Skip to main content

सोड असले नाद सगळे

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 08/02/2008 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अदितीताईंची कविता काल सांगावा मिळाला.... घालते डोळा मला ती दाबते ओठास दाती काय रे येतोस का तू सोबतीला सांग राती पाहुनी घायाळ झालो पण पुढे झाली न छाती वेळ नुसता खर्च झाला गवसले काही न हाती सोड असले नाद सगळे "केशवा" होईल माती --केशवसुमार (माघ शु.१ शके १९२९, ८ फेब्रु. २००८)
लेखनविषय:

वाचने 6414
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

केशवा सह्ह्ह्ह्हीच रे! सोड असले नाद सगळे "केशवा" होईल 'माँ' ती (फाजील) -इनोबा

लय भारी हो, केशवखुमार !!! बाकी तुमच्या विड॑बना॑चा खुमार चढत्या भाजणीतला आहे हा॑ !!! इनोबा, हे तर च्यायला कडीवर वरकडी :)) -ध मा ल.

सोड असले नाद सगळे "केशवा" होईल माती हा हा हा! मस्त रे केशवा.. तात्या.

काही शब्दच नाहीत्..किती चपखल असतं तुमच विडंबन्...

आदितीचि कविता न वाचताही खूप मजा आली केशवा तुझी कविता वाचताना... सह्हि रे... वेळ नुसता खर्च झाला गवसले काही न हाती लईच भारी.. - प्राजु

सोड असले नाद सगळे "केशवा" होईल माती लै भारी विडंबन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सपूर्ण विडंबन आवडलं.. एकापेक्षा एक सरस द्वीपदी :) अजून येउद्या :) -ऋषिकेश

१ नंबर झालय विडंबन.... बाकी काल एकही नवीन विडंबन नाही म्हणुन थाप का मारली? - आपला, (केशवाला खरं नांव माहिती असणारा) छोटी टिंगी

केशवराव विडंबन तर मस्तच.. आणि विनूची त्यावर वरकडी पण उत्तम.. पुण्याचे पेशवे

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार केशवसुमार

नाद मात्र सोडू नका केशवा. एकदम झकास. त्यो तर वाढवाच. आणखी बक्कळ येऊ द्यात.