(भाउबंदकी)
बाई, बाटली, प्रेयसी, दारु, गुत्ते, बायको आणि तिचे तीर्थरुप..इ. ना विडंबनात न आणता विडंबन लिहिण्याचे ओपन च्यालेंज मिळ्याल्या पासून विडंबनासाठी कच्चा माल शोधत होतो आणि आज पहाटे पहाटे बेसनलाडू यांची भाउबंदकी वाचनात आली..
म्हणल बघू जमतय का आपल्याला...
किनार्या'वरी शिजलेला कट
त्यांची निष्ठा, जगास कटकट!
'मांड्यां'ची चव नका विचारू
जरा तंगडी आहे जळकट!
चिलटांची त्या कशाच चिंत्ता?
वशिंड भरले, शिंगे दणकट!
काका पिटला ! पुतणा उठला!
भाउबंदकी आहे बळकट
विडंबने ही सुटली नाही
"केश्या" मेला आहे, हलकट
मिसळपाव