Skip to main content

देवगिरी किल्ला : दौलतींचे शहर (दौलतबाद)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 15/12/2007 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर लेणी स्थापत्याबद्दल काही लेखन टाकावे या उद्देशाने एक दिवस वेरूळ लेण्यावर जावे आणि ती माहिती मिसळपाववर, उपक्रमवर किंवा माझे शब्द वर टाकावी म्हणून आम्ही एका मंगळवारी वेरुळला पोहचलो. पण, तिथे हा फलक पाहिला. जरासा नाराज झालो.

कमरेखालचे वार

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 14/12/2007 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावावरील विकासरावांच्या पारवर्ड चोरीचा प्रयत्न ताजा असतानाच माझाही पासवर्ड चोरायचा प्रयत्न झालेला आहे. भारतील वेळेनुसार संध्याकाळी ४:२४ ला माझ्या जीमेल खात्यात 'मिसळपाववर तुमचा पासवर्ड बदलण्याची विनंती करण्यात आलेली आहे' असे सांगणारा विरोप आलेला आहे. त्यात पुढे काही दुवे दिले असून तेथे जाऊन पासवर्ड बदला वगैरे मार्गदर्शनपर सूचना आहे. त्याबद्दल - १. मी स्थानिक रात्री २ वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ३:३०) निद्राधीन झाल्यानंतर तासाभराने हा प्रकार करण्यात आला.

मलमूत्र व संस्कृती

लेखक आजानुकर्ण यांनी शुक्रवार, 14/12/2007 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
चौगुले साहेबांच्या विनोदांना उडवण्यावरून मोठी धुळवड झाली आणि वातावरण तंग झाले. अनेकांनी तर त्यांना मलमूत्र ही गलिच्छ वस्तू आहे हे समजू लागल्यापासून मलमूत्र विसर्जनच कायमचे बंद करून टाकले आहे की काय अशी शंकाही माझ्या मनाला चाटून गेली. कित्येकांनी व्यक्तिगत निरोपाद्वारे चौकशी करून चौगुल्यांचे तथाकथित ओंगळ लेखन तुम्हाला कसे आवडते हा प्रश्न केला? मी जबाबदारीने वागावे व उगाच ट ला ट जोडू नये अशीही आगंतुक सूचना झाली. पण हा प्रसंग व काही दिवसांपूर्वी वाचलेले लेख यांच्या घुसळणीतूनच मनात काही विचार आले. फार दिवसांपूर्वी वाचलेल्या एका कथेतील काही भाग आठवतो.

निवेदन...

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 14/12/2007 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आजपर्यंत पंचायतसमितीच्या कामामध्ये तसेच येथील लेखन संपादित करण्यामध्ये मी कधीही हस्तक्षेप केलेला नाही/करत नाही हे सर्वप्रथम नमूद करतो. आणि तसं मी अनेकदा जाहीरपणे सांगितलंही आहे! आपल्याला विश्वास ठेवायचा असेल तर अवश्य ठेवा किंवा ठेवू नका, ही आपली मर्जी! आपण जर येथील काही लेखन पुन्हा एकदा चाळलेत तर माझी थट्टामस्करी, माझ्यावर जाहीर आरोप, असले अनेक प्रकार इथे केलेले आपल्याला पाहायला मिळतील. हे सर्व लेखन आजही येथे शाबूत आहे!