मैत्र - ३
संध्याकाळी एक एक करुन सगळे शामच्या ओट्यावर हजेरी लावत. मग ‘भविष्यात काय करायचे?’ हा विषय सोडून सगळ्या विषयांवर गप्पा चालत. दोन एक तास मग आमचा ओटाकट्टा रंगे. विनोदी विषय निघाला की काकूंना फार त्रास व्हायचा आमच्या हसण्याचा आणि गंभीर विषय निघाला की इन्नीला त्रास व्हायचा. कारण मग तिला किमान दोन वेळा तरी चहा करावा लागे. त्यातही आमचे चहा कमी आणि नखरेच जास्त असत. धोंडबाला बशीच हवी असे तर दत्त्याला वाटीत जास्तीची साखर हवी असे. शाम्याला वरुन थोडी दुधाची साय लागे चहात.
मिसळपाव
उडती छबकडी हा भारांचा विज्ञान(वेड)कथा संग्रह! ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे ह्या नुसत्याच विज्ञानकथा नसून वेडकथा देखील आहेत. एक एक कल्पना नुसती धुमाकूळ घालणारी आहे आणि विज्ञानाला धरून देखील आहे. त्या काळी प्रचलित असलेल्या विज्ञान संकल्पना हाती धरून एक सुंदर पार्श्वभूमी निर्माण करण्यात भारांचा हातखंडा होता.