Skip to main content

मंदसा पाऊस झाला

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 31/07/2018 07:14 या दिवशी प्रकाशित केले.
. झोंबू लागे सुखद गारवा, मंदसा पाऊस झाला जाऊ या लोणावळ्याला, सखीस इशारा केला . मारली दांडी ऑफिसला, अन तिने हि कॉलेजला ठरे भेटायचे ,सकाळीच, जिमखान्याच्या स्टॉपला . लो वेस्ट जिन वर, स्लीव्हलेस टॉप शोभत होता तिच्या मधाळ स्मिताने ,मुड रोम्यान्टीक होता . नेली फटफटी पंपावर, म्हटले कर टाकी फुल्ल सुटे गाडी भन्नाट,बुंगाट .असे वातावरण कूल . चाले रस्ता ,धावे रस्ता, झाडे मागे पडू लागली टेकले उरोज पाठीला, मिठी तारुण्याची घातली. . लय भारी, क्षण भारी, रक्त तारुण्याचे सळसळे. पुणेमुंबई रस्ता आहे , थांबव हे खट्याळ

भारांच्या जगात... १

लेखक अजिंक्य विश्वास यांनी मंगळवार, 31/07/2018 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्यावर स्वारी? - भा रा भागवत. . माझा प्रिय मित्र सागर ह्याने माझ्या डोक्यात काही वर्षांपूर्वी भागवतांच्या संक्षेपाचे मूळ रूप शोधायचे खूळ डोक्यात घातले, त्याबद्दल त्याचे मानावे तेवढे आभार आणि उपकार कमीच आहेत!

पाच भारतियांच्या चमूने जागतिक भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये विक्रमी सुवर्णक्षण नोंदवला !

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 30/07/2018 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
लिस्बन (पोर्तुगाल) येथे आयोजित केलेल्या जागतिक भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये (International Physics Olympiad उर्फ IPhO) पवन गोयल, लाय जैन, सिद्धार्थ तिवारी, भास्कर गुप्ता आणि निशांत अभंगी या पाच भारतियांच्या चमूतील प्रत्येकाने सुवर्णपदक जिंकले आहे !  चमूतील १००% सभासदांनी सुवर्णपदक पटकावणे हा भारताचा गेल्या २१ वर्षांतील विक्रम आहे. या पूर्वी एकदा पाच पैकी चार जणांनी सुवर्णपदकाची कमाई केली होती.

आत्ते-मामे भावंडे

लेखक नर्मदेतला गोटा यांनी सोमवार, 30/07/2018 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
मनामधे काही शंका आहेत. 1. आत्ते मामे भावंडांमधे लग्न केल्यामुळे नेमका काय फायदा होतो ? (मामे बहीण, आत्ते भाऊ) नात्यातल्या इतर लग्नांमधे काही साईड इफेक्टस् असतात तसे इथे असतात का ! की काहीच धोके नसतात ? 2. पुरुष कितव्या वर्षापर्यंत बाप बनू शकतो आणि स्त्री कितव्या वयापर्यंत आई बनू शकते ?

तो आणि ती..... रुक्मिणी! (भाग ११)

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 30/07/2018 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
तो आणि ती..... प्रस्तावना: https://www.misalpav.com/node/42956 तो आणि ती.... देवकी!: https://www.misalpav.com/node/42957 तो आणि ती.... यशोदा!: https://www.misalpav.com/node/42969 तो आणि ती.... राधा!: https://www.misalpav.com/node/42980 तो आणि ती........ कुंती!: https://www.misalpav.com/node/42995 तो आणि ती......

पहिले महायुद्ध!-प्रकरण १ - भाग १

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 29/07/2018 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
११ नोव्हे १९१८ रोजी सकाळी ११ वाजायला एक मिनिट बाकी असताना हेन्री निकोलस जॉन गुंथर हा अमेरिकन सैनिक जर्मन मशीनगन च्या माऱ्याला बळी पडला. आश्चर्य असे कि तो जन्माने जर्मन-अमेरिकन होता. तो मेल्यानंतर १ मिनिटात सर्व युरोपभर युद्ध विराम लागू झाला. युरोपभराच्या चर्च मधून घंटानाद करून हे वर्तमान सांगितले गेले . लंडनचे बिग बेन घड्याळ १९१६पासून बंद होते त्याने ११.०० वाजता परत एकदा टोल दिले. गेली ४ वर्षे ३ महिने अविरत धडाडत असलेल्या तोफा-बंदुका शांत झाल्या. सर्व युरोपभर शांतता पसरली. अनेकाना ती भेसूर वाटली कारण,....

दी टायगर्स असोसिएशन - रहस्यकथा भाग ३

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 29/07/2018 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ खरर.. असा एक ब्रेकचा आवाज ऐकू आला आणि आठवणीतून मी एकदम भानावर आलो घराबाहेर एक दुसरी पोलिस व्हॅन आली होती. त्यातून दोघे तिघेजण जवळपास पळतच सावंताकडे आले. त्यांची ती लगबग बघून सावंतांनी अोळखले की या टीमला काही नवीन माहिती मिळाली आाहे. "सर एक न्यूज आहे. " त्या टीममधला एकजण बोलला. पण ती न्यूज सांगण्याआधी त्यांनी बाबांकडे पाहिले आणि ही न्यूज त्यांच्यासमोर कशी सांगावी असा काहीसा भाव चेह-यावर आला. सावंतांनी ते अोळखले ," खुशाल सांगा हो न्यूज.

आभाळाची छत्री

लेखक मूखदूर्बळ यांनी रविवार, 29/07/2018 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळाची छत्री माझ्या कड़े आभाळाची छत्री आहे. गुलाबी रंगाची लांब दाण्डयाची. रंग बऱ्या पैकी मळलेला आहे. गंजलेल्या तारांच्या गंजा च्या छटा त्यावर उमटल्या आहेत. कधी कधी तारा सुटतात. त्या मी परत बसवून घेतो. पाऊस सुरू व्हायच्या आधीपासून म्हणजे में पासून ते पाऊस सम्पायच्या नंतर नंतर अगदी ऑक्टोबर पर्यन्त मी त्या आभाळा च्या छत्रीला अंतर देत नाही. विसरत नाही म्हटले तरी दोन तीन दा तरी असेल छत्री दुकानात खानावळीत विसरून आलोय पण तितक्या च प्रयत्नने ती शोधूनही आणालिये. छत्री ला मी जसा विसंबत नाही तशी छत्री सुद्धा मला कधी विसम्बत नाही. ही आभाळाची छत्री वारसा हक्कानी माझ्या कड़े आली आहे.

खानावळ - एक शतशब्दकथा

लेखक तिमा यांनी रविवार, 29/07/2018 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
एक जुनी, सरकारी अनुदानावर चाललेली खानावळ होती. सर्व मेंबरं, तिथे गुण्यागोविंदाने जेवत असत. जेवण साधेच असे, रविवारी एखादी स्वीट डिश असे. तर, हळुहळु मेंबर्सची संख्या वाढत गेली. काही नवीन मेंबर आले. त्यांनी रोजच स्वीट डिशची मागणी केली. कंत्राटदार गयावया करु लागला. शेवटी आमटीतले पाणी वाढवून, ही मागणी त्याला पुरी करावी लागली. त्यानंतर आणखी मेंबर आले. ते स्वतःचे स्वीट खाऊन शेजारच्याचेही मागू लागले.