होते. कोs हं ? … मी कोण आहे ? मै कौन हूँ ? व्हू आयाम ? सोs हं ! … मी तो आहे. तो मी आहे. या साडेचार फुटी कुडीत अडकलेला - अविनाशी,अमर, स्वयंप्रकाशी आत्मा आहे मी निर्विकार चेतना आहे मी ब्रम्ह, मी सत्य, मी कैवल्य आहे मी कर्ता, मी भोक्ता, मी ज्ञाता आहे मी साक्षी, मी सर्वसाक्षी, मी निर्लिप्त- निखळ जाणीव आहे.

Thrills on Wheels

लेखक मालविका यांनी बुधवार, 01/02/2023 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
Thrills on Wheels (Thane - Statue of Unity - Thane) पूर्वतयारी डॉ अश्विनीला हॉस्पिटल मध्ये ८ दिवसांची सुट्टी मिळणार होती. वेगळं काहीतरी करायला हवं अस दोघींच्याही डोक्यात होत पण काय ते ठरत नव्हतं. सुट्टी तर नक्की झाली. श्रीनिवास ने नेहमीप्रमाणे दोघींनी बाईक टूर करा म्हणून आयडिया दिली आणि तेजानंदसह आम्हीही ती उचलून धरली. आता कुठे जायचं यावर एकमत होईना. चौघांचा व्हॉटस् अप ग्रुप करून चर्चा सुरू झाल्या. दोन दिवस सायकल चालवत जायचं, दोन दिवस विश्रांती घ्यायची आणि दोन दिवस सायकल चालवत परत यायचं असा ढोबळ आराखडा ठरला. टुरिंग असल्यामूळे BRM सारखं फास्ट जाणं, स्पीड मेन्टेन ठेवणं वगैरे नव्हतं.

सुचलेले विषय पण हुकलेले लेखन

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 01/02/2023 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
नियमित लेखनाचा छंद लागला की कालांतराने एक समस्या जाणवू लागते - लेखनासाठी नित्य नवे विषय सुचणे. आपल्या वाचन, मनन आणि निरीक्षणातून मनात अनेक ठिणग्या पडतात आणि त्यातून अनेक विषय मनात रुंजी घालतात. पण त्यातला लेखनासाठी कुठला विषय गांभीर्याने निवडावा यावर मनात बरेच दिवस द्वन्द्व होते. अशी संभ्रमावस्था बराच काळ चालते आणि मग अचानक एखादा विषय मनात विस्तारू लागतो. तो विषय आळसावर मात करून नेटाने पुढे रेटला तरच त्याचा लेख होतो. लेखकाच्या मनात घोळत असलेल्या अनेक विषयांपैकी किती विषयांचे लेखन पूर्ण होते हा एक उत्सुकतेचा विषय आहे.

आणि बाकी शून्य...

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 01/02/2023 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा फोन आला ना की, चेह-यावर molar to molar हसू उमटतं.. हातातलं काम तिथंच थांबवत मी तव्याखालचा विस्तव विझवते. केसांची बट मागे सारत स्वतःला उगा आरशात निरखते. मग फोन घेऊन मी कोलाहलापासून दूर बाल्कनीच्या कोप-यात जाते. आणि रिंग थांबायच्या जssस्ट आधी हॅलो म्हणते. सुरवातीची औपचारिक चौकशी आटपून तू पटकन कामाकडे वळतोस. माझं हसू तीन चतुर्थांश होतं.. ते बोलणं पण म्हणता म्हणता संपून जातं. आता हसू बरोब्बर निम्मं... मग तू म्हणतोस, "बाकी काय म्हणतेस?" आवडलेली कविता, नावडलेलं गाणं.. पाहिलेली वाट, तुझं न येणं.. दाटलेला हुंदका, तुला न कळणं... माझे वेडे हट्ट, तुझं शहाणं वागणं... बाकी किती नी काय काय असतं. पण फोन

महाराष्ट्र खगोल संमेलनाचा अविस्मरणीय अनुभव!

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 31/01/2023 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
✪ सेंटर फॉर सिटिझन सायन्सेस (CCS), विज्ञान भारती आणि राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र (NCRA) द्वारे आयोजन ✪ तीन दिवसीय संमेलनामध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांची व्याख्याने, सखोल चर्चा आणि संवाद ✪ जुन्या व नवीन पिढीतील खगोलप्रेमींचं एकत्रीकरण- Passing of baton ✪ आयोजक, संबंधित संस्था, व्हॉलंटीअर्सद्वारे उत्तम नियोजन आणि चोख व्यवस्था ✪ आजच्या खगोल विज्ञानात काय सुरू आहे ह्यांचे अपडेटस आणि मूलभूत संकल्पनांची उजळणी ✪ भारतातल्या संस्था व वैज्ञानिक किती मोठं योगदान देत आहेत ह्यावर प्रकाश ✪ अजस्त्र जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) ला भेट! ✪ GMRT येथील व्याख्याने, चर्चा सत्र आणि आकाश दर्शन ✪ व

आजीचे बोल--फार अनमोल!!

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 31/01/2023 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी!! माझी आजी(आईची आई) कोकणातील देवरुखजवळच्या एका खेड्यातली होती. तिच्या लहानपणीच तिची आई वारली आणि सगळ्या भावंडात आजी मोठी असल्याने लहान वयातच तिच्यावर स्वयंपाक करण्यापासुन, सगळी घरकामे ,भावंडांचे करणे वगैरे जबाबदारी आली. वडील शाळामास्तर होते, त्यांनी मुलांना चांगले शिकवले, पण मुलींना त्या मानाने कमी शिकवले, कदाचित तो काळच तसा होता(१९२०-३०). पुढे आजी लग्न झाल्यावर ठाण्याला रहायला आली, पण २ मुली झाल्यावर वयाच्या ३० व्या वर्षी तिचा नवरा जलोदराने गेला.( म्हणजे काय नक्की माहित नाही).

हिमाचल प्रदेश :कांगडा व चंबा सहल : भाग ६: पालमपूर ते डलहौसी प्रवास व पर्यटन स्थळे

लेखक गोरगावलेकर यांनी मंगळवार, 31/01/2023 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ५ येथे वाचा आज पालमपूरचे हॉटेल सोडून डलहौसीला मुक्कामी जायचे होते त्यामुळे सकाळी उठून बाहेर फेरफटका मारायचा विचार रद्द केला. आमच्या फॅमिली कॉटेजला आतूनच लाकडी जिना असलेली व छपराच्या तिरक्या भागात अजून एक खोली होती ज्यात ३-४ जणांची झोपण्याची व्यवस्था सहज होऊ शकेल.