कमरेखालचे वार
मिसळपावावरील विकासरावांच्या पारवर्ड चोरीचा प्रयत्न ताजा असतानाच माझाही पासवर्ड चोरायचा प्रयत्न झालेला आहे. भारतील वेळेनुसार संध्याकाळी ४:२४ ला माझ्या जीमेल खात्यात 'मिसळपाववर तुमचा पासवर्ड बदलण्याची विनंती करण्यात आलेली आहे' असे सांगणारा विरोप आलेला आहे. त्यात पुढे काही दुवे दिले असून तेथे जाऊन पासवर्ड बदला वगैरे मार्गदर्शनपर सूचना आहे. त्याबद्दल -
१. मी स्थानिक रात्री २ वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ३:३०) निद्राधीन झाल्यानंतर तासाभराने हा प्रकार करण्यात आला. मी मिसळपाववरून जाण्याची नोंद केलेली नव्हती (हे बरेच झाले खरे तर नाहीतर मला पासवर्ड बदलणे वगैरे नाटके करत बसायला लागली असती), आणि बराच काळ 'आयडल' असल्याने माझे नाव आलेल्या सदस्यांच्या यादीत दिसत नसणार. याला फसून कुणीतरी हा फाजीलपणा केल्याचे दिसते. माझे कालचे सेशन अद्याप संपले नसल्याने जो कोणी हा नतद्रष्टपणा केला आहे, त्याचे फावले नाही म्हणायचे.
२. अर्थातच मी माझ्या वतीने पासवर्ड बदलायची अशी कोणतीही विनंती अद्याप मिसळपावला केलेली नाही. त्यामुळे अशी विनंती पाठविणे हे माझे काम नाही.
३. याबद्दल मालक म्हणून तात्यांकडून खुलासा अपेक्षित आहे. पंचायत समितीने उत्तर देणे मिसळपावच्या (नसलेल्या) घटनेत/धोरणांमध्ये बसत असेल, तर तिच्याकडूनही. इतर सदस्यांना याबाबत काय म्हणायचे आहे, हे सुद्धा जाणून घ्यायला आवडेल.
४. या नीचपणाविरुद्ध 'आयडेन्टिटी थेफ्ट'ची/तशा प्रयत्नाची तक्रार सायबर क्राइम अंतर्गत करता येईल का? करायची म्हटली तर ती कुणाकडे कशी करावी (अमेरिकेत/भारतात), त्यासाठी काय करावे लागेल, याबाबत मिसळपाव मालक व प्रशासनाला पोलीस किंवा संबंधित कायदा व सुव्यवस्था संस्थांशी काय सहकार्य करावे लागेल, याबाबत माहिती हवी आहे. मा. सर्किटकाका यावर अधिक प्रकाश टाकू शकतील असे दिसते. त्यांना स्वतःहून असा तपास करायचा असेल (आय पी अड्रेस शोधणे वगैरे) तर मी त्यांना मला आलेला विरोप फॉरवर्ड करू शकेन.
तूर्तास इतकेच. यावरच्या साधकबाधक चर्चेतील मते अनेक बाबींवर प्रकाश टाकणारी ठरतील, अशी आशा आहे.
धन्यवाद.
वाचने
18987
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
अहो हा
In reply to अहो हा by राजे (verified= न पडताळणी केलेला)
बरोबर
In reply to बरोबर by बेसनलाडू
बे. ला.
" त्याचे
In reply to " त्याचे by राजे (verified= न पडताळणी केलेला)
धन्यवाद
आयडी थेफ्ट, तक्रार इत्यादी
In reply to आयडी थेफ्ट, तक्रार इत्यादी by विकास
धन्यवाद..
हेडर्स तपासले
In reply to हेडर्स तपासले by बेसनलाडू
वाचायलाही चांगलेच मिळेल! :)
In reply to वाचायलाही चांगलेच मिळेल! :) by विसोबा खेचर
इथे येऊच
In reply to हेडर्स तपासले by बेसनलाडू
सुधारणा/विनंती
In reply to सुधारणा/विनंती by बेसनलाडू
बे. ला.
In reply to बे. ला. by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मिळाला का रे ???
In reply to मिळाला का रे ??? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
पिडणे
In reply to पिडणे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
:-)
In reply to :-) by सहज
एवढेच नाही
In reply to बे. ला. by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
उगाच?
थोडक्यात काय
In reply to थोडक्यात काय by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
खरे आहे
In reply to थोडक्यात काय by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
ते माहीत आहे
In reply to ते माहीत आहे by विकास
न्युसंस
In reply to न्युसंस by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हम्म
In reply to हम्म by आजानुकर्ण
हे देखील
बोधकथा
आजानुकर्णोक्ती
सहमत
बे.ला. चे तर्क
In reply to बे.ला. चे तर्क by ॐकार
तर्काचे भक्कम आधार
In reply to तर्काचे भक्कम आधार by बेसनलाडू
तर्क