Skip to main content

९९ वर्ष्यानंतर

लेखक आंद्रे वडापाव यांनी बुधवार, 17/05/2023 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या पोर्टफोलिओ मध्ये २ ऍसेट्स आहे. 'हिं', आणि 'मु' दोन्ही आजघडीला पोर्टफोलिओमधील प्रपोर्शन असे आहे. 'हिं' = ८५ रु आणि 'मु' = १५ रु. हे दोन्ही ऍसेट्स सरकारी आहेत, आणि यांचा वार्षिक वृद्धी दर CAGR सरकार मोजते. 'हिं' ह्याचा हि CAGR आजघडीला १.९% आहे. (सरकारी मोजमापानुसार) 'मु' ह्याचा हि CAGR आजघडीला २.४% आहे.

आम्हां काय त्याचे ??!

लेखक आजी यांनी मंगळवार, 16/05/2023 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
अकरा मे चा दिवस. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता. रिटायर्ड केंद्र सरकार कर्मचारी श्रीमती. राधाबाई, सकाळी अकरा वाजल्यापासून टीव्हीसमोर बसलेल्या होता. त्यांचं असं नेहमीच होतं. क्रिकेट मॅच (त्यात भारत खेळत असला पाहिजे हं मात्र! 'इतर' दोन देशातल्या मॅचमध्ये उनको इंटरेष्ट नहीं ।) हां ,तर क्रिकेट मॅच -अगदी बाॅल टु बाॅल-,निवडणुकींचे निकाल,(विधानसभा, लोकसभा, अगदी पंचायत समित्यांचे सुद्धा), कोर्टाचे निकाल, असं काही असेल तर राधाबाई पहाटे उठून, लवकर सर्व आटोपून, शुचिर्भूत होऊन,धूतवस्त्र नेसून,सुखासनात टीव्ही समोर बसत. नजर (नासिकाग्रावर नव्हे तर) टीव्हीवर खिळलेली असे!

पैस भेट

लेखक Bhakti यांनी सोमवार, 15/05/2023 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
काल जागतिक मातृदिन होता. “जो जे वांछील ,तो ते लाहो||प्राणिजात ||” असे समस्त विश्वासाठी पसायदान जिथे मागून साऱ्या विश्वाची ‘माऊली’ झालेल्या ज्ञानेश्वरांच्या पैस या खांबाला भेट दिली.उणापुरा तीन फुट कातळ खांब ,जरासा एकटाच!

एक चावट लेख!!

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 15/05/2023 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी पुण्यात गाडी म्हणजे "स्कुटर". पण ह्या लेखात गाडी म्हणजे "मोटारगाडी" असे वाचावे. तर सहसा प्रत्येक माणसाला गाडी घ्यायची आणि चालवायची हौस असतेच. ठराविक वय झाले की गाडीची गरज प्रकर्षाने भासू लागते. काही जण इतरांची गाडी चालवून आपली हौस भागवून घेतात. पण सगळ्यांचेच नशीब एव्हढे चांगले नसते. त्यांना वाट बघायला लागते. काहीजणांना तर फारच उशीर होतो तर काहीजण त्या फंदातच पडत नाहीत. काहीजणांना गाडीचा इतका वाईट अनुभव येतो की ते प्रतिज्ञा करतात की वेळ पडल्यास टॅक्सीवर काम भागवेन पण पुन्हा आयुष्यात गाडी घेणार नाही. तर मुद्द्यावर येउयात. गाडी घेण्याआधी पैशाची सोय करावी लागते.

ना कर नाटक !

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 13/05/2023 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
नफरत चा बाजारबंद, म्हणाला तो सोनियानंद, मोहबत की दुकाने खुली नाही चालला बजरंगबली अदानीची मोठी ताकद, तर गरीबांची छोटा कद, मोदी-शाह यांची जादू स्वस्त, फूकट्यांचा बांबू गरीबांना नको तो विकास गॅससिलींडरने केला नाश केरल स्टोरीचा ना असर भाजप तू विजय विसर

रौद्रगर्भा वसुंधरा भाग २ : आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग

लेखक शेखरमोघे यांनी शुक्रवार, 12/05/2023 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे संबंधित लिखाण रौद्रगर्भा वसुंधरा भाग 1 (मी १९८३ साली प्रथम जपानमध्ये ज्वालामुखी पाहिला. त्यानंतर इंडोनेशिया आणि न्यूझीलंड या अनेक ज्वालामुखी असलेल्या दोन्ही देशांतील बरेच तसेच अमेरिकेतील काही ज्वालामुखी -कांही कधीही उद्रेक पावतील असे वाटणारे, कांही नुसतेच धुमसणारे, काही सुप्त, काही मृत, काही तरुण, काही वृद्ध - पाहिले.

हा गणितसंबंधित प्रश्न क्रुपया सोड्वुन द्यावा

लेखक शानबा५१२ यांनी शुक्रवार, 12/05/2023 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
एक गणित संबंधित प्रश्न आहे जर एका प्रकारच्या पाच वस्तूंची किंमत १२५ रुपये आहे तर त्याच प्रकारच्या बारा वस्तूंची किंमत किती असेल? हे गणित आपण खालीलप्रमाणे सोडवतो, ५ = १२५. मग १२ =? म्हणून ? = १२५ X १२ भगिले ५ म्हणजे ३०० असे उत्तर येते. या अशाच प्रकारच्या गणितामध्ये मोडणारा एक प्रश्न होता. ही गणितीप्रक्रिया शेअर मार्केटशी संबंधित आहे. समजा मी २५ च्या संख्येमध्ये पहिले ३०० च्या भावाने कॉन्ट्रॅक्ट घेतले.

कोर्टाचे नरो वा कुंजरोवा (अर्थात डबल ढोलकी)

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 11/05/2023 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
खोकेबाज धोकेबाज । इतरा म्हणत गद्दार! स्वत: दिला पदभार। सोडोनिया ।। ठाकरेंनी जरी घातले, सर्वोच्च कोर्टा साकडे, पाऊल पडले वाकडे, भलतेची।। अननूभवी कुणी बनला । निवडणूकीस न उभारता। मालमत्ता अर्ज न भरता। मुख्यमंत्री।। शाह- नानाने मात दिली। भाज्यपाल जरी चूकले। महाविकासआघाडी झूकली। यामुळेचि।। आत्मविश्वास अभाव? अल्पमताची चाहूल? कि अल्पमतीची हूल। राजीनामा!! बंडखोरांची ती सहल। हाॅटेल डोंगर ती हिरवळ। 16अपात्र म्हणे झिरवळ। योग्य होते?! हेटाळले तुम्ही ज्यांना। अलीबाबा,चाळीस चोर। ठरले काळीज शिरजोर। शिंदेशाही।। आपण लाचारपणे। केला असंगासी संग। व सोडला भगवा रंग। खुर्चीसाठी।। नाव गेले,चिन्ह गेले। संपली र
काव्यरस

एक सहल: मणिपूर धुमसत नव्हते तेव्हा..

लेखक चलत मुसाफिर यांनी गुरुवार, 11/05/2023 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी 2022मध्ये ऐन थंडीच्या कडाक्यात आम्ही मणिपूर राज्याची एक छोटेखानी, चार दिवसीय, रोमांचक रस्ता सहल स्वतःच्या चतुष्चक्रीने केली होती. इंफाळ, लोकटाक व मोरे या ठिकाणी भेट दिली होती व इंफाळमध्ये एका उच्यमध्यमवर्गीय मैती कुटुंबाने चालवलेल्या airbnbमधे राहिलो होतो. मणिपूरमध्ये गेल्या आठवड्यात उफाळलेला कुकी- मैती संघर्ष हिंसेच्या अस्वस्थ करणाऱ्या बातम्या वाचून ती सहल पून्हा आठवली. या दुव्यावर इथे माझ्या ब्लॉगवर या सहलीचा प्रकाशचित्र वृत्तांत आहे. इंग्रजीत असला तरी समजण्यास कठीण जाऊ नये.