Skip to main content

ये पावसा ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी रविवार, 27/05/2018 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
त्या वाहत्या झऱ्याचा, फेसाळल्या नभाचा श्वासास गंध यावा गंधाळल्या दिठीचा तू भेटशी नव्याने मी ही नवाच आहे नात्यास रंग यावा वेडावल्या जुईचा तू चुंबशील का रे वाऱ्यास धुंद ओल्या वर्षेस मोह व्हावा भेगाळल्या धरेचा तो शुष्क कोरडासा ओढा तसाच आहे त्याला विसर पडावा फेटाळल्या नदीचा ओला वसंत म्हणजे आमंत्रणे सुखांची आनंद मग पहावा मंदावल्या उन्हांचा मग तृप्त अंबराला हळवे उधाण यावे जलदास स्पर्श व्हावा धुन्दावल्या भुमीचा © विशाल कुलकर्णी
काव्यरस

सूर्योदय

लेखक विशाल कुलकर्णी यांनी रविवार, 27/05/2018 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
कुणा रातीला पडले कोड़े कुठून येतसे सखी चांदणी शीतल कोमल तरुही सजले अंधार उजळण्या हो आतुर गळामिठी मग समीराचीही स्पर्शु पाहातो गात्रो-गात्री दुरात कुठे चाहूल उषेची शोधत चंद्र येई क्षितिजावर कलकल कलरव पक्षी बोलती लक्ष धुमारे फुटले पूर्वेला दशदिशाही करतील पुकारे हलकेच रवी येई समेवर पानोपानी, मृदु गवतावर थेंब दंवाचा तोल सावरी अनवट अनघड पाऊलवाटा नाजुक पाउले, घट डोईवर हळुवार उजळे पुर्वा नभभर आरक्त लाली क्षितीजावर आसमंताला उजळीत येईल घट तेजाचे घेवून दिनकर © विशाल कुलकर्णी
काव्यरस

नेदरलँड्सची सफर - १.

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 26/05/2018 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
नेदरलँड्सची सफर - १ या सफरीचे वर्णन इतर भटकंती सारखे नसून सामान्य माणसाला, जो कधीही भारताच्या बाहेर गेलेला नाही त्याला उपयोगी पडावी या हेतूने लिहिलेले आहे. शिवाय केवळ प्रेक्षणीय स्थळे कोणती आणि काय आहेत एवढे न करता त्या देशातील नागरिकांचे जीवन कसे आहे याचा एक शोध घेण्याचा प्रयत्न आहे. युरोपातील प्रेक्षणीय स्थळे आणि निसर्गसौंदर्य यावर अनेक लेखकांनी उत्तमोत्तम लेख लिहिलेले आहेत/ असतील. मी असे कोणतेही वर्णन न करता फक्त घेतलेल्या फोटोद्वारे हे निसर्गसौंदर्य आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

काय हाही भास आहे ?

लेखक नाहिद नालबंद यांनी शनिवार, 26/05/2018 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
मस्त हा मधुमास आहे! काय हाही भास आहे ? पँन अन आधार जोडा काय कटकट त्रास आहे छान! सुंदर! लोक म्हणती मत तुझे मज खास आहे धीर थोडा धर जरा तू अंत आरंभास आहे लालसा, अविचार, फितुरी आपुला इतिहास आहे चांगली असतेच कविता पण गझल फर्मास आहे एकदा मिळतो म्हणे, पण जन्म मनुचा त्रास आहे
काव्यरस

माझे नेहरवायण १

लेखक माहितगार यांनी शनिवार, 26/05/2018 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
* लेखाची लांबी अधिक असल्याने, ठळक मुद्द्यांच्या द्रूत वाचनासाठी अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात प्रतिसाद देण्यापुर्वी पूर्ण लेख वाचणे अभिप्रेत असावे. __/\__ विविध कारणांनी विविध ठिकाणी आस्था असतात , तशी अगदी शालेय वयात असताना वाचलेल्या नेहरू लिखित डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथा बद्दल आस्था आहे. तसे नेहरू लिखित दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया अद्यापही कॉपीराईटेड असावे पण कुठूनसे बऱ्याच वर्षांनंतर डिस्कव्हरी ऑफ इंडियाची पीडीएफ हाती आली.

आप (Discussion on characteristics, properties and classification of liquids)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी शनिवार, 26/05/2018 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रशस्तपादभाष्याच्या ४थ्या धड्यातील आप किंवा द्रवरूप पदार्थांच गुणधर्म, प्रकार, वागण्याच्या तऱ्हा व उपयोग या संबंधीची माहिती या धड‌यात आहे. हे श्लोक ३ऱ्या - ४थ्या शतकातले असून तेव्हाची भारतीयांमध्ये वापरात असलेली जल किंवा आपद्रव्यांच्या अभ्यासाची पद्धत दर्शवतात. काही गोष्टी किंवा संकल्पना पटणारही नाहीत पण त्यासाठी पूर्णच अभ्यासाची पद्धत नाकारू नये. जे जे प्रत्ययास येईल तेवढेच मानावे.

रसायनांचा पूर आणि हॉर्मोन्सचा बिघडलेला सूर

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 25/05/2018 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या युगात विविध रसायने ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेली आहेत. त्यातील काही नैसर्गिक आहेत तर काही मानवनिर्मित. आज माणसाने विविध कारणांसाठी बनवलेल्या रसायनांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे! ती बनवण्यामागे विविध उद्देश होते खरे पण, त्यांच्या बेलगाम वापरामुळे तीच आता आपल्यावर बूमरॅंग झाली आहेत. त्याचे अनेक दुष्परिणाम आपण सध्या भोगत आहोत.

तिथे ओठंगून उभी...

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 25/05/2018 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
रानपाखरांची घरे अंगीखांदी जे माळते असे झाड फुलताना पान पान किल्बिलते क्षितीजाशी विझताना चांदणे जे उसासते त्याचे पहाटे पहाटे जीवघेणे गीत होते रानावनातून नदी जेव्हा खळाळत जाते ऐलपैलतीरी तिचे पाण-पैंजण वाजते फुफाटल्या मातीवर मृग शिंपण घालते तेव्हा अत्तराची कुपी आसमंती ओसंडते नाद-शब्द-ताल-गंध जिथे काळजा भिडते तिथे ओठंगून उभी.. ...एक कविता असते
काव्यरस

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 25/05/2018 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
२: परभणी- जिंतूर- नेमगिरी एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना ११ मे ला पहाटे साडेपाचला परभणीतून निघालो. अनेक जण निरोप देण्यासाठी आले, त्यामुळे उत्साह आणखी वाढला. अनेक जणांनी मॅसेजवरही शुभेच्छा दिल्या. काही अंतरापर्यंत माझे प्रिय सायकल मित्र आणि माझे रनिंगचे गुरू बनसकर सरसुद्धा सोबत आले. मी चालवतोय ती एटलस सायकल त्यांचीच तर आहे! पाय दुखत असूनही ते काही अंतर सोबतीला आले. थोडा वेळ त्यांची सोबत मिळाली व मग पुढे निघालो. योग प्रसार हेतु सायकलिंगच्या ग्रूपवर माझं लाईव्ह लोकेशन टाकलं आहे.