Skip to main content

मा. ल. क.-१

लेखक शाली यांनी सोमवार, 21/05/2018 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
एका छोट्याशा गावात एक अत्यंत गरीब ब्राम्हण मुलगा रहात होता. आई-वडील लहानपणीच वारलेले. नातेवाईकांनीही त्याला दुर लोटलेले. जवळ एकही पै नाही. वडीलांचा भिक्षूकी आणि पौरोहित्य हाच व्यवसाय असल्याने शेती-वाडी काही नाही. गावातच एका बाजुला वडीलोपार्जीत घर. तेही पडलेले. एक भिंत कशिबशी ऊभी होती. त्या भिंतीच्या आधारानेच हा मुलगा कसा तरी दिवस काढत होता. पुढे शिक्षण घ्यायची फार ईच्छा असल्याने माधुकरी मागुन आणि वार लावून शिक्षण घेत होता. गावातील अनेकांनी सांगुन पाहीले की “बाबारे, दिवस आता बदलत आहे.

बघ ओततो कसा? "शॉट"ने घेत माप... सख्या ऑन द रॉक्स, आज ओत ओल्डमंक !

लेखक चामुंडराय यांनी सोमवार, 21/05/2018 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना : अर्थातच गायछाप बघ ओततो कसा? "शॉट"ने घेत माप... सख्या ऑन द रॉक्स, आज ओत ओल्डमंक ! सात वर्ष हि जुनी, मोहन मिकीनची रमा... हळूच ओत ग्लासात, एक शॉट ओल्डमंक ! नकोच व्हिस्की वा ब्रँडी, नसे कोणी या सम... उद्या पिऊ विलायती, आज ओत ओल्डमंक ! मंद व्हॅनिला हा गंध, "रम"तो सवे तुझ्या प्रिये... मम ओठी पहा कशी, मज प्रियरमा ओल्डमंक ! लार्ज पेग हा पतियाळा, कॉकटेल वा नीट... हलकीशी किक सुखद, सख्या ओत ओल्डमंक ! तन मन रोमांचित, पिसा समान वाटते... हळूच घे घोट घोट, एज्ड डार्क ओल्डमंक ! जय हो बुड्ढे बाबाकी, आम्ही तयाचे बंदे... गजर चिअर्स उंचावुनी, प्राशितो सखी ओल्डमंक !
काव्यरस

आख्यायिका

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी रविवार, 20/05/2018 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
भारत हा आख्यायिकांचा देश आहे. इथे हरघडी, हरवक्त, हरयुगी नवनवीन आख्यायिका जन्माला आल्या. ** आख्यायिका सर्रियल भासतात. लाईफलाईक असतात. 'हे खरं आहे' असं वाटता वाटता एकदम भानावर येऊन लक्षात येतं अरे ही तर आख्यायिका आहे. पण आख्यायिका आभासी मात्र नसतात. किंबहुना त्या वास्तवाची जुळी प्रतिमा असतात. वास्तवाचं प्रतिबिंब असतात. त्यामुळे, आख्यायिका अमर आहेत. कारण वास्तव अमर आहे, अचल आहे. ** भक्तीमार्गात नवविधा भक्ती सांगितल्या आहेत. श्रवण, किर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, पादसंवाहन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन असे ते भक्तीचे प्रकार. सांगणारे सांगून गेले.

दूर देशी गेला बाबा....विडंबन

लेखक OBAMA80 यांनी रविवार, 20/05/2018 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय सलीलजी कुलकर्णी व संदीपजी खरे यांची माफी मागून, माझ्या एका अत्यंत आवडीच्या त्यांच्याच गाण्यावर माझे विडंबन सादर करत आहे. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- गीतकार : संदीप खरे, गायक : सलील कुळकर्णी दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई नीज दाटली डोळ्यांत परी घरी कुणी नाही कसा चिमणासा जीव, कसाबसा रमवला चार भिंतीत धावून दिसभरं दमवला आता पुरे, झोप सोन्या कुणी म्हणतच नाही नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी कोणी बोलायाला ना

अन्नदाता सुखी भव भाग ९ : आहे का सुंदर हा चॉकलेटचा बंगला?

लेखक शेखरमोघे यांनी रविवार, 20/05/2018 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे "अन्नदाता सुखी भव" चे भाग भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 भाग ६: http://www.misalpav.com/node/33829 आणि

बेबी डोल मै सोने दी

लेखक जेडी यांनी शनिवार, 19/05/2018 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
काल "एबीपी माझा"वर एक बातमी पाहिली. त्यात सुरुची त्रिवेदी या मुलीने एका गतीमंद मुलाशी लग्न केले आणि त्यांचा संसार कसा सुखाचा आहे वैगेरे दाखवत होते. त्यांना एक मुलगी देखील आहे वैगेरे दाखवत होते. त्या बातमीला “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, दिस येतील दिस जातील”, हे गाणे पार्श्वसंगीत म्हणुन वापरले होते. त्यात त्या मुलीच्या सासू सासऱ्यांची, गतीमंद नवऱ्याची मुलाखत दाखवली , तो माणूस फक्त ती खूप प्रेम करते एवढेच बोलू शकला पण बाकी ती कशी खुश आहे, कुटुंब कसे सावरलेय वैगेरे वर भाष्य चालले होते. घरातल्यांचा तिच्या कौतुकाचा पाढा चालू झाला, प्रेम असे असावे वैगेरे.

स्वैपाकघरातून पत्रे १

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 19/05/2018 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
अन्नपूर्णा, (तुझी सासू असती, तर तिला प्रिय म्हणाले असते... असो.) आज म्हटलं तुला लिहावंच. अगं, जी कामं मी एकटी करायची, ती करण्यासाठी तू हा केवढा महागाचा सुऱ्यांचा सेट घेऊन आलीस! छोटी, मध्यम, मोठी. एक हे कापायला, एक ते चिरायला, एक बारीक बारीक तुकडे करायला! कम्माल आहे बाई तुम्हा आत्ताच्या बायांची! आमच्या जमान्यात अस्सं नव्हतं हो! एकदा का तुझ्या सासूने मला एका मांडीखाली घेतलं कि सगळं सगळं चिरून व्हायचं! खोबरं खोवून, मिरची बारीक चिरून, कांदा तर पाहिजे तसल्या आकारात, मऊ टोमाटो, वाळलेल्या खोबऱ्याचे अवघड तुकडे, झालंच तर गूळसुद्धा चिरून व्हायचा पुरणासाठी!

(सख्या चुन्यासवेच, आज मळ गायछाप!)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 18/05/2018 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा बघ मळतो कसा? चिमटीने घेत माप... सख्या चुन्यासवेच, आज मळ गायछाप! अजूनही न पाहिली, गोळी ती हातातली हळूच ठेवतो गालात, एक चिमुट गायछाप ! केशरी चुन्या वरुन, हात एक फेरला उद्या खाउ विलायती, आज मळ गायछाप ! शशीसम दंत तुझे, राहती कसे प्रिये?, मम वदनी पहा कशी, काळीभोर गायछाप ! कुरकुरीत चुर्‍यावरी, पिठूर चूर्ण पांघरु... उधाणला मस्तकात, तो जहाल गायछाप! तनू-मन झणाणता, पिसा समान वाटते हळूच वेच कण कण, मौल्यवान गायछाप ! पहाट उगवताच हात, शोधती पुडी तुझी कळ ही बसे रुसून, संपताच गायछाप ! पैजारबुवा,

सखे..फुलांसवेच आज माळ चांदवा!

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 18/05/2018 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
बघूच धावतो कसा? खट्याळ चांदवा... सखे..फुलांसवेच आज माळ चांदवा! अजून पाहिली न मी भरात पौर्णिमा उगाच दावतो मला घड्याळ चांदवा!

उन्हाळी भटकंती: मधू-मकरंद गड ( Madhu Makarandgad )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 18/05/2018 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
पर्यटकांमधे प्रचंड लोकप्रिय असलेल्या महाबळेश्वरला प्रत्येक पाँईटवर दिवसभर हि गर्दी असते, मात्र संध्याकाळ होईल तशी या गर्दीची पावले वळतात, "मुंबई पॉंईट" किंवा आधीचा "बॉम्बे पॉईंट" कडे, अर्थातच सुर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी. महाबळेश्वरच्या पश्चिम टोकावर असलेल्या या पॉईंटवर उभारल्यास उजव्या हाताला शिवभारताची साक्ष देणारा प्रतापगड खुणावत असतो. मात्र बहुतेक वेळा सुर्य बुडतो, तो एका खोगीराच्या आकाराच्या डोंगरामागे. सुर्यास्ताचे फोटो तर काढले जातात, पण हा सुर्यास्त ज्या डोंगराच्या मागे होतो आहे तो एक प्राचीन गड आहे, हे कोणाच्या गावीही नसते. या गडाचे नाव मोठे गोड आहे, "मधु-मकरंदगड".