Skip to main content

एका अवलियाची भेट

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 23/03/2018 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. २१ मार्च रोजी एका अतिशय विलक्षण कार्यक्रमाला जाण्याचा प्रसंग आला. गांधीजींचा संदेश देण्यासाठी सायकलीवर १३ देश फिरून आलेले वर्ध्याचे ज्ञानेश्वर येवतकर ह्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम आकुर्डी येथील सायकल मित्र अभिजीत कुपटे ह्यांच्या 'सायकल रिपब्लिक' येथे झाला. ज्ञानेश्वर ह्यांचे अनुभव ऐकणं हा अतिशय रोमांचक अनुभव होता. म्यानमार, थायलंड, लाओस, इंडोनेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान, दक्षिण कोरीया, चीन, जपान अशा तेरा देशांमधले त्यांचे अनुभव थक्क करणारे होते.

...... कशाला ?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 23/03/2018 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हापुन्हा मी क्षणोक्षणी सावरू कशाला उगाच ऐना बघून मी मोहरू कशाला पुन्हा नभावर जरा दिसावी उनाड स्वप्ने तुझे पसारे घडोघडी आवरू कशाला तिला जरासा हवा अबोला रुसावयाला जुनीच आहे सवय तिची बावरू कशाला असे कसे बोलणे सखीचे मला कळेना जरी तिचे वागणे दुटप्पी स्मरू कशाला अजून सुद्धा तिच्याविना मी जगेन म्हणतो जुनीच स्वप्ने पुन्हा अता वापरू कशाला मरण मनोहर प्रिये तुझ्यासह असेल नक्की तुझ्याविनाही जगेन मी घाबरू कशाला जगावयाला हवे कशाला नवे बहाणे सुखे तुझ्या सोबतीतली ठोकरू कशाला वृत्त : सती जलौघवेगा लगालगागा लगालगागा लगालगागा © विशाल कुलकर्णी
काव्यरस

Dear Camera

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 23/03/2018 06:21 या दिवशी प्रकाशित केले.
Dear Camera, देवाने आम्हाला दोन डोळे दिले, पण त्यात एकच लेन्स बसवली. तू आलास, आणि मला तिसरी, चौथी, पाचवी.... कितवी तरी लेन्स मिळाली. जग तुला तिसरा डोळा म्हणते. मी म्हणत नाही. कारण तिसरा डोळा उघडला कि हाहाकार माजतो. मी तुला अंतर्चक्षु म्हणते. आतले डोळे. तू आलास, आणि मी एकटी चालायला शिकले. दूरदूर. चालण्याचा परीघ विस्तारला कि थांबण्याचा केंद्रबिंदू समृद्ध होतो. तुझी सोबत असली, कि नेहमीचे रस्ते नकोसे वाटतात. आडवळण अपोआप प्रिय होते. घरापासून चालत दूर गेले , मनाच्या जवळ बसता येते. मनाच्या जवळ बसले, कि तुझ्याबरोबर खेळणे चालू होते. आजूबाजूचा प्रचंड विस्तार, सुबक होतो.

हरिश्चंद्र गड -फोटो

लेखक शशिकान्त पवार यांनी गुरुवार, 22/03/2018 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो माझं नाव शशिकांत पवार, मी हरिश्चंद्र गड येथे काढलेले फोटो Dec 2013 मध्ये काढलेले. https://lh5.googleusercontent.com/-1r4CIwY6Jt0/Uz-PujCm0AI/AAAAAAAAAPU/DXTvvZtTpOU/w591-h443-no/IMG_1678.JPG https://lh6.googleusercontent.com/-DzfDB5ya_K8/Uz-Pi5EKhkI/AAAAAAAAAPE/vsW71AQ_iXw/w591-h443-no/IMG_1665.JPG

(बार हो)

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 22/03/2018 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : यारहो ... दादाश्रींची विनम्र माफी मागुन ..... अर्ज़ किया है .... ह्या उन्हाचा जोर आहे वाढलेला यारहो शोधुया नजदीक साधा एक बियर बार हो ड्रॉट ज्या त्या ब्रॅन्ड्ची तिथलीच बॉटल चांगली पण अता चालेल काही फक्त असु दे गार हो मागवा चकली चना अन हाफ चीकन तंदुरी कावळ्यांना भूक आहे लागलेली फार हो ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले दावले "जमवून" मग "ठरवून" वारंवार हो एकदा केसांस वेडे मोकळे सोडून बघ नेत्रसुख असती गडे हे झाकले उभार* हो कोण तो चु$@ भिकारी पेग अर्धा सांडतो वाटते होईल ह्याचा आज युनुस वकार हो माँक कुठला? कोण मल्ल्या?

पश्चिम खांदेशातील गिरीदुर्ग

लेखक नमिता श्रीकांत दामले यांनी बुधवार, 21/03/2018 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
         प. खांदेशातील गिरीदुर्ग १. आमच्या ट्रेकमधील एक विलोभनीय सूर्यास्त डिसेंबर महिना म्हणजे भटक्यांसाठी पर्वणीच! नाताळच्या सुट्टीला जोडून नवीन काही किल्ले फिरायचे आणि थंडीचे सोने करायचे असा विचार होताच. प. खांदेश म्हणजेच धुळे; धुळ्याचे प्राचीन नाव रसिका.

COPYRIGHTS बद्दल माहिती हवीये.

लेखक किरण नाथ यांनी बुधवार, 21/03/2018 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
जर आपल्याला कोणत्याही पुस्तकाचा अनुवाद करायचा असेल किंवा एखादा video अनुवादित करायचा असेल तर त्याचे COPYRIGHTS कोणाकडे आहेत हे कसे शोधावे व त्याचा अनुवाद करण्याची परवानगी कशी घ्यावी, तसेच एखाद्या पुस्तकावरून किंवा कथेवरून जर videos बनवायचे असेल तर काय काय कायदेशीर बाबी बघाव्यात व त्याचे हक्क कसे घ्यावेत या बद्दल कृपया माहिती द्यावी.

दोसतार...२

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 21/03/2018 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://www.misalpav.com/node/42264
आम्ही ओणवे होऊन अंगठे धरले होते तरी ही हसत होतो. हसत हसता धन्या जाधवचा तोल गेला तो पडला. भामरे मास्तर आणखीनच भडकले. ते काही बोलणार इतक्यात छोटी सुट्टी झाल्याची घंटा झाली. आम्ही सगळे मास्तरना तेथेच सोडून वरच्या ग्राउंडवर पसार झालो. पुढच्या प्रसंगातून आम्हीही सुटलो आणि भामरे मास्तरही सुटले.
पण घडल्या प्रसंगामुळे टंप्या खूपच बिथरला होता. तो म्हणाला की मी आता जे करायचे ते करुनच दाखवतो.

पावनखिंड लढा

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 20/03/2018 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
काही काळापुर्वी पावनखिंडीतला भेट देण्यासाठी गेलो असता तेथे झालेल्या लढ्याच्या आठवणी जाग्या झाल्या. काही माहिती होती, काही नव्याने लक्षात आली. वाटले मिसळपावर बर्‍याच कालावधीनंतर धागा टाकावा. या लढ्यातील ऐतिहासिक बाजू, भौगोलिक परिस्थिती, तात्कालिक राजकारणातील डावपेच यावर अभ्यासू मिपाकरांच्या लेखनातून काही नवे समजून घ्यायला मिळेल… काही विचारणा… १. विशाळगडाला महाराजांनी आधी जिंकले होते का? १३ जुलै १६६० रोजी महाराजांच्या बाजूने कोण गडकरी होते? तिथे किती सैन्य असावे? २. विशाळगडाला सध्या काय रंग रूप आहे? तिथे कोणाचे स्मारक उभे आहे? ३.

दोसतार...

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 20/03/2018 06:44 या दिवशी प्रकाशित केले.
एल्प्या , टंप्या आणि मी हे त्रिकुट आख्ख्या शाळेत एकदम फेमस होतं. फेमस म्हण्जे काय लैच फेमस. सगळे मास्तर आणि बाया आमाला वळखायच्या. कायबी असू दे , कुटं जायचं असू दे की मग कुठलं काम असू दे आमी कायम बरोबर . बाकावर बसायला एकत्र ,मधली सुट्टी सोबत, छोटी सुट्टी सोबत ,खेळायला सोबत डबा खायला सोबत . इतकंच काय तर दोन तासाच्या मधे कधी आमच्या पैकी कुणाला लघ्वीला जायचे असेल तर लागली नसली तरीबी बाकीचे दोघे सोबतच जायचो. शाळेत येताना जाताना प्रत्येकाच्या घराची वाट वेगळी होती म्हणून बरं नायतर घरी जाताना बी एकत्रच गेलो असतो. खरंतर टंप्या आणि यल्प्या हे अगोदरपासूनच बरोबर.