Skip to main content

सोड असले नाद सगळे

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 08/02/2008 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अदितीताईंची कविता काल सांगावा मिळाला.... घालते डोळा मला ती दाबते ओठास दाती काय रे येतोस का तू सोबतीला सांग राती पाहुनी घायाळ झालो पण पुढे झाली न छाती वेळ नुसता खर्च झाला गवसले काही न हाती सोड असले नाद सगळे "केशवा" होईल माती --केशवसुमार (माघ शु.१ शके १९२९, ८ फेब्रु. २००८)

माझी मायभू

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 08/02/2008 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्राचीन काळापासूनची आपली संस्कृती बहुतांशी टिकवून ठेवणारा, विविध परकियांचे आकर्षणस्थान झाल्याने व त्यांच्या आक्रमणांमुळे या संस्कृतीत किंवा संस्कृतीतून जरी काही घटक समाविष्ट अथवा नाहीसे झालेे असले, तरी न ढळता अभिमानाने जगात मान उंचावणारा, जीवसृष्टी व लोकसृष्टीत अमाप प्रमाणात विविधता असलेला, विकासाच्या दिशेने रोज पाऊले पुढे टाकत जगावर छाप पाडणारा, असा हा भारत देश. ह्या देशावर सर्वप्रथम आर्य, त्यानंतर शक, मग मौर्य, मग ग्रीक, इत्यादी प्रबळ राजवटींनी देशाचा कायापालट करून त्याचे जणू सुवर्ण संास्कृतिक भूमीत रूपांतर केले. भारताने 1 ते 9 हे अंक अस्तित्वात आणले. शून्याचा शोध भारतीयांनी लावला.

एक नवीन ऑल-इन-वन सॉफ्टवेअर

लेखक माझी दुनिया यांनी शुक्रवार, 08/02/2008 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल ऑल-इन-वन वस्तू जास्त वापरात येतात. सगळ्या गोष्टी त्यात एकत्रितपणे मिळण्याची सोय असल्याने ते सुटसुटीत पडते. अशीच एक सुटसुटीत प्रणाली माझ्या पहाण्यात आली. हॉटमेल , याहू आणि जीमेल अशी तिन्ही खाती असणारे, त्याद्वारे विरोप पाठवणारे, वाचणारे, गप्पा मारणारे काही कमी नाहीत. पण त्याकरता आपण किती प्रणाल्या संगणकावर उतरवून घेतो ? याहू आणि हॉटमेल च्या गप्पांकरता ’याहू मेसेंजर’ आणि जीमेल करता ’जीटॉक’. विरोप महाजालावरच वाचत असलात तर ठीक नाहीतर आऊटलूक किंवा थंडरबर्ड किंवा तत्सम. महाजालावरच वाचत असलात तर किती संकेतस्थळांना भेटी द्याव्या लागतील ? अर्थातच तीन हॉटमेल , याहू आणि जीमेल.

मराठी साईट्सना भेट द्या.

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 08/02/2008 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिसळपावासारख्या कित्येक विविध प्रकारच्या साईट्स इंटरनेटवर उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मराठी चा प्रसार होत आहे. अशाच काही मराठमोळ्या साईट्सची नावे पुढीलप्रमाणे: ०१. www.marathiworld.com ०२. www.marathimati.com ०३. www.easymarathi.com ०४. Gadima.com ०५. Rasik.com ०६. Victorian.fortunecity.com ०७.

आजचा सुधारक कोंडीतून सुटका

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 08/02/2008 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
या पुर्वी आजच्या सुधारकची कोंडी येथे वाचा. त्यावरील प्रतिक्रिया १ येथे वाचा. प्रतिक्रिया २ येथे वाचा.

'विशेष आर्थिक क्षेत्रांविषयी, अर्थात Special Economic Zones (SEZs) बद्दल.

लेखक तळेकर यांनी शुक्रवार, 08/02/2008 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
यार! कंपनी सरकार आ रहा है!! "मी भारतात खूप फिरलो. उभा - आडवा भारत पालथा घातला. आणि मला तिथे एकही भिकारी, एकही चोर पहायला मिळाला नाही. हा देश इतका समृद्ध आहे; इथली नैतिक मूल्यं इतकी उच्च आहेत आणि लोक इतके सक्षम, योग्यतेचे आहेत की आपण हा देश कधी जिंकू शकू असं मला वाटत नाही. या देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा हा या देशाचा कणा आहे आणि आपल्याला हा देश जिंकायचा असेल तर तोच मोडायला हवा! त्यासाठी त्यांची प्राचीन शिक्षणपद्धती आणि त्यांची संस्कृती बदलावी लागेल.

कुठली खिडकी? कितवा मजला?

लेखक ॐकार यांनी शुक्रवार, 08/02/2008 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
कुठली खिडकी? कितवा मजला? निळ्या पांढर्‍या भिंती दिसल्या बावरलेल्या नजरा वळल्या शब्दांनीही खाटा धरल्या प्रश्न तेवढा एक राहिला कुठली खिडकी? कितवा मजला? मित्र,सोयरे सगळे जमले नव्या घरी येताना दिसले बंद लिफ्ट पाहून म्हणाले किती पायर्‍या चढावयाला? कुठली खिडकी? कितवा मजला? मध्यरात्रीचा प्रहर नेमका हेरून गेलो तसा बेरका व्यवहारी मी मदन नेटका पैसे मोजत खांद्यावरती हात टाकला कुठली खिडकी? कितवा मजला? रिक्तहस्त मी अलिप्त आणि एकभुक्त मी विषय, वंचना, व्यसनांपासून पूर्ण मुक्त मी मीच देव, मी दानव अन माझाच भक्त मी झोपायाला जमीन, अंबर पांघरायला कसली खिडकी! कसला मजला! -ॐकार

"शुद्ध' काही जीवघेणे...

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 07/02/2008 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
--------- व्याकरण, भाषा, यांचा आग्रह अस्मादिकांना पूर्वीपासूनचा. मी काही तर्कतीर्थ नाही, की भाषासुधारक वि. दा. सावरकर. पण माणसानं निदान शुद्ध, व्यवस्थित, दुसऱ्याला समजेल, अशा सोप्या पण स्वच्छ भाषेत बोलावं, एवढा बरीक आग्रह. किंबहुना, हट्टच. (त्यामुळं गृहस्वामिनीशीबरोबरही अनेकदा समरप्रसंग ओढवतात. असो.) पुण्याची भाषा अधिक शुद्ध, व्याकरणाग्रही, आदीम आहे, असा आमचा आपला पूर्वीपासूनचा ग्रह. पण पुण्यात दहा वर्षांच्या मुक्कामातला अनुभव जवळपास नैराश्‍यजनकच. आता, काही तज्ज्ञ मंडळी म्हणतील, बाहेरून आलेल्या (आमच्यासारख्या) लोकांनीच पुण्याची भाषा बिघडवली.

ही बातमी वाचून मन विषण्ण झाले.

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 07/02/2008 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या स्वातंत्र्यवीरांनी देशापायी आपल्या घर-संसाराची राख केली, त्यांच्या नशिबी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरही बंदिवास यावा हे त्यांचं दुर्दैव नसून आपला करंटेपणा आहे! ह्याला माफी नाही!! काँग्रेसचा बुळेपणा आणि 'निधर्मी' असणे म्हणजे नेमके काय ह्याबद्दलचा गोंधळ ६० वर्षांनंतरही कायम आहे असेच अजून दिसते. www.esakal.com/esakal/02072008/National467F25B420.htm

सेझ बद्दल कोणी माहिती देऊ शकेल काय?

लेखक सागर यांनी गुरुवार, 07/02/2008 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
सेझ बद्दल कोणी माहिती देऊ शकेल काय? सेझ बद्दल अलिकडेच काहिसे वाचले होते. पण कळाले नव्हते...म्हणून उत्सुकता चाळवली गेली आणि वाटले की सेझ म्हणजे काय हे माहित करुन घ्यावे..... माझ्या माहितीप्रमाणे अनेकांनी एकत्र येऊन टाऊनशिप बांधली की त्याला सेझ असे म्हणतात का? सेझ म्हणजे नक्की काय? त्याचा नक्की फायदा कोणाला होतो? याची आवश्यकता किती आणि का? इ. अनेक प्रश्न उभे रहात होते... मनात विचार आला.... मिसळपावव्यतिरिक्त चांगले ठिकाण दुसरे नाही.... तेव्हा येथील सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती की सेझबद्दल माहीती द्यावी.... धन्यवाद सागर