याँऽयुकऽ नोऽएल: मेरी ख्रिसमस
पहिले महायुद्ध आणि त्यावरचे अनेक चित्रपट यामुळे तेव्हा लढल्या गेलेल्या बर्याचशा लढाया सगळ्यांना माहीत आहेत. काही चित्रपट लढाई व्यतिरिक्त सैनिकांच्या समस्या, त्यांची मानसिकता, संघर्ष आदि विषयांचेही सुंदर चित्रण करतात. "नो मॅन्स लँड" पासून "सेविंग प्रायवेट रायन" असो, एक सैनिक आणि त्याच्या पुढील आव्हाने याचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चित्रण केले गेले आहे. यापैकीच आणखी एक पैलू उजेडात आणणार एक फ्रेंच चित्रपट आज पाहिला. २००६ मध्ये प्रसिद्ध झालेला "याँऽयुक नोऽएल".(Joyeux Noël) किंवा इंग्रजी मध्ये "मेरी ख्रिसमस". युद्धावरील अनेक चित्रपटांच्या पैकी एक असला तरी आपले असे वेगळेपण जपणारा.. नव्हे ..
मिसळपाव