मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करामत - एक लघुकथा

अनिंद्य · · जनातलं, मनातलं
* * * दंग्यात लुटल्या गेलेला माल जप्त करण्यासाठी पोलिसांनी छापे मारायला सुरवात केली. लोक घाबरले, लुटीचा माल रात्रीच्या अंधारात घराबाहेर फेकू लागले. काहींनी तर स्वतःचाच माल फेकून दिला, उगाच पोलिसांचे झेंगट नको म्हणून. * * * एका माणसाची मात्र पुरती गोची झाली. त्याच्याकडे साखरेच्या दोन गोण्या होत्या, किराणा मालाचे दुकान लुटताना त्याचा हाती तेव्हढेच लागले. रात्रीच्या अंधारात एक गोणी त्याने शेजारच्या विहिरीत कशीबशी ढकलली, पण दुसरी ढकलतांना तोल गेला आणि तोही विहिरीत ! आवाज ऐकून लोक गोळा झाले. दोरखंड टाकून दोन उत्साही वीर विहिरीत उतरले, त्याला बाहेर काढले. पण थोड्याच वेळात शेवटचे आचके देत तो देवाघरी गेला. * * * दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांनी विहिरीतून पाणी शेंदले तर ते चवीला अगदी गोड ! * * * रात्री बघतो तर काय - त्या माणसाच्या कबरीवर दिव्यांची आरास ! * * * ज्यांनी इथवर वाचलंय त्यांच्यासाठी :- ‘सआदत हसन मंटो’ ह्या अत्यंत प्रिय लेखकाच्या 'करामात' ह्या लघुकथेचा मराठीत अनुवाद करण्याचा माझा पहिलाच प्रयत्न. मोजके चार शब्द पदरचे लिहिण्याची आगळीक केली आहे, पण ती मराठीत वाचण्याच्या सुगमतेसाठी. * * *

वाचने 11793 वाचनखूण प्रतिक्रिया 28

टर्मीनेटर 13/08/2018 - 13:53
प्रयत्न चांगलाच जमलाय. कमीत कमी शब्दात आणि वाक्यात मनाला चटका लावणाऱ्या लघुकथा लिहिण्याची मंटो साहेबांची होतोटी विलक्षण होती. या आधी मिपावर जयंत कुलकर्णी साहेबांनी अनुवादित केलेल्या काही कथा वाचल्या होत्या. हि कथा आधी नव्हती वाचली ती अनुवादित केल्याबद्दल आभार.

In reply to by टर्मीनेटर

अनिंद्य 13/08/2018 - 17:28
आभारी आहे. कुलकर्णी साहेबांनी केलेले अनुवादही वाचून बघतो. मला आवडलेल्या काही कथांचा पुढे अनुवाद केलाच तर इथे रिपीट होणार नाही.

In reply to by नाखु

अनिंद्य 14/08/2018 - 13:18
@ नाखु, आभार ! बरेच दिवसांपासून तुम्हाला एक सांगायचे होते - तुमची ती 'वाचकांची पत्रे वाला नाखु' अशी सही मला आवडते :-)

In reply to by मित्रहो

अनिंद्य 15/08/2018 - 11:26
@ मित्रहो मला मंटोंच्या लघुकथा फार आवडतात. किमान शब्द आणि कमाल आशय. प्रतिक्रियेबद्दल आभार ! अनिंद्य

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनिंद्य 15/08/2018 - 11:22
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, आपल्यासारखे मराठी भाषेचे प्राध्यापक म्हणताहेत तर जमला असावा प्रयत्न. आभार !

अनिंद्य 11/05/2020 - 20:27
आज साहित्यप्रेमी मंटोंचा वाढदिवस साजरा करताहेत. त्या कारणे मंटोंचे बावनकशी लेखन पुन्हा एकदा पुढ्यात आले. _/\_

अनिंद्य 16/05/2020 - 10:06
@ चौथा कोनाडा @ शेखरमोघे @ बिपीन सुरेश सांगळे आभार. मिपा/माबो वर काही मंटोकथा मराठीत आहेत.