Skip to main content

पत्ते!

लेखक अशोक गोडबोले यांनी शुक्रवार, 28/09/2007 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
वाटा हसत हसत, पत्ते पिसून बावन्न येवो फलतू का पाने, होऊ नका कधी खिन्न पाने येणे हे प्रारब्ध, खेळा यत्न कौशल्याने जन्मा कोठेही कसेही, उंच व्हा कर्तृत्वाने कुणी राजा कुणी राणी, कुणी जाहला गुलाम हुकुमाच्या दुरीलाही, एक्का करीतो सलाम सारे नाहीत बदाम, काही काळे किलवर झाले चौकट हुजूर, आणि इस्पिक मजूर खेळताना एका हाती, सारे एकत्र नांदती चातुर्वर्ण्याची चौकट, किती सहज मोडिती त्रेपन्नावा दूर राहे, शांत एकला जोकर खेळ ब्रह्मांडाचा बघे, तटस्थ तो सूत्रधार हात करूनिया सारे, डाव शेवटी जिंकिला सारा जन्म हसण्यात आणि पिसण्यात गेला भल्याभल्यांना जगती, जादू पत्त्यांची कळेना आपुलाच रे अखेरी, त्यांना पत्ता स
Taxonomy upgrade extras

गोडबोले सरांचा परिचय!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 28/09/2007 02:31 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, माझे संगीतक्षेत्रातले स्नेही डॉ अशोक गोडबोले हे मिसळपावचे एक सन्माननीय सदस्य आहेत. परंतु 'मिसळपावचे सदस्य' एवढीच त्यांची ओळख मला थोडी अपुरी वाटते. आणि म्हणूनच मी या विद्वान व्यक्तिबद्दल येथे चार शब्द लिहू इच्छितो. मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चारही भाषांवर असामान्य प्रभूत्व, संतसाहित्याचा गाढा अभ्यास, संस्कृतचा प्रकांडपंडित आणि संस्कृत साहित्याचा अतिशय दांडगा व्यासंग, ही गोडबोले सरांची वैशिष्ठ्ये म्हणता येतील. गणित व तत्वज्ञान, वाङ्मय हे सरांचे अतिशय आवडीचे विषय. त्याचप्रमाणे गोडबोले सर मराठी, संस्कृत, व हिंदी भाषेतून काव्यरचनाही अतिशय उत्तम करतात.

शिवी देतो भगवंत!

लेखक अशोक गोडबोले यांनी शुक्रवार, 28/09/2007 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
अर्जुनाने द्रौपदीला स्वयंवरात जिंकिले मात्र भावांनी फुकट पत्नीसुख संभोगले वस्त्रहरणप्रसंगी षंढ पाचही दादुले आणि भीष्म द्रोण थोर पोरासारखे वागले उच्च तात्विक कारणे देती महा प्रज्ञावंत पतिव्रतेच्या अब्रूला कवडीमोलाची किंमत बंधुप्रेमाच्या शेल्याने शील रक्षिले अभंग एक पान थाळीतले भक्षी भुकेला श्रीरंग कृष्णे कृष्णा ओवाळिले भाऊबीज ती अपूर्व वनवासातही लाभे महाराणीचे वैभव पण एक शल्य होते भाऊरायाच्या अंतरी कुरुक्षेत्री झळाळली क्रोधवह्नीने वैखरी क्लीब म्हणता अर्जुना नाही जीभ कचरली शहाण्याला शब्दाचीच एक ठिणगी पु
Taxonomy upgrade extras

गीतम् (संस्कृत रचना)

लेखक अशोक गोडबोले यांनी शुक्रवार, 28/09/2007 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, अलिकडेच संस्कृतमध्ये एक रचना सुचली ती येथे लिहीत आहे.
नमामि मोदमंगलम् - विनायकं विनोदकम् II धृ II सुदर्शनेन केवलम् दुरितदलविलोपनम् व्याकुलोऽपि नि:स्वनं - मनो न मे ऽ स्तु कातरम् II १ II विषयबलविमोहिता अविद्ययाऽपि वंचिता धियं सधाय धीमता - पाहि तव पदाश्रितम् II २ II कृतं मया न सुकृतम् हितं कदा न चिन्तितम् अतीव विकलमानसम् - शरणचरणपंकजम् II ३ II न जातु मोक्षहेतवे भजनपूजने कृते तृषाहतं भवालयं - व्रतं ममाऽपि दुस्तरम् II ४ II देहि देहि गणपते आशिनं निरंतरम् सुनीतिपंथगामिनम् - पुनातु मंगलार्चनम् II ५ II
--अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras

खरडायचा फळा

लेखक लिखाळ यांनी गुरुवार, 27/09/2007 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिसळपावावर सारखे चमचमित मिसळीचे चित्र पाहून सारखी भूक लागते आणि काहीबाही चरत रहायल्यामुळे वजन वाढायला लागले आहे:) हे माझे प्रकटन कोठेतरी करावे असे मला वाटले. पण ते कोठे लिहावे ते समजेनापण. कारण हा तर काही चर्चा विषय नाही, लेख नाही किंवा कवीता. मग सदस्यांच्या मनात आलेले असले स्फुट विचार, काही एक दोन वाक्ये की जी सर्वांनी पहावीत त्यावर थोडे स्मितहास्य करावे कींवा आपले अनुभव सुद्धा लिहावेत असे ठिकाण मला दिसले नाही. त्यावरुन असे काही ठिकाण या स्थळावर असावे असे वाटले.

उगवला...चंद्र सुगीचा

लेखक नंदन यांनी गुरुवार, 27/09/2007 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
Harvest Moon [आजच्या पूर्णचंद्राचे छायाचित्र.] आज भाद्रपद पौर्णिमा. पाश्चात्य परिभाषेत 'हार्वेस्ट मून'. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात साधारण २३ सप्टेंबरच्या सुमाराला ऑटम्नल इक्विनॉक्स असतो. (याला मराठीत शरद-संपात किंवा शारदीय विषुवदिन म्हणता येईल.

हस्ताक्षरावरून स्वभाव! :)

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 26/09/2007 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, हस्ताक्षरावरून स्वभाव ओळखण्याचे एक शास्त्र आहे. मी या शास्त्राचा अभ्यास गेली अनेक वर्ष करत आहे. या कालावधीत आत्तापर्यंत अनेकांचे हस्ताक्षर बघायला मिळाले, अभ्यासायला मिळाले. मंडळी, माणसाचा स्वभाव हे एक अजब रसायन आहे. त्याचा संपूर्ण थांग आजपर्यंत कुणालाही लागलेला नाही हे मलाही मान्य. परंतु समजा मी एखाद्या माणसाला प्रत्यक्ष ओळखत असेन, त्याचा स्वभाव मला चांगला माहीत असेल, तरीही त्याचे हस्ताक्षर तपासल्यावर खूप काही नवीन गोष्टी कळू शकतात, कळतात! 'साधारणपणे माणसाचा स्वभाव जसा असतो त्याच पद्धतीने त्याच्या हाताचे वळण असते' या सिद्धांतावर हे शास्त्र उभे आहे.

पुणे गणेश दर्शन

लेखक जुना अभिजित यांनी बुधवार, 26/09/2007 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
आजानुरावांनी तुम्हाला चिंचवड गणेश दर्शन घडवून आणले आहेच. चला आता पुण्याचा फेरफटका मारू. http://picasaweb.google.com/abhijit.yadav/PuneGaneshDarshan मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला बालवाडीतला अभिजित

मजला बघ प्रीत तुझी कळली

लेखक रंजन यांनी बुधवार, 26/09/2007 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
मजला बघ प्रीत तुझी कळली बघतेस जरी मला तू सखये नयनात छबी दिसते दुसरी... चुकवी नजरेस सदा दडुनी कसली करते लपवा छपवी? छळती तुज त्या जुन्या आठवणी जसे भृंग वनामधुनी सुमना फिरती तुझिया अवती भवती झुरते मुखकमल तुझे रमणी कथिले गुज मी तुजला मनचे म्हणुनी झुकला सखये चरणी पडले पुढती किति मौक्तिकही.... अपुल्या पुढती बघता हसली वळुनी सखया झटकन वदली .... 'मजला बघ प्रीत तुझी कळली'
Taxonomy upgrade extras