Skip to main content

ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर-१ 

लेखक शाली यांनी शुक्रवार, 04/05/2018 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
काही मित्रच असे असतात की ते कधीही भेटले तरी मन कसं प्रसन्न होवून जातं. पण माझ्या या मित्राची जातकुळी जरा वेगळी. मनःस्थिती चांगली असताना भेटला तर वेळ मजेत जातो पण एऱ्हवी मात्र याला पाहीले की ‘कुठून ही ब्याद आली’ असे होते. कारण हा वृत्तीने प्रचंड नास्तीक. नास्तीक असल्याने नास्तीकांचे ‘स्वयंघोषीत अधिकार’ याला प्राप्त. त्यामुळे हा सदैव हातात एक अदृष्य तलवार घेऊन हिंडत असतो. म्हणजे कुणाला चतुर्थीचा ऊपवास असला की याचा लगेच वार. कुणी सोमवारी पिंडीवर अभिषेक केला की याचा लगेच हल्ला. असेन का नास्तीक. काय लक्ष द्यायचे. असंही म्हणता येत नाही. कारण या प्राण्याचा व्यासंग मोठा दांडगा.

संघ भाजपाने याचा विस्तार करावा

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 04/05/2018 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
कदाचित राजकीय दबावातून असेल किंवा सरसंघचालकांची जेनुआईन इच्छा असेल, गेल्या दोन एक वर्षातील सरसंघचालकांची भाष्ये दलितांसोबत सामाजिक सौहार्द वाढवण्याच्या दृष्टीने संकेत देत होती, पण जमिनीवर काही विशेष घडल्याचे जाणवत नव्हते - कारण सरसंघचालकांची किती इच्छा असेल त्यांचा कार्यसर्त्यांनी ते मनोमन स्विकारण्याचे आव्हान अगदीच लहान नाही. आता उत्तरप्रदेशात दलितांसोबत राजकीय पुढार्‍यांची समरसता भोजनांची रेलचेल चालु दिसते. राजकीय पुढार्‍यांचे वागणे हवेत विरु शकते , पण कथित संत मंडळींचा या कार्यक्रमात समावेश करुन घेण्याचा प्रयत्नाची सकारात्मक दखल घेण्यास हरकत नसावी .

अ लेडी विथ द कॅमेरा…

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शुक्रवार, 04/05/2018 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
२०११ च्या काळात इजिप्त धुमसत होता. मुस्लीम ब्रदरहूड आणि जनता यांच्यातला वाद शिगेला पोचला होता. तेहरीर चौक या सगळ्या घडामोडींचं केंद्र बनलं होतं. रोज हजारो माणसं तिथं येत-जमत, निदर्शनं करीत असतं. तेव्हा ’एक २०-२२ वर्षांची मुलगी आपल्या कॅमेरानं हे सगळं टिपत असे. आजूबाजुची परिस्थिती, अंधाधुंद माजलेली अराजकता, वारंवार निघणारे मोर्चे-निदर्शनं, त्यांच्यावरची दडपशाही, लष्कराचं डोळ्यात भरणारं अस्तित्व, जनतेतला रोष असं बरचं काहीसं तिनं आपल्या कॅमे-यात कैद केलं होतं.

झॅन्स स्कांस आणि डच पवनचक्क्या!

लेखक देतनूशंसाई यांनी शुक्रवार, 04/05/2018 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आजोबा, श्रीपूर ला साखर कारखान्याच्या लॅब मध्ये काम करायचे. कुठल्याश्या मशीन मधून उसाचा रस बाहेर पडून एका मोठ्या विहिरीमध्ये साठायचा आणि आजोबा आणि त्यांचे मित्र, ह्या विहिरींमधून पाहिजे तेवढा उसाचा रस पिऊ शकायचे, हे त्यांनी सांगितलं तेव्हा उसाच्या रसाची विहीर आणि त्या विहिरीमध्ये रस ओतणारं अजस्त्र असं मशीन कसं असेल ह्याची मी कल्पना करत बसायचो. कधी कधी कारखान्यांमधल्या यंत्र सामग्रीबद्दल त्यांनी सांगितलेलं मला पुसटसं आठवतं, पण ते सांगताना त्या यंत्राबद्दल किंवा यंत्रामागच्या तंत्रज्ञाना बद्दल त्यांना असलेला निस्सीम आदर स्पष्ट आठवतो.

उन्हाळी भटकंती: कोयनानगरजवळचा भैरवगड ( Bhairavagad near Koyananagar )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 04/05/2018 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा भौगोलिक विचार केला तर सपाट असणारा देश आणि समुद्रसपाटीला असणारे कोकण यांच्या मधोमध एखाद्या द्वारपालासारखा सह्याद्री खडा आहे. उंच सुळके, बेलाग शिखरे, अडचणीच्या खिंडी, नाळेच्या वाटा आणि जणु बोट धरुन उतरायला लावणारे घाट वाटा इथे आहेत. यावर नजर ठेवायला सह्याद्रीच्या मुख्य रांगेत अनेक गड, किल्ले फार प्राचीन काळापासून उभारले आहेत. अश्यापैकी एक गर्द जंगलाने वेढलेला वनदुर्ग म्हणजे कोयनेजवळचा "भैरवगड". महाराष्ट्रात चार भैरवगड आहेत, त्यापैकी कोयनेच्या म्हणजेच सध्याच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात , सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडा पुढे कोकणात झुकलेला हा गड तसा दुर्लक्षित आहे.

अंतर्मुख!

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 04/05/2018 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
अंधेरी स्टेशनच्या तीन नंबर फलाटावर तीस सेकंद थांबून गाडी पुढे सरकली, आणि दरवाजाशी उभ्या असलेल्या त्या दोघांच्या नजरा सरसावल्या. पलीकडच्या, चार नंबर फलाटावरचं काहीतरी शोधू लागल्या. गाडी जोगेश्वरीच्या दिशेने निघाली. समोरचा फलाट संपला आणि दोघांचे डोळे चमकले. त्यांनी एकमेकांकडे पाहून खुशी व्यक्त केली. म्हणून माझेही लक्ष त्या फलाटाकडे, त्या जागेवर खिळले. फलाटावर टोकाला असलेल्या एका बांधकामाच्या भिंतीवर एक चित्र होते... अगदी साधे. बंदूक हातात धरलेल्या युद्धसज्ज जवानाचे! त्यावर एक वाक्य होते- ‘एक जिम्मेवार नागरिक बनो ताकि हम आपके लिये गर्वसे लड सकें!’ ...

"वरपेडा घाट आणि चांदमोड नाळ"

लेखक दिलीप वाटवे यांनी शुक्रवार, 04/05/2018 00:47 या दिवशी प्रकाशित केले.

"वरपेडा घाट आणि चांदमोड नाळ"

वरंध घाट परीसरातल्या दोन अपरिचित घाटवाटा

खरंतर १ मे ची सुट्टी अशीच वाया जाऊ द्यायची नव्हती. ट्रेकींग ग्रूपवर हाक दिली आणि लगेचच नेहमीच्या मंडळीतले चार जण यायला तयार झाले. सगळे नेहमीचेच असल्याने वेगळं काही सांगायची गरजच नव्हती. काय करायचं तर घाटवाटाच. कारण आता 'ट्रेक म्हणजे घाटवाटा' हे आम्हा सर्वांचं समीकरणच होऊन गेलंय. ट्रेकला जायचं म्हणजे घाटवाटांशिवाय दुसरं काही सुचतच नाही. आता घाटवाटा ठीक आहेत हो! पण कोणत्या करायच्या?

लाल करा ओ माझी लाल करा

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 03/05/2018 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
लाल करा ओ , माझी लाल करा येता जाता लाल करा पुसा मला तुम्ही येता जाता पुसूनि पुरते हाल करा , लाल करा ओ लाल करा येता जाता लाल करा भजा मज तुम्ही भाई दादा तुमचाच राहीन , हा पक्का वादा गॉड बोलुनी बेहाल करा लाल करा ओ माझी लाल करा येता जाता लाल करा समजू नका मज ऐरागैरा नीट बघून घ्या माझा चेहरा या गोंडस, लोभस मित्रासाठी प्रेमाची पखाल करा लाल करा ओ माझी लाल करा येता जाता लाल करा नका कटू कधी बोलत जाऊ बनेन मग मी शंभू न शाहू च्छाताड पुढे , मग फुगतील बाहू कशाला स्वतःला हलाल करा लाल करा थोडी लाल करा ओ येता जाता लाल करा क्रोध द्वेष जरा लांब राहू दे प्रतिसादान

तू मने गमे छे !

लेखक भन्नाट भास्कर यांनी गुरुवार, 03/05/2018 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणजे तिला मी पहिल्यांदा पाहिलेले तेव्हाच आतून काहीतरी हललेले. पण सांगतोय कोणाला. सारेच हसले असते. मी अगदीच पोरसवदा भासत होतो तिच्यासमोर. ती अगदीच गोलमटोल नव्हती, पण पुरेशी धष्टपुष्ट होती. अगदीच गोरी नसली, तरी गव्हाळ उजळ कांतीची होती. अगदीच मराठी नाही, पण मराठी बोलता येणारी होती. आयुष्यात पहिल्यांदा मी एका गुजराती मुलीच्या प्रेमात पडलो होतो, अगदी पहिल्याच नजरेत पडलो होतो. तिलाही माझ्यात नक्कीच काहीतरी आवडले होते, ते ही पहिल्याच नजरेत. तिची नजरच तसे सांगत होती. पण माझा तो पहिल्या जॉबचा पहिलाच दिवस होता. आणि ती तिथे आधीच सरावलेली खेळाडू होती.